निवड
…या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक संपन्न !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील लौकी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच किरण शेळके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली असून या निवडणुकीत काळे गटाच्या दिपाली विष्णू खटकाळे यांचा विजय होऊन त्यांची उपसरपंच पदी निवड झाली असल्याची माहिती हाती आली आहे.नूतन उपसरपंच यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

“अटीतटीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयाचा आंनंद निश्चितपणे मोठा असला तरी उपसरपंचपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवून आ.आशुतोष काळे यांनी माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला आहे,तो माझ्यासाठी केवळ पदाची संधी नसून काम करण्याची मोठी जबाबदारी आहे”- दिपाली खटकाळे,नूतन उपसरपंच,लोकी,ग्रामपंचायत.
लौकी ग्रामपंचायतीचे उपसरपंच किरण शेळके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ती जागा रिक्त झाली होती.त्यासाठी उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया सरपंच आजिनाथ खटकाळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली आहे.उपसरपंच पदाच्या निवडणुकीत काळे गटाकडून दिपाली विष्णू खटकाळे व कोल्हे गटाकडून भीमाबाई बाबासाहेब खटकाळे यांचे अर्ज दाखल होवून पार पडलेल्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना समसमान चार मते पडली असता.सरपंचाचे निर्णायक मत दिपाली विष्णू खटकाळे यांच्या पारड्यात पडल्यामुळे निवडणूक अधिकारी काम पाहत असलेले ग्रामसेवक संकेत शिंगाडे यांनी दिपाली खटकाळे यांचा विजय झाल्याचे जाहीर केले आहे.
सदर प्रसंगी सरपंच आजिनाथ खटकाळे,मावळते उपसरपंच किरण शेळके,सर्व ग्रा.प.सदस्य,राहुल खंडीझोड,ललिता इंगळे,राजेंद्र खिलारी,माधव खटकाळे,दिगंबर जाधव,सावळीराम खटकाळे,बाळासाहेब भवर,यशवंत कदम,सागर खटकाळे,दादासाहेब खटकाळे,सचिन खटकाळे,उद्धव खटकाळे,शरद भवर,अनिल भवर,किसनदेव भवर,भाऊसाहेब गोडसे,ज्ञानदेव खटकाळे,पोपट खंडीझोड,सतीष खटकाळे,शंकर खटकाळे,संदीप भवर,राजेंद्र इंगळे,आसाराम इंगळे,संदीप खटकाळे,विष्णू खटकाळे,केरू इंगळे,नारायण इंगळे,सुनिल खटकाळे,भगवान खटकाळे आदी मान्यवरांसह लौकी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
दरम्यान नवनिर्वाचित उपसरपंच दिपाली खटकाळे यांचे माजी आ.अशोक काळे व आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले आहे.यावेळी सरपंच,सर्व सदस्य व काळे गटाचे कार्यकर्ते यांनी नवनिर्वाचित उपसरपंच दिपाली खटकाळे यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.



