कोपरगाव तालुका
आपल्या पिताश्रींचे स्वप्न पूर्ण केले”-…या आमदारांचा दावा!

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आपल्या विधानसभा मतदार संघात जुन्या लोकप्रतिनिधींना विकास कामे करता आली नाहीत.त्यामुळे वारी कान्हेगाव पुलासह रस्त्यांची दुरावस्था झाली होती.मात्र आपल्याला लोकप्रतिनीधी म्हणून कामाची संधी मिळताच सुमारे वीस कोटी रूपये निधी मिळवून येथील पुलाचे काम करून दाखवले असल्याचा दावा करून आपण आपल्या पिताश्रींचे स्वप्न पूर्ण केल्याचा दावा कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला आहे.

“आपण विकास कामांना प्राध्यान्य देणारा आमदार आहे.निव्वळ बडबड करून नादी लावणारा नाही.मतदार संघाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्याचा आपला ध्यास आहे.गेल्या सहा वर्षात आपण माझे काम पाहिले आहे.काम करतो त्याच्या पाठीशी उभे रहा.त्यांना दिले तसे पस्तीस वर्ष मला द्या एकही विकास काम शिल्लक ठेवणार नाही”- आ.आशुतोष काळे,कोपरगाव विधानसभा मतदारसंघ.
कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीवर वारी-कान्हेगाव येथे २० कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या पुलाचे लोकार्पण आ.आशुतोष काळे यांचे हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामनाथजी कारवा होते.
सदर प्रसंगी सोमय्या केमिकल्सचे कार्यकारी संचालक सुहास गोडगे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे,संचालक सुधाकर रोहम,दिलीप बोरनारे, प्रशांत घुले,श्रावण आसने,सुरेश जाधव, जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर टेके,गौतम बँकेचे उपाध्यक्ष विजय रक्ताटे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान यावेळी वारी येथे आ.आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून मिळालेल्या बंदिस्त व्यायाम शाळेचेही लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले.पोलिओ केंद्रावर आलेल्या बालकांना पोलिओ डोस देऊन या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला असल्याचे दिसून आले आहे.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”स्व.कर्मवीर शंकरराव काळे यांचे संसदेतील मित्र केंद्रीय रस्ते राज्यमंत्री के.एच.मुनीअप्पा यांच्या सहकार्याने माजी आ.अशोक काळे यांनी २००४ ते २०१४ या दहा वर्षात विरोधी पक्षाचे आमदार असतांना देखील गोदावरी नदिवर पुलांची मालिका उभारली.त्यात धारणगाव-कुंभारी,चास नळी, कोपरगाव शहर व बेट,राज्य मार्ग ७ वरील देर्डे फाटा,तसेच सावळीविहीर-भरवस रस्त्यावरील सातमो-याजवळ,झगडे फाटा येथे,धामोरी रस्त्यावरील कुर्ला नाल्यावरील पूल अशा अनेक छोट्या मोठ्या पुलांचा समावेश आहे.त्यावेळी मागे राहिलेला वारी कान्हेगावचा पुल आता पूर्ण झाला आहे.चाळीस वर्षांपासून प्रलंबीत महत्वाचा प्रश्न सुटला असल्याचा दावा करून येथील सबस्टेशनची क्षमता पाच एमव्हीएवरून दहा एमव्हीए केली. शेतीला आणि घरगुती वीज ग्राहकांना देखील पुर्ण दाबाने वीज मिळू लागली.श्रीरामेश्वर देवस्थानला ‘क’ वर्ग दर्जा मिळवून देवून विकास कामांना ६५ लाख रूपयांचा निधी दिला.
यावेळी गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे संचालक विजय थोरात,जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे संचालक महेश लोंढे,नामदेव जाधव, वाल्मिक जाधव, नवनाथ जाधव, रावसाहेब टेके,सरपंच योगिता जाधव, उपसरपंच विजय गायकवाड,आदी मान्यवरांसह वारी,कान्हेगाव,सडे,शिंगवे, पुणतांबा,भोजडे आदी गावचे सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.


