जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

सार्वजनिक स्वच्छतागृहांचा प्रश्न सुटणार-नगराध्यक्ष

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहरातील सार्वजनिक स्वच्छतेचा दीर्घकालीन प्रश्न आता मार्गी लागणार असून स्वच्छ महाराष्ट्र अभियान (ना.) २.० अंतर्गत कोपरगाव नगरपरिषदेस सामुदायिक व सार्वजनिक शौचालये तसेच स्वच्छतागृहांच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी तब्बल १ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात ७५ सीट्सना मंजुरी मिळाली असून लवकरच आणखी ७५ सीट्स मंजूर होण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिली आहे.

  

“कोपरगाव शहरात येणाऱ्या शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना तसेच दिवसभर व्यवसायात गुंतलेल्या व्यापाऱ्यांना व महिला भगिनींना स्वच्छ व सुलभ सार्वजनिक स्वच्छतागृहांची मोठी अडचण भासत होती.या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांत आधुनिक,स्वच्छ व सुसज्ज शौचालये उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे”-पराग संधान,नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

  स्वच्छ भारत अभियान ही भारत सरकारने २ ऑक्टोबर २०१४ रोजी महात्मा गांधींच्या १४५ व्या जयंतीनिमित्त सुरू केलेली देशव्यापी स्वच्छता मोहीम आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट रस्ते,शहरे आणि ग्रामीण भाग स्वच्छ करणे,उघड्यावर शौचमुक्त (पीडीएफ) भारत निर्माण करणे आणि घनकचरा व्यवस्थापन सुधारणे हे आहे.वैयक्तिक व सार्वजनिक शौचालये बांधणे,कचऱ्याची विल्हेवाट लावणे,आणि जनजागृती करणे आदी कामे केली जातात.कोपरगाव नगरपरिषदेने यासाठी पावले उचलले आहे.त्यातून ही तरतूद झाली आहे.

पराग संधान,नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

   नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिलेल्या माहितीनुसार,शहरात येणाऱ्या शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना तसेच दिवसभर व्यवसायात गुंतलेल्या व्यापाऱ्यांना व महिला भगिनींना स्वच्छ व सुलभ सार्वजनिक स्वच्छतागृहांची मोठी अडचण भासत होती.या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांत आधुनिक,स्वच्छ व सुसज्ज शौचालये उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार असून शहराच्या स्वच्छतेतही लक्षणीय सुधारणा होईल असा त्यांचा कयास आहे.

   यासाठी माजी आ.स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांचे विशेष सहकार्य व पाठपुरावा झाल्याने हा निधी उपलब्ध होण्यास मदत झाल्याचेही नगराध्यक्षांनी नमूद केले.त्यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर होऊ शकला असून शहराच्या विकासासाठी हे मोठे पाऊल ठरणार आहे.याबाबत उपनगराध्य जितेंद्र रणशूर व आरोग्य सभापती वैभव आढाव यांनी समाधान व्यक्त केले आहे.

   नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने या कामांना लवकरात लवकर सुरुवात करून दर्जेदार व टिकाऊ स्वच्छतागृहांची उभारणी करण्यावर भर दिला जाणार आहे.स्वच्छता,आरोग्य आणि नागरिकांच्या सोयीसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असून कोपरगाव शहराला अधिक स्वच्छ,सुंदर आणि सुसज्ज बनविण्यासाठी हा उपक्रम मोलाचा ठरेल,असा विश्वासही यावेळी नगराध्यक्ष संधान यांनी शेवटी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close