जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
क्रीडा विभाग

…या संस्थेतील युवकाची भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपदी निवड !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)  

  कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक कुस्ती केंद्रातील कोच विवेक नायकल यांची स्लोवाकिया येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत फ्री स्टाईल कुस्तीत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.भारतीय पैलवानांच्या तयारीसाठी आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरणार असल्याचे बोलण्यात आहे.हि उद्यापासून ता.२० ऑगस्ट पासून सुरू होत आहे.

आत्मा मालिक कुस्ती केंद्रातील कोच विवेक नायकल.

विवेक नायकल यांची आत्मा मालिक कुस्ती केंद्रात त्याची जडणघडण झाली आहे.वयाच्या २९ व्या वर्षी त्याला हि मोठी संधी मिळाली आहे.युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या जागतिक संघटनेच्या मान्यतेने यास्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.या पूर्वी मार्च महिन्यात पार पडलेल्या लेव्हल 2 इंटरनॅशनल कोचींग कोर्स मध्ये त्यांनी एफ श्रेणीत उत्तम यश संपादन केले होते.

      प्रशिक्षक विवेक कोच यांचे वडील भारत नायकल हे देखील आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळीत आहेत.त्यांनीही आंतरराष्टीय कुस्ती स्पर्धत भारतीय संघाच्या प्रशिक्षकत पदाची जबाबदारी यापूर्वी यशस्वीरीत्या सांभाळली आहे.विवेक यांच्या निवडीबद्दल बोलताना ते म्हणाले,”आत्मा मालिक कुस्ती केंद्रात त्याची जडणघडण झाली आहे.वयाच्या २९ व्या वर्षी त्याला हि मोठी संधी मिळाली आहे.युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या जागतिक संघटनेच्या मान्यतेने यास्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.या पूर्वी मार्च महिन्यात पार पडलेल्या लेव्हल 2 इंटरनॅशनल कोचींग कोर्स मध्ये त्यांनी एफ श्रेणीत उत्तम यश संपादन केले होते.तसेच 2024 मध्ये अल्बेनिया-युरोप येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत देखील त्याने भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली होती.त्यांच्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close