संपादकीय
बिनविरोध उमेदवाराचे लाख वेळा अभिनंदन…!

न्यूजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव नजीक असलेल्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी आज भाजपच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला अर्ज दाखल केला ही निवडणूक बिनविरोध झाल्यात जमा असल्याने काल कोपरगाव शहरात कोल्हे समर्थकांनी विवेक कोल्हे यांचे जवळपास पन्नास जे.सी.बी.च्या सहाय्याने फुलांची उधळण आणि घोडे नाचवून जोरदार स्वागत केले आहे.कोल्हे यांच्या उमेदवारीमुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघाला आता दोन उमेदवार मिळणार आहे.

दिल्लीपतींकडे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेंचे वजन कमी करण्यासाठी मोहरा म्हणून विवेक कोल्हे यांची राज्यस्तरीय नेतृत्वाला गरज भासू लागली होती.आणि त्याचा गणेशा गणेश सहकारी कारखान्यातून झाला असल्याचे मानले जात आहे.पारंपरिक विरोधक आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाल्यानंतर विशेषता ही गरज जास्त भासू लागली होती.त्यातून कर्जत मार्गे भाजप विवेकाचा हा जन्म झाला असल्याचे मानले जात आहे.
राज्यात होत असलेल्या विधानपरिषद निवडणुकांच्या उमेदवारांपैकी भाजपची 6 नावांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.भाजपच्या संसदीय कमिटीच्या मान्यतेनंतर भाजपने अधिकृतपणे महाराष्ट्रातील पाच विधानपरिषदांच्या जागेसाठी पाच नावांची घोषणा केली.तर,विधानपरिषदेच्या एका पोटनिवडणुकीसाठी एक म्हणजेच एकूण सहा उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.त्यामध्ये,काँग्रेसमधून भाजपात आलेल्या प्रज्ञा सातव यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तर,अहिल्यानगरमधील जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे विरोधक म्हणून विवेक कोल्हेंना संधी विधानपरिषदेची संधी मिळाली असल्याचे मानले जात आहे.याशिवाय भाजपने सुनिल कर्जतकर,माधवी नाईक,संजय भेंडे,विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांना उमेदवारी जाहीर केली आहे.विवेक कोल्हे यांचं नाव निश्चित झाल्यापासून चर्चा सुरु होत्या. विवेक कोल्हे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती,त्यामुळे ही शक्यता वाढली होती.

