पर्यटन व तीर्थक्षेत्र
ग्रामहितासाठी ग्रामस्थानी एकत्र येण्याची गरज -..यांचे आवाहन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
ग्रामहीत डोळ्यासमोर ठेवून ग्रामस्थानी एकत्र येऊन काम केले पाहिजे.गावहिताचा कुठलाही प्रश्न असेल,तर तो सोडविण्यासाठी आमदार या नात्याने पहिले पाऊल आम्ही उचलू,असे प्रतिपादन विधानपरिषदेचे आ.विवेक कोल्हे यांनी एका कार्यक्रमात केले आहे.

“कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून काही महिन्यांपूर्वी उपबाजार जाहीर करण्यात आला होता.अशी माहिती देऊन त्यावर काही प्रमाणात राजकारण झाले असल्याचा आ.काळे गटाचे नाव न घेता आरोप केला आहे.मात्र,तांत्रिक अडचणींनंतर तालुक्यातील सर्व नेत्यांच्या उपस्थितीत उपबाजार समितीचे भूमिपूजन करण्यात आले असल्याचा आ.विवेक कोल्हे यांनी दावा केला आहे.
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या नव्या व्यावसायिक गाळ्यांचे उद्घाटन १० ऑगस्ट रोजी कोपरगाव बेट येथील महंत रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले.त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विलास भाकरे,उपाध्यक्ष दत्तात्रय पवार,सचिव शिवाजी वाघ,विश्वस्त संपत भाकरे,विलास जगझाप,राहुल वाणी यांच्यासह प्रवीण जगन्नाथ शिंदे,कैलास माळी,अशोक भाकरे,बाजीराव मांजरे,विलास माळी,ज्ञानदेव मांजरे,नारायण मांजरे,मनोज जगझाप,सुनील मांजरे,मनेष गाडे,विजय जाधव यांच्यासह ग्रामस्थ व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”सध्या चोहीकडे बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत असताना धामोरी येथे श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टअंतर्गत बांधण्यात आलेल्या नव्या व्यावसायिक गाळ्यांच्या माध्यमातून ४० उद्योजकांना व्यवसायाची संधी उपलब्ध होणार आहे.या माध्यमातून ते उद्योग-व्यवसाय यशस्वीरित्या करू शकतील.या ट्रस्टची स्थापना १९५४ साली झाली असून, आजवर ट्रस्टच्या कामकाजावर कुठलेही शिंतोडे किंवा ताशेरे ओढले गेले नाहीत.ट्रस्टच्या माध्यमातून सातत्याने विकासकामे करण्यात आली आहेत.आजवर ३१ व्यावसायिक गाळ्यांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून,आता नव्याने आणखी १० गाळे उभारण्यात आले आहेत.त्यामुळे स्थानिक छोटे व्यापारी व उद्योजकांना उद्योग-व्यवसाय सुरू करण्याची नवी संधी उपलब्ध झाली आहे.देवस्थान ट्रस्टची सुमारे सात एकर जागा शिल्लक असून,या ट्रस्टने तालुक्यातील इतर गावांसमोर आदर्श निर्माण केला आहे.आम्ही आणि आमचे कार्यकर्ते सतर्क राहून शासनाच्या सर्व योजना युवक व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढील काळात अधिक प्रभावीपणे काम करू,असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.राज्य शासनाच्या विविध योजना राज्यकर्ते व कार्यकर्ते म्हणून सर्वसामान्य उद्योजकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपली आहे.जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून उद्योग-व्यवसायासाठी विविध योजना उपलब्ध होत असतात.त्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ उद्योजकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी त्यांनी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून काही महिन्यांपूर्वी उपबाजार जाहीर करण्यात आला होता.अशी माहिती देऊन त्यावर काही प्रमाणात राजकारण झाले असल्याचा आ.काळे गटाचे नाव न घेता आरोप केला आहे.मात्र,तांत्रिक अडचणींनंतर तालुक्यातील सर्व नेत्यांच्या उपस्थितीत उपबाजार समितीचे भूमिपूजन करण्यात आले.त्यामुळे या उपबाजाराचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे.या उपबाजार समितीच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीमालाला योग्य भाव मिळावा,तसेच आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे भरती प्रक्रियेवर बंदी असल्याने मार्केट कमिटीला अधिकृत भरती करण्यास परवानगी मिळावी,यासाठी मंत्रिमहोदयांकडे विनंती करण्यात आली आहे.येत्या काही महिन्यांत कोपरगाव येथील उपबाजार सुरू करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले जाईल,असे आश्वासन आ.कोल्हे यांनी शेवटी उपस्थितांना दिले आहे.
सदर प्रसंगी श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विलास भाकरे यांनी प्रास्तविक केले तर उपाध्यक्ष दत्तात्रय पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.तर उपस्थितांचे आभार कैलास माळी यांनीही मानले आहेत.



