जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवावा – …यांचे आवाहन

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)  

   विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवावा.आपली विचारधारा स्पष्ट ठेवून ध्येयाकडे वाटचाल करावी असे प्रतिपादन जीएसटीचे सेवानिवृत्त कमिशनर चंद्रकांत मंचरे यांनी नुकतेच कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहे.

कोपरगाव हेल्पिंग हॅन्ड्स संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले तो क्षण.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे,उत्तमराव भडांगे यांनी कै.काळूजी भडांगे यांच्या स्मरणार्थ एक लाख रुपयांची कायमस्वरूपी ठेव,किशोर सारडा यांनी १० हजार रुपये,तर चंद्रकांत मंचरे आणि प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांनी प्रत्येकी ११ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

   आजच्या स्पर्धात्मक आणि आधुनिक युगात शिक्षण हे प्रत्येक मुलाच्या प्रगतीचे मूलभूत साधन बनले आहे.मात्र,वाढत्या महागाईमुळे आणि शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे दर्जेदार शिक्षण घेणे सर्वसामान्य व गरीब कुटुंबांतील विद्यार्थ्यांसाठी कठीण होत चालले आहे.अशा परिस्थितीत,विद्यार्थ्यांना आर्थिक आणि सामाजिक स्तरावर मदत करणाऱ्या धर्मदाय संस्थांची गरज कमालीची वाढली आहे.ही गरज पूर्ण करण्यासाठी कोपरगाव शहरातील सरकारी लेखा परीक्षक दत्तात्रय खेमनर यांच्या पुढाकाराने हेल्पिंग हॅन्ड्स संस्थेच्या माध्यमातून मोठे योगदान सुरू केले आहे.त्यांनी कोपरगाव शहर आणि तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब,हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेच्या वतीने उच्च शिक्षणाकरिता प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत देण्यात आली त्याचे धनादेश वाटप नुकतेच एका सोहळ्यात करण्यात आले त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी सदगुरु गंगागिरीजी महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे हे होते.

कोपरगाव शहर आणि तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब,हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेच्या वतीने उच्च शिक्षणासाठी मदत करण्यात आली तो क्षण.

   सदर प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक दत्तात्रेय खेमनर,अविनाश घैसास,के.जे.सोमैया महाविद्यालयाचे विश्वस्त संदीप रोहमारे,लोकपंचायत संस्थेचे अध्यक्ष विजय थोरात, पुरुषोत्तम पगारे,विठ्ठलराव शिंदे,डॉ.रमेश सोनवणे,अण्णासाहेब बावके,सुनील बोरा आदी मान्यवर उपस्थित होते.

  त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”निसर्ग जसा निःस्वार्थपणे प्रत्येक व्यक्तीला काही ना काही देतो,तसेच दत्तात्रेय खेमनर गेली १७ वर्षे ‘हेल्पिंग हॅन्ड्स’च्या माध्यमातून उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे आहेत.त्यांनी केलेले कार्य समाजातील अन्य घटकांना नक्कीच प्रेरणादाई असल्याचे त्यांनी शेवटी म्हटले आहे.

 .  यावेळी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय खेमनर म्हणाले की,”संस्थेने आज अखेर १३९ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी ७५ लाख ३२ हजार रुपयांची मदत केली आहे.मदत घेतलेले काही विद्यार्थी परत मागे वळून पाहण्यास तयार नाहीत.चालू वर्षापासून संस्थेने बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे.कोणतीही शासकीय मदत न घेता,संस्थेविषयी आस्था असलेल्या दानशूरांच्या मदतीतून हे कार्य हेल्पिंग हॅन्ड्सला मदत म्हणजे खर्च नसून,एका विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारा आनंद आहे.ही समाजाच्या भविष्याची गुंतवणूक आहे.विद्यार्थ्यांनी शिक्षण व वेळ या दोन शक्तींचा वापर करून देश,गाव व समाजाचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.
  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close