जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
संपादकीय

‘मातोश्री’ने पिंडीवरील विंचू शोधणे आवश्यक

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
 
   गेल्या काही दिवस आपण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो असल्याच्या माध्यमांत सुरू असलेल्या चर्चा निरर्थक असून त्या जाणीवपूर्वक पेरल्या जात असून त्यातून काहीही साध्य होणार नाही.आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना या पक्षाशी बांधील असून त्याबाबत कोणीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी नुकतेच आमच्या प्रतिनिधीशी बोलताना  केले आहे.

विजय वहाडणे              राजेंद्र झावरे    खा.भाऊसाहेब वाकचौरे

माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे हे गेल्या चाळीस वर्षात कोपरगाव शहर आणि तालुक्यातील शिवसेनेचा चेहरा बनले होते याला कोणीही अपवाद करण्याचे कारण नाही.त्यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर करूनही त्यांना पुन्हा एका कनिष्ठ नेत्यांना जाणीवपूर्वक डावलले असल्याचे उघड झाले आहे.परिणामी उद्धव ठाकरे यांच्या आदेशाची पायमल्ली झाली आहे.त्यात कोपरगाव तालुक्यातील ईशान्य गडावर कट शिजून त्यात शिवसेनेच्या काहीना हाताशी धरून आपली डाळ शिजवून घेतली असल्याची बाब लपून राहिली नाही.त्यामुळे या पक्षाची अशीच वाताहत होत राहिली तर हा पक्ष इतिहास जमा होण्यास वेळ लागणार नाही.

  याबाबत सविस्तर वृत्त असे की,” महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू आहे.उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खिंडार पाडण्यासाठी आणि ठाकरे गटातील खासदारांना आपल्या पक्षात सामील करून घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही कथित राजकीय खेळी आखल्याचे बोलले जात आहे.ठाकरे गटातील ९ पैकी तब्बल ७ खासदार बंड करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होण्याची पुडी सोडून दिली असून तशी शक्यता वर्तवली जात आहे.या हालचालींमध्ये एका महत्त्वाच्या खासदाराला थेट केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याचीही चर्चा रंगली होती.वास्तविक शिवसेनेच्या शिंदे गटाने याबाबत ठाकरे सेनेचे खच्चीकरण करण्यासाठी हा डाव रचला असल्याची चर्चा होत आहे.परिणामी शिवसेनेचे एखादे खासदार आपल्या मतदार संघातील सामाजिक काम करण्यासाठी जरी संबंधित खात्याच्या मंत्र्याला भेटले तरी त्यावरून माध्यमात वावडी उठवली जात आहे.तोच प्रयोग पश्चिम बंगालमध्ये राबवला गेलाअसून महाराष्ट्रातही तोच कित्ता गिरविण्याचे आणि प्रयोग करण्याचे काम सुरू आहे.शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांना अशाच जाळ्यात अडकवायचे काम मोठ्या जोमाने सुरू असून त्याची मिडिया ट्रायल सुरू आहे.मिडियाचे असू द्या पण जेव्हा पक्षाचे वरिष्ठ नेते शिर्डीत येतात आणि त्यांची साधी कल्पनांची खा.भाऊसाहेब वाकचौरे यांना देण्यात येत नाही की त्याची तारीख जुळवणी करण्याची तसदी घेतली जात नाही याला काय म्हणायचे ? शिवाय त्यांच्या संपर्क कार्यालयाला त्याची साधी कल्पना नसते याला काय म्हणावे ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.(की केली जात आहे) त्यामुळे केंद्रीय समितीचा पंजाबसह सहा राज्यांचा दौरा आटोपून खा.वाकचौरे हे शिर्डीत आले असताना त्यांनी या हवाहवाई प्रश्नांना उत्तर दिले असून अफवा पसरविणाऱ्या चोख उत्तर दिले आहे.उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यात वर्तमान काळात नगरपरिषद निवडणुकांपासून शिवसेनेचे वर्तन बऱ्याच वेळा संशयास्पद वाटू लागले आहे.कोणाचा पायपूस कोणाच्या पायात नाही अशी,” न भूतो “स्थिती उद्भवली आहे.कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत निवडणुकीत नगराध्यक्ष आणि नगरसेवक आदी पदे ही जनता सेनेच्या पदरात टाकणार असताना सेनेच्या वरिष्ठ वर्तुळात असणाऱ्या नेत्यांनी नको असलेल्या आणि जनतेत स्थान नसलेल्या किंनपट लोकांना संधी देऊन आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला असल्याचे आढळून आले आहे.माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे या आजन्म निष्ठावानाला पक्षाच्याबाहेर काढण्यात सोयिस्कर षडयंत्र राबवले गेले होते.राजेंद्र झावरे हे कोपरगाव शहर आणि तालुक्यातील शिवसेनेचा चेहरा बनले होते याला कोणीही अपवाद करण्याचे कारण नाही.त्यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर करूनही त्यांना पुन्हा एका कनिष्ठ नेत्यांना जाणीवपूर्वक डावलले असल्याचे उघड झाले आहे.आणि उद्धव ठाकरे यांच्या आदेशाची पायमल्ली केली असल्याचे उघड झाले आहे.त्यात कोपरगाव तालुक्यातील ईशान्य गडावर कट शिजून त्यात शिवसेनेच्या काहीना हाताशी धरून आपली डाळ शिजवून घेतली असल्याची बाब लपून राहिली नाही.पुढे काय  झाले हे सर्व कोपरगाव शहर वासियानी पाहिले आहे.सेनेचा तब्बल 23 वर्षांनी हात तोंडाशी आलेला घास घरच्या भेद्यानी हिसकावून घेतला आहे.’कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ” कशाला म्हणतात त्याचा दाहक अनुभव सेनेच्या वरिष्ठांना नक्कीच आला असणार.त्यांनी आपल्या कनिष्ठावर टाकलेला विश्वास टाकून आपलाच गळा कापून घेतला असल्याचे त्यांना चटके आता समजले असणार.

