धार्मिक
…या गावात कीर्तन महोत्सवाचा ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न!

न्यूजसेवा
संवत्सर-(वार्ताहर)
संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतील रामवाडी या ठिकाणी कीर्तन महोत्सव व पारायण सोहळ्याचे ध्वजारोहण कोपरगाव बेट येथील महंत रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.

‘सप्ताह ध्वजारोहण’ वारकरी संप्रदायात किंवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या ‘सप्ताहाची’ सुरुवात करण्यासाठी आणि देवाचा जयघोष करण्यासाठी केला जाणारा पवित्र ध्वजस्तंभ सोहळा मानला जातो.तो संवत्सर,रामवाडी येथे प.पू.महंत रमेशगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते व मान्यवर भाविक-भक्तांच्या उपस्थितीत आज सकाळी ९.३० वाजता श्री राम मंदिरासमोर मोठ्या उत्साहात मान्यवर संत महंतांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे.
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतील रामवाडी या ठिकाणी आदिक मासानिमित ज्येष्ठ शु.०५ गुरुवार दि.२१ मे पासून ज्येष्ठ शुद्ध १२ गुरुवार दि.२८ मे दरम्यान सायंकाळी ०७ ते ०९ वाजेच्या दरम्यान कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे.

दरम्यान या धार्मिक कार्यक्रमासाठी श्री क्षेत्र गोदाधामचे महंत रामगिरीजी महाराज व महंत रमेशगिरीजी महाराज यांची उपस्थिती लाभणार आहे.किर्तन महोत्सव व गाथा पारायण सोहळ्याचा ध्वजारोहण समारंभ प.पू. महंत रमेशगिरीजी महाराज आश्रम यांच्या शुभहस्ते व मान्यवर भाविक-भक्तांच्या उपस्थितीत दि.१७ मे रोजी सकाळी ९.३० वाजता श्री राम मंदिरासमोर मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
सदर कार्यक्रमासाठी ह.भ.प.शास्त्री महाराज शिंगवे,गोदावरी परजणे तालुका दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,वाल्मीक महाराज जाधव,कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे,बाजार समितीचे माजी संचालक दिलीप बोरणारे,संवत्सर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विवेक परजणे,शिवाजी ठाकरे, दिलीप ढेपले,सोमनाथ निरगुडे,भरत बोरणारे, लक्ष्मण साबळे,भिकनराव कर्पे,प्रभाकर तुषार बारहाते,फकीरा बोरणारे,श्री.नेवसे,श्रीराम गिरे,रावसाहेब भाकरे,अशोक जाधव,सुभाष बिडवे,पावडे बाबा,संवत्सर परिसरातील समस्त भजनी मंडळ व बहुसंख्येने गावकरी उपस्थित होते.या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.



