जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

गायी सोडल्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)
 
   कोपरगाव तालुक्यातील बक्तरपुर येथील रहिवासी असलेले आरोपी दिपक रामनाथ सानप व अनिता दिपक सानप यांनी आपल्या गोठ्यातील गायी का सोडल्या ? याचा जाबसाल केला असता त्यांनी आपल्यासह आपले सासरे रामनाथ विठोबा सानप,नवरा भरत सानप आपली मुलगी अनन्या भरत सानप अशांना लोखंडी गज,विळा आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचा गुन्हा बक्तरपुर येथील महिला साधना भरत सानप (वय -34) यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने बक्तरपुर आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

 

“आपला आणि आमचे भावबंद यांचा एकत्र सामायिक गायींचा गोठा आहे.माझे कुटुंबात आपले पती भरत सानप,सासरे रामनाथ सानप,सासू इंदुबाई सानप,मुलगा कार्तिक,मुलगी अनन्या असे एकत्र राहत असून आपल्या शेजारी आपले चुलत सासरे दिपक रामनाथ सानप,त्यांची पत्नी अनिता दिपक सानप हे राहतात.त्यांनी आमची जनावरे सोडून दिल्याने त्यांना,”आपण आमच्या गोठ्यातील जनावरे का सोडली ? असा प्रश्न विचारला असता हा वाद निर्माण झाला आहे.

    किरकोळ कारणांवरून होणाऱ्या हाणामारीच्या घटनांमुळे समाजात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून ही एक अत्यंत चिंतेची बाब बनली आहे.आजकाल वाहन पुढे नेण्यावरून,रस्त्यावर झालेला वाद,लहान मुलांचे भांडण,गाय गोठ्यातील जनावरे सोडण्यावरून शेजाऱ्यांचे वाद किंवा सोशल मीडियावरील मेसेज यांसारख्या क्षुल्लक कारणांवरून लोक आक्रमक होत आहेत.लोकांमध्ये सहनशक्ती कमी होत चालली आहे आणि क्षणात राग अनावर होत आहे.’मी कसा कमी पडलो’ किंवा ‘माझा कसा अपमान झाला’ ही भावना वाढीस लागली आहे.किरकोळ वादातही लोखंडी रॉड, विळे,कोयते किंवा बेदम मारहाण करण्यापर्यंत मजल जात आहे.एकट्याने वाद मिटवण्याऐवजी मित्र किंवा नातेवाईकांना बोलावून हिंसाचार केला जातो.परिणामी किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होताना दिसून येत आहे.अशीच एक घटना कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे हद्दीत बक्तरपुर येथे घडली असून जवळचे भावबंध असलेले नातेवाईक याला बळी पडले आहे.त्यामुळे एकास थेट अतिदक्षता विभागात उपचारार्थ भरती करावे लागले असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

    याबाबत बक्तरपर येथील फिर्यादी महिला साधना सानप यांनी गुन्हा दाखल केला असून त्यात त्यांनी म्हटले आहे की,”आपला आणि आमचे भावबंद यांचा एकत्र सामायिक गायींचा गोठा आहे.माझे कुटुंबात आपले पती भरत सानप,सासरे रामनाथ सानप,सासू इंदुबाई सानप,मुलगा कार्तिक,मुलगी अनन्या असे एकत्र राहत असून आपल्या शेजारी आपले चुलत सासरे दिपक रामनाथ सानप,त्यांची पत्नी अनिता दिपक सानप हे राहतात.त्यांनी आमची जनावरे सोडून दिल्याने त्यांना,”आपण आमच्या गोठ्यातील जनावरे का सोडली ? असा प्रश्न विचारला असता त्यांनी आपल्याला आणि आपल्या कुटुंबातील सासरा,नवरा अशांना वाईट साईट शिवीगाळ करुन त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या हातातील लोखंडी गज आणि विळ्याने मारहाण केली आहे व जीवे मारण्याची धमकी दिली आहे.यात आपले सासरे रामनाथ विठोबा सानप यांना जास्त मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहे.त्यांना कोपरगाव नजीक असलेल्या एस.जे.एस.हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करून दिले असून ते अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.त्यांचे विरोधात आपली फिर्याद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

   दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रमांक 414/2026 भारतीय न्याय संहिता कलम 118(1),115(2),3(5) प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेड.कॉन्स्टेबल हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close