समाजकल्याण विभाग
…या शहरात दिव्यांगांच्या निधीचे वितरण

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेल्या ५ टक्के निधीचे वितरण करण्यात आले.याअंतर्गत शहरातील सुमारे ४९० दिव्यांग बंधू-भगिनींना एकूण १४ लाख ९६ हजार रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिली आहे.

“दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ कोणत्याही अडचणीशिवाय,पारदर्शक व वेळेत मिळावा,ही कोपरगाव नगर परिषदेची भूमिका आहे.दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या ५ टक्के निधीचे नियमानुसार वितरण करून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्यात आली आहे.दिव्यांग बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी नगर परिषद सातत्याने प्रयत्नशील राहील”-पराग संधान, नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.
महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार नगरपरिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या एकूण वार्षिक उत्पन्नातून किमान ५ टक्के निधी दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे.हा निधी दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी वापरला जातो.या राखीव निधीतून दिव्यांग बांधवांना शैक्षणिक मदत,पादत्राणे,मोटारसाईकल,स्वयंरोजगारासाठी साधनसामग्री आणि घरकुल योजना यांसारख्या विविध कल्याणकारी सुविधा पुरवल्या जातात.कोपरगाव शहरात याचे वितरण नुकतेच मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.कोपरगाव शहरातील दिव्यांग बांधवांना वेळेत व पारदर्शकपणे आर्थिक लाभ उपलब्ध करून दिल्याबद्दल कोपरगाव नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान,मुख्याधिकारी अजित निकत,नगरपरिषदेचे गटनेते प्रसाद आढाव,सर्व सभापती,नगरसेवक तसेच दिव्यांग विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा भाजप दिव्यांग विकास आघाडी,कोपरगाव यांच्या वतीने सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष पराग संधान आपल्या मनोगतात म्हणाले,”दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ कोणत्याही अडचणीशिवाय,पारदर्शक व वेळेत मिळावा,ही कोपरगाव नगर परिषदेची भूमिका आहे.दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या ५ टक्के निधीचे नियमानुसार वितरण करून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्यात आली आहे.दिव्यांग बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी नगर परिषद सातत्याने प्रयत्नशील राहील.आ.विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील काळातही दिव्यांग हिताच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत त्यांचा लाभ पोहोचविण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले.
याप्रसंगी भाजप दिव्यांग विकास आघाडी,कोपरगावचे तालुकाध्यक्ष मुकुंद काळे,शहराध्यक्ष स्वप्निल कडू,योगेश गंगवाल,जयवंत मरसाळे,मुक्तार पठाण,गौरव गायकवाड, राजेंद्र झाल्टे,सुनील कोसंदल यांच्यासह मोठ्या संख्येने दिव्यांग बंधू-भगिनी उपस्थित होते.उपस्थितांनी दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी उपक्रमांचे स्वागत केले आहे.



