जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

गोदावरी नदी घाटांच्या विकासासाठी निधी द्या -…यांची मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)
  
  आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पौराणिक महत्व असलेल्या कोपरगाव शहराचे प्राचीन महत्व लक्षात घेऊन कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महत्वाचे रस्ते आणि नदीकाठच्या घाटांच्या विकासासाठी निधी मिळावा अशी महत्वपूर्ण मागणी आ.आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नुकतीच केली आहे.

“कोपरगाव मतदार संघातील काही फळबाग उत्पादक सहकारी संस्थांना कर्जमाफीचा लाभ झाला नाही.या संस्था जिल्हा सहकारी बँकेच्या सभासद संस्था आहेत. नियमित कर्जफेड करतात.मात्र त्यांचा समावेश पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफी योजनेत करण्यात आलेला नाही.त्यामुळे या संस्थेच्या कर्जमाफी योजनेत पात्र असलेल्या शेतक-यांना लाभ मिळालेला नाही.या संस्थांचा कर्जमाफी योजनेत समावेश करावा,कोपरगाव रेल्वे स्थानकावर विशेष सुविधा निर्माण कराव्यात आदी मागण्या आपण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केल्या आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

  आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे भाविकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी विविध विकासकामे,स्वतंत्र प्राधिकरण स्थापना, गोदावरी शुद्धीकरण व साधुग्रामसाठी ३७७ एकर जमीन अधिग्रहण व नियोजनाचा महाप्लॅन हाती घेतला आहे.त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे.मात्र नाशिक या तीर्थक्षेत्राशी संबंधित गावांना वगळले असल्याचे दिसून येत आहे.त्यात गोदावरी तीरी कोपरगाव तालुक्यातील अनेक तीर्थक्षेत्र असून त्याकडे सरकारांचा कानाडोळा आहे.त्यामुळे त्याकडे लक्षवेधून घेणे गरजेचे आहे.तर शिर्डी सलग्न गर्दीच्या काळात वापरणारे काही रस्ते सोडून दिले आहे.त्यामुळे या साठी आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे.

  त्यात त्यांनी म्हटले आहे की,”कुंभमेळ्याच्या काळात देशभरातील साधू आणि भाविक पुजा पाठ आणि गोदावरीच्या स्नानासाठी कोपरगावात येतात.हि परंपरा प्राचीन आहे.या काळात तिर्थक्षेत्री जाणारे महत्वाचे रस्ते आणि गोदाकाठचे महत्वाचे घाट विकसित करणे गरजेचे आहे.तेथे भाविक आणि साधु संतांसाठी सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे.या गर्दीचे नियोजन करण्यासाठी झगडे फाटा ते वडगाव पान हा पूर्वीचा बाह्यवळण 33.200 किमी रस्ता करणे,पढेगाव ते उक्कडगाव रस्ता आणि कोळगाव पाटी ते देर्डे फाटा हे महत्वाचे रस्ते सुधारण्यासाठी निधी मिळणे आवश्यक आहे.शिवाय कोपरगाव बस स्थानक,रेल्वे स्टेशन परिसरातील रस्ते,स्वच्छतागृह,विश्रामगृह,सुसज्ज प्रतीक्षालय आणि इतर प्रवाशी सुविधा करणे अत्यंत गरजेचे आहे.गोदावरी नदीवर चासनळी,मोर्वीस आणि कोकमठाण येथे घाट बांधण्यासाठी तसेच कुंभारी,कोपरगाव बेट आणि संवत्सर घाट विकसित करण्यासाठी निधी मिळावा.घाट परिसराला जोडणारे रस्ते,विद्युत रोषणाई आणि परिसर सुशोभीकरण करण्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आपण या भेटीत केली.त्यास मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अनुकूल प्रतिसाद दिला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close