जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
व्यक्ती विशेष

चंदनशिव यांचे सेवा निवृत्तीबद्दल सत्कार !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील शेतकरी माध्यमिक विद्यालयातील कर्मचारी सुरेश लक्ष्मण चंदनशिव हे सेवानिवृत झाल्याबद्दल त्यांचा व त्यांची धर्मपत्नी नंदा चंदनशिव यांचा सपत्नीक जवळके येथील ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच डी.के.थोरात यांचे शुभहस्ते व शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नानासाहेब जवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा सत्कार केला आहे.

जवळके येथील शेतकरी माध्यमिक विद्यालयातील कर्मचारी सुरेश लक्ष्मण चंदनशिव हे सेवानिवृत झाल्याबद्दल त्यांचा व त्यांची धर्मपत्नी नंदा चंदनशिव यांचा जवळके येथील ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच डी.के.थोरात यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला तो क्षण.

सुरेश चंदनशिव यांनी 1984 साली शेतकरी माध्यमिक विद्यालयात आपले काम सुरू केले होते.तह्यात त्यांनी 31 में 2026 पर्यंत काम करून तब्बल 42 वर्षे इतकी विक्रमी सेवा करून निवृत्ती स्वीकारली आहे.त्यांनी आपल्या स्वभावाने आणि सेवेने अनेक माणसे जोडली आहे.त्यांनी सुट्टीच्या आणि फावल्या वेळात श्री क्षेत्र नाणिज धाम येथील स्वामी नरेंद्र महाराज यांचे शिष्यत्व पत्करले होते.त्यातून सक्तदान,मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरे आदी समाजोपयोगी कामे केली आहेत.

   कोपरगाव तालुक्यातील जवळके येथे अवर्षण प्रवण शिक्षण संस्था असून त्याचे वतीने सन-1981 साली स्थानिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन शेतकरी माध्यमिक विद्यालय स्थापन करण्यात येऊन चालविण्यात येत आहे.त्यांच्या सेवेत सुरेश चंदनशिव यांनी 1984 साली आपले काम सुरू केले होते.तह्यात त्यांनी 31 में 2026 पर्यंत काम करून तब्बल 42 वर्षे इतकी विक्रमी सेवा करून निवृत्ती स्वीकारली आहे.त्यांनी आपल्या स्वभावाने आणि सेवेने अनेक माणसे जोडली आहे.त्यांनी सुट्टीच्या आणि फावल्या वेळात श्री क्षेत्र नाणिज धाम येथील स्वामी नरेंद्र महाराज यांचे शिष्यत्व पत्करले होते.त्यातून सक्तदान,मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरे आदी समाजोपयोगी कामे केली आहेत.ते स्वामी नरेंद्र महाराज यांच्या नाशिक उपपीठाचे येथील विकास ब्रिगेडियर यापदावर काम करत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यांनी आपल्या सेवा निवृत्तीबद्दल जवळके येथील अखंड हरिनाम सप्ताहात उपस्थित भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था केली होती.त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सुरेश चंदनशिव.

   सदर सत्कार प्रसंगी हिंगणी येथील बापूसाहेब पवार,हिंगणी पोलिस पाटील कुमार पंडीत,मच्छिंद्र चंदनशिव,राजेंद्र चंदनशिव,विश्वनाथ पवार,चिलाजी पवार,सुभाष बर्डे,मनसुख पवार आदीसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

   त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नानासाहेब जवरे,माजी उपअभियंता एस.के.थोरात,जवळके ग्रामपंचायतीचे माजी सरपंच वसंत थोरात,बाबुराव थोरात,जवळके ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सारिका विजय थोरात,दत्तात्रय चांगदेव थोरात,माजी उपसरपंच अण्णासाहेब भोसले,डी.के.थोरात,रामनाथ थोरात,अशोक शिंदे,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब थोरात,शिवाजी भोसले आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close