जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

यश हे नशिबाने नव्हे तर कठोर परिश्रमाने मिळते-धुमाळ

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   यश हे नशिबाने नव्हे तर स्पष्ट ध्येय,कठोर परिश्रम,प्रामाणिकपणा,शिस्त आणि वेळेचे योग्य नियोजन यांमधून प्राप्त होत असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक एन.बी.धुमाळ यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची वृत्ती विकसित होणे ही काळाची गरज असून,अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना स्वावलंबनाची प्रेरणा मिळते,महाविद्यालयातील उद्योजकता विकास कक्ष विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी आणि उद्योगाभिमुख दृष्टीकोन घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल”-डॉ.माधव सरोदे,प्राचार्य,श्री सद्गुरू गंगागीर महाराज महाविद्यालय,कोपरगाव.

  कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज महाविद्यालयात उद्योजकता विकास कक्ष,वाणिज्य व व्यवस्थापन विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता विकास कक्षाचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे होते.

सदर प्रसंगी डॉ.उज्वला भोर,यांसह कला आणि वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”प्रत्येक व्यक्तीला यशस्वी व्हायचे असते; परंतु यशाचा खरा मार्ग ओळखणारे आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारेच यशाच्या शिखरावर पोहोचतात.
विद्यार्थ्याने स्वतःची ओळख करून घेऊन आवडीच्या क्षेत्रात उत्कृष्टता साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर यश निश्चित मिळत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.

   यावेळी प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांनी,“विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची वृत्ती विकसित होणे ही काळाची गरज असून,अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना स्वावलंबनाची प्रेरणा मिळते,महाविद्यालयातील उद्योजकता विकास कक्ष विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी आणि उद्योगाभिमुख दृष्टीकोन घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल”असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला आहे.

   सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा.दिलीप भोये यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.प्रतीक्षा संवत्सरकर,कु.मयुरी देवकर यांनी केले उपस्थितांचे आभार  कला विभागाचे उपप्राचार्य डॉ.बंडेराव तऱ्हाळ यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close