कोपरगाव नगरपरिषद.

 

ज्यांनी प्रस्थापितांविरुद्ध संघर्ष करून तालुक्यात आपले स्थान निर्माण केले.त्यासाठी आपल्या जीवाचे रान केले त्याच लोकांच्या संगतीला आणि पंगतीला बसण्यास वरिष्ठ नेते सांगणार असतील तर ही राजकीय आत्महत्या ठरवणे आवश्यक होते.मात्र त्याच लोकांना डोक्यावर घेण्याचे पाप वरिष्ठ नेत्यांनी केले आहे.या (ना) लायक लोकांचे जोडे उचलण्यास लावण्याचे काम वरिष्ठ नेते करण्यास सांगणार असतील त्यांनी एक तर थांबणे आवश्यक होते किंवा संबंधित कार्यकर्त्यांनी आत्महत्या करणे आवश्यक होते.मात्र या दोन्हीतील एकही घडले नाही परिणाम आता समोर आहेच.त्यांच्या वाट्याला भीष्माचार्यांचे पात्र आले आहे.

   कोपरगाव शहर आणि तालुक्यात याच पक्षाच्या नावाखाली साखर सम्राटांकडून गोळा केलेला मलिदा आणि त्यावरून झालेली भांडणे सोशल मिडियात प्रसारित झाली आहेच.त्यामागे कोण होते ही बाब सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट झाली आहे.जी अवस्था निष्ठावान झावरे यांची झाली तीच भाजपचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या बाबत झाली.ज्यांनी प्रस्थापितांविरुद्ध संघर्ष करून तालुक्यात मोठ्या कष्टाने आपले स्थान निर्माण केले.त्यासाठी आपल्या जीवाचे रान केले त्याच लोकांच्या संगतीला आणि पंगतीला बसण्यास वरिष्ठ नेते सांगणार असतील तर ही राजकीय आत्महत्या ठरणे आवश्यक होते.मात्र त्या लोकांना डोक्यावर घेण्याचे पाप वरिष्ठ नेत्यांनी केले आहे.या (ना) लायक लोकांचे जोडे उचलण्यास लावण्याचे काम वरिष्ठ नेते करण्यास सांगणार असतील संबंधित कार्यकर्त्यांनी आत्महत्या का केल्या नाही असा रास्त सवाल निर्माण होतो.मात्र त्या झाल्या नाही याला कारण सेना आणि भाजप सारख्या पक्षांची राजकीय विचारांची झपाट्याने झालेली घसरण हे होय.या बाबी सहज सोप्या झालेल्या नाही.वरिष्ठ नेत्याना साखर सम्राटांकडून हवा होता पक्ष निधी.मात्र ज्यांनी आयुष्यभर पक्षासाठी आपले जोडे झिजवलेले होते.त्यांची या वरिष्ठ नेत्यांनी क्षणांत माती करून टाकली आहे.साखर सम्राटांकडून उत्तर नगर जिल्ह्यात जाणीवपूर्वक तालुक्यातील विरोधक संपून टाकण्याचे षडयंत्र राबवले जात आहे.यात काही निष्ठावान बनण्याचे सोंग घेऊन,मेंढीचे पांघरूण घेऊन,लांडगे बनून पक्षात घुसले आहे.मात्र त्यांचा बंदोबस्त ज्यांनी करायचा तेच त्यांना आपल्या क्षणिक अर्थकारणासाठी राजाश्रय देत असल्याचे निष्ठावांनाची मोठी गळचेपी आणि मोठी पंचायत झाली आहे.त्यासाठी मुंबईस्थित काही कनिष्ठ नेते पिंडीवरील विंचू बनले आहे.त्यामुळे हा पक्ष आगामी काळात अस्ताला गेला तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.या विंचवाला मारण्यासाठी हाती वहाण घेणे पाप ठरत असून न मारले तर तो डंख मारल्याशिवाय राहत नाही अशी स्थिती उबाठात उद्भवली आहे.त्याचाच परिपाक असून साखर सम्राटांकडून सुपाऱ्या घेऊन पक्ष संपवण्याचे काम काही लोक इमाने इतबारे करत असल्याची बाब उघड होत आहे.मात्र वरिष्ठ नेत्यांनाच पक्षाची काळजी नसल्यावर बाकी कनिष्ठ पुढाऱ्यांनी हात धुऊन घेतला तर नवल नाही.या सुपारी बहादरांचा फटका आणि झळा आता शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांना बसु लागल्या आहे.त्यांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे.नगर जिल्ह्यातील (दोन्ही उबाठा आणि शिंदे सेना) शिवसेना त्याला अपवाद नाही.श्रीरामपूर येथे उद्योग मंत्री यांना जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त करावी लागली त्याला कारणही असेच आहे.मोठा घर पोकळ वासा अशी या पक्षाची स्थिती आहे.पदे वाटायला माणसे मिळत नाही हे वास्तव कसे वरिष्ठ नेते कसे नाकारणार ? हा खरा प्रश्न आहे.त्यामुळे उरल्यासुरल्या शिवसैनिकांनी आता आपल्या पायावर धोंडा पाडून ठणाणा करून घेण्याअगोदर वेगळी वाट निवडणे सोयीचे वाटले तर आश्चर्य वाटावयास नको.शिवसेना जिवंत राहणे हे मुंबई शहर आणि राज्याच्या हिताचे आहे.पण त्याची जाणीव जर पक्षश्रेष्ठींना जर नसेल तर त्या पक्षाला कोण वाचवणार ब्रम्हदेव….! या पिंडीवरील विंचवाला शोधण्याचे काम आता,’मातोश्री’ने करणे अभिप्रेत आहे इतकेच…!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close