जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

कुंभारीच्या उपसरपंचपदी…यांची निवड!

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)  

  कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राहुल विश्वनाथ पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.आवर्तन पद्धतीनुसार तत्कालीन उपसरपंच कविता निळकंठ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी ही निवडणूक घेण्यात आली होती.

कुंभारी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राहुल विश्वनाथ पवार यांची बिनविरोध निवड झाल्यावर सत्कार करताना कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक प्रशांत घुले आणि त्यांचे सहकारी.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानामध्ये कोपरगाव तालुक्यात कुंभारी गावाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे.ग्रामपंचायत कमिटी,पदाधिकारी,कर्मचारी आणि ग्रामस्थांनी एकजुटीने केलेल्या उत्कृष्ट कामामुळे कुंभारी गावाला हे यश मिळाले असल्याचा दावा केला आहे.

  कुंभारी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच कविता निळकंठ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी ही निवडणूक घेण्यात आली होती.लोकनियुक्त सरपंच देवयानी घुले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या सभेत निवडणूक प्रक्रिया मोठ्या उत्साहात पार पडली आहे.उपसरपंच पदासाठी राहुल पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे.राहुल पवार यांच्या नावाची सूचना ग्रामपंचायत सदस्य दिलीप ठाणगे यांनी केली आहे.

     यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिलीप ठाणगे,रामराव चंदनशिव,रंजना गायकवाड,ज्योती अहिरे,कविता निळकंठ,मनीषा घुले,वैशाली बढे,रंजना वारुळे,अनिकेत कदम व संजय ठाणगे यांनी निवड प्रक्रियेत सहभाग घेतला.दरम्यान या निवडीनंतर उपस्थित ग्रामस्थांनी नवनिर्वाचित उपसरपंच राहुल विश्वनाथ पवार यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रशांत घुले,रामदास पवार,गुलाब मोरे,वसंत घुले,विकास वाघ,सुभाष बढे,संजय वारुळे,म्हसू पवार,भानुदास घुले,नानासाहेब पवार,ललित निळकंठ,गणेश निळकंठ,अभिजीत चकोरे,अण्णासाहेब कोकाटे,विश्वनाथ पवार,बाळासाहेब वाघ,नाना चंद्रभान पवार,ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानेश्वर  कहार यांच्यासह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसेवक ज्ञानेश्वर कहार भाऊसाहेब तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.हे.नूतन उपसरपंच राहुल पवार यांचे आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close