जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दोन दुचाकींचा अपघात,तरुण गंभीर जखमी!

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहरातील पोलिस ठाण्याच्या जवळ असलेल्या जियो स्टोअर समोर नुकताच 5.30 वाजेच्या दरम्यान दोन दुचाकीमध्ये समोरासमोर अपघात झाला असून या अपघातात एक पोहेगाव येथील तरुण रोहित रमेश शिंदे (वय-23) हा गंभीर रित्या जखमी झाला असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे.याला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय सूत्रांनी दुजोरा दिला आहे.त्याला उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.मात्र त्यात त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारार्थ अन्यत्र हलवले असल्याची माहिती हाती आली आहे.

पोहेगाव येथील तरुण रोहित रमेश शिंदे हा आपले काम करण्यासाठी तहसील मध्ये आला होता.तो पोहेगाव येथील सेतू चालक सुरेश शिंदे यांचा पुतण्या असल्याची माहिती हाती आली आहे.त्याला अन्य एका दुचाकीस्वाराने समोरासमोर जोराची धडक दिली आहे.त्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्या उजव्या पायाची बोटे तुटली असल्याचे समजत असून डोक्याला गंभीर मार लागल्याने कानातून रक्त येत असल्याच्या खात्रीलायक माहिती हाती आली आहे.

   कोपरगाव शहर आणि तालुक्यातील राष्ट्रीय,राज्य मार्ग,आणि ग्रामीण रस्ते हा कायम चिंतेचा विषय राहिला आहे.त्यामुळे अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे अनेकांचे बळी गेले आहे.तरीही अपघात थांबण्याचे नाव घेत नाही.परिणामी अनेक प्रवासी,नागरिक,ग्रामस्थ यांचे हकनाक बळी जात असताना दिसून येत आहे.कोपरगाव शहरातील अतिक्रमणे हे आणखी एक दुखणे आहे.त्यातच मोकाट जनावरामुळे तर त्यात अजून भर पडत असल्याचे दिसून येत आहे.परिणामी त्यात अनेकांचे बळी जाण्याबरोबर वित्तीय हानी होते ती निराळीच आहे.त्याची मोजदाद नाही.अशीच एक घटना नुकतीच घडली असून यातील पोहेगाव येथील तरुण रोहित रमेश शिंदे हा आपले काम करण्यासाठी तहसील मध्ये आला होता.तो पोहेगाव येथील सेतू चालक सुरेश शिंदे यांचा पुतण्या असल्याची माहिती हाती आली आहे.त्याला अन्य एका दुचाकीस्वाराने समोरासमोर जोराची धडक दिली आहे.त्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्या उजव्या पायाची बोटे तुटली असल्याचे समजत असून डोक्याला गंभीर मार लागल्याने कानातून रक्त येत असल्याची माहिती हाती आली आहे.

  याबाबत आमच्या प्रतिनिधीने माहिती घेतली असता त्याला उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केली होते.मात्र त्याची गंभीर स्थिती पाहून त्याला अन्यत्र संदर्भांकित केले असल्याची माहिती हाती आली आहे.त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती हाती आली आहे.मात्र त्याला उपचारार्थ पुढे कोठे हलवले ही माहिती समजू शकली नाही.त्यामुळे पोहेगाव आणि परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close