जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
दळणवळण

…अन्यथा आपण बस आडवू -आ.काळेंचा इशारा

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   राज्यात शाळा महाविद्यालये सुरु झाले असून ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी बस ने प्रवास करत असतात.लांब पल्ल्याच्या बस छोट्या बस थांब्यावर थांबत नाहीत.बसची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना तासंतास बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागते.त्यामुळे लांब पल्ल्याच्या बसमध्ये जागा असल्यास विद्यार्थ्यांना बसमध्ये घ्यावे. बसमध्ये जागा असून देखील विद्यार्थ्यांना डावलणे योग्य नसून अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याला बस अडवावी लागेल असा ईशारा आ.आशुतोष काळे यांनी एस.टी.प्रशासनाला दिला आहे.

कोपरगाव येथील राज्य परिवहन मंडळाच्या आगारात नवीन बसचे उद्घाटन करताना आ.काळे आणि यांचे कार्यकर्ते,अधिकारी.

 

“आपण राज्यातील मान्यवरांच्या मदतीने यापूर्वी नवीन १० लालपरी बस व आता ०५ नवीन राजमाता जिजाऊ बस अशा एकूण १५ नवीन बस सव्वा वर्षात कोपरगाव बस आगाराला प्रवाशांच्या सेवेसाठी मिळविल्या आहेत.त्यामुळे निश्चितच या नवीन बसेसमुळे विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था पुन्हा एकदा रुळावर येण्यास मोठी मदत होणार आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

    राज्य परिवहन मंडळाच्या बसेस विद्यार्थ्यांसाठी न थांबणे ही अतिशय गंभीर बाब असून यावर उपाय म्हणून एसटी महामंडळाने १८००२२१२५१ हा विशेष टोल-फ्री हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे.या क्रमांकावर कॉल करून तुम्ही बस न थांबल्याची किंवा बस वेळेवर न आल्याची तक्रार थेट अधिकाऱ्यांकडे नोंदवू शकता असे जाहीर केले आहे.संबंधित समस्या सोडवण्यासाठी एसटी प्रशासनाने हेल्पलाईन सुविधा सुरु केली असून यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेऊन ही हेल्पलाईन कार्यान्वित केली आहे.बसेस न थांबल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास,थेट संबंधित आगार व्यवस्थापक आणि पर्यवेक्षकांवर निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचे घोषित केले आहे.मात्र याचा अनुभव काही केल्या प्रवासी आणि विद्यार्थ्यांना येताना दिसत नाही.परिणामी विद्यार्थ्यांची मोठी ससेहोलपट होताना दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर आज कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांनी आज कोपरगाव येथील राज्य परिवहन मंडळाच्या आगारात नवीन बसचे उद्घाटन केले त्यावेळी हा इशारा दिला आहे.त्यामुळे त्याकडे नागरिक मोठ्या औस्तुक्याने पाहत आहेत.

  सदर प्रसंगी आगार व्यवस्थापक अमोल बनकर,वाहतूक निरीक्षक अमित हांपे,आगार लेखाकार मिलिंद कोपरे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम,जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,माजी नगरसेवक मंदार पहाडे,राजेंद्र वाकचौरे,मेहमूद सय्यद,विजय त्रिभुवन,इम्तियाज अत्तार,वाल्मिक लहिरे, शैलेश साबळे,सोमेश आढाव,बाळासाहेब रुईकर,माजी नगरसेवक विरेन बोरावके,डॉ.अजय गर्जे,डॉ.आतिश काळे,संतोष मरसाळे,अशोक आव्हाटे,रमेश गवळी,बाळासाहेब आढाव,अजीज शेख,फकीर कुरेशी,दिनकर खरे,सचिन ठोळे,नवाज कुरेशी,डॉ.तुषार गलांडे,शुभम काळे,मनोज नरोडे,धनंजय कहार,सागर फडे,मुकुंद भूतडा,नितेश बोरुडे,सागर आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.

  त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”आपण राज्यातील मान्यवरांच्या मदतीने यापूर्वी नवीन १० लालपरी बस व आता ०५ नवीन राजमाता जिजाऊ बस अशा एकूण १५ नवीन बस सव्वा वर्षात कोपरगाव बस आगाराला प्रवाशांच्या सेवेसाठी मिळविल्या आहेत.त्यामुळे निश्चितच या नवीन बसेसमुळे विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था पुन्हा एकदा रुळावर येण्यास मोठी मदत होणार असली तरी अजून बस मिळविण्यासाठी माझा पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी संगितले.तसेच कोपरगाव आगारातील चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाल्यानंतर इलेक्ट्रिक बसची देखील मागणी केलेली असून त्या बस देखील प्रवाशांच्या सवेत लवकरच दाखल होणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.

  सदर प्रसंगी प्रास्ताविक आगार व्यवस्थापक अमोल बनकर यांनी केले तर सूत्रसंचालन शैलेश साबळे यांनी केले आहे.तर उपस्थिताचे आभार मिलिंद कोपरे यांनी मानले आहे.
   

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close