दरम्यान कोपरगाव शहरातील आणि मतदार संघातील नागरिकांना आता दोन्ही नेते एकाच महायुतीत असल्याने तालुक्यात विरोधक चिमटीत धरण्यापुरता शिल्लकच न राहिल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांच्या भाषेत कोपरगाव शहरास आता “रोज दोन वेळेस स्वच्छ पिण्याचे आणि पश्चिमेचे पाणी मिळणार..! बंद अंचलगाव,संवत्सर,कान्हेगाव,चितळी रेल्वे स्टेशन परत चालू होणार..!,डुकरांचा जलतरण तलाव माणसांसाठी हस्तांतरीत होणार..!,बाजार समितीत शेतकऱ्यांना अति उच्च भाव मिळणार..!,कोपरगावचे रस्ते खड्डे मुक्त होणार..! झगडेफाटा ते वडगाव पान रस्ता होणार…! आदी.. आदी…! शुक्राचार्यांची नगरी आता सोन्याची लंका होण्याची स्वप्ने पाहण्यास हरकतं नसावी.
दरम्यान या शिवाय नगर जिल्ह्यातील राजकीय समतोल साधण्यासाठी पूर्वी माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांचे नाव जिल्ह्यात आणि राज्यात चर्चेत असायचे त्यांची जागा आता आजोबा जाऊन नातू विवेक कोल्हे यांनी घेतल्याचे मानले जात आहे.अहिल्यानगर जिल्ह्यात पालक मंत्री विखे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अंतर्गत संघर्ष असून नगर जिल्ह्यात एकाधिकारशाही जन्मास न येण्यासाठी आणि दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचेकडे मंत्री विखे यांनी वारंवार जाणे ही बाब फडणवीस यांना खटकली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.आणि दोन वर्षापूर्वी गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि विवेक कोल्हे यांच्या गटाला मंत्री विखे यांच्या मतदार संघात विजय मिळाल्याने विवेक कोल्हे यांचे राजकीय वजन वाढले होते.परिणामी त्यांची गणना विखे विरोधक म्हणून राजकीय वर्तुळात होऊ लागली होती.किंबहुना तशी ती राज्य स्तरीय नेत्यांची गरज बनली होती.सन -2022 मध्ये आघाडी सरकार पाडण्यात आणि आमदारांना खेचून आणण्यात मंत्री विखे यांचे मोठे योगदान राहिले होते.त्यांना रसदच त्यांनी पुरवली असल्याची त्यावेळी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.त्यामुळे दिल्लीपतींकडे विखेंचे वजन कमी करण्यासाठी मोहरा म्हणून विवेक कोल्हे यांची राज्यस्तरीय नेतृत्वाला गरज भासू लागली होती.आणि त्याचा गणेशा गणेश सहकारी कारखान्यातून झाला असल्याचे मानले जात आहे.पारंपरिक विरोधक आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाल्यानंतर विशेषता ही गरज जास्त भासू लागली होती.दिल्लीत आणि मुंबईत जास्त भीती कोणाची वाटत असेल तर ती महाराष्ट्रातील साखर सम्राटांची असे मानले जात आहे.राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि खा.शरद पवार यांना तर ‘मराठा स्ट्राँग मॅन’ ही ओळख मिळाली होती.मात्र आता त्यांचे झालेले वय आणि राष्ट्रवादीचा उत्तरोत्तर कमी होत चाललेला दबाव आता भाजपला दुसरे नेतृत्व शोधण्यास भाग पाडले असल्याचे बोलले जात आहे.त्यातून हे नाव पुढे आले असल्याचे मानले जात आहे.त्याला विधानसभेचे सभापती राम शिंदे यांच्यापासून सुरुवात झाली असल्याचे मानले जात आहे.शिंदे यांचे सभापतीचे आसन आणि सिंहासन स्थिर झाल्यानंतर त्यांनीच ही क्लृप्ती दिली असल्याचे मानले जात आहे.त्यातून विखे विरोधक मागील दाराने का होईना जिवंत ठेवण्याचे काम अंतर्गत गरजेतून आणि विखेंवर अंकूश ठेवण्याच्या गरजेतून निर्माण होऊन ते भाजपकडून मनोभावे केले जात असल्याचे मानले जात आहे.परिणामी त्यांनी दिलेल्या कानमंत्रातून राज्याच्या राजकीय अवकाशात विवेक कोल्हे यांचा जन्म झाला असल्याचे मानले जात आहे.आपली भाजप (!) निष्टा आणि दिलेला शब्द हे केवळ शब्दांचे बुडबुडे असल्याचे मानले जात आहे.एरव्ही हीच सर्व कारखानदार मंडळी उद्या भाजपला उतरती कळा लागली आणि जहाज बुडू लागले तर पहिल्या क्रमांकाने जहाजातून बाहेर उडी मारणार हे सांगण्यास कोणा ज्योतिषाची गरज नाही.आज पदे ही केवळ भाजपची गरज नाही तर ती लोकशाहीच्या चाकोरीत निर्माण झालेले साखर आणि शैक्षणिक संस्थानिक यांना आमदार,खासदार आणि मंत्री आदी पदांची कवच कुंडले ही त्यांच्या कारखानदारीसाठी आवश्यक मानली जात आहे.याशिवाय त्यात होत असलेल्या आर्थिक गैरव्यवहारासाठी महत्त्वाची मानली जात आहे.काल पैसा पांढरा करण्यासाठी आवश्यक मानला जात आहे.ती नसतील तर कधी ईडीची ईडा-पिडा कधी अंगावर येईल याची काही शाश्वती नाही.वर्तमानात राहुरी विधानसभा निवडणुकीत घडलेले राजकारण हे कोपरगावची दुसरी पुनरावृत्ती मानली जात आहे.त्यामुळे सर्व कारखानदार कधी एकदा भाजपच्या जहाजात बसतो असे त्यांना झाले आहे.उर्वरित मंडळी जरी आगामी काळात त्यात जाऊन बसली तर कोणाला आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही.कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी दादा आणि भाऊ (भैय्या) आपल्या आणि मतदार संघाच्या विकासासाठी आमदार झाले या भ्रमात न राहिले तर उत्तम.

विदर्भात आणि महाराष्ट्राच्या इतर ग्रामीण भागांत रेड्यांच्या टकरी हा एक थरारक आणि पारंपारिक खेळ म्हणून ओळखला जातो,जो सहसा बैलपोळा किंवा दिवाळीच्या काळात आयोजित केला जातो.
लोकसत्ताचे संपादक अरुण टिकेकर विदर्भातील या रेड्याच्या टकरीची एक गोष्ट कायम लिहित,त्यात दोन बलदंड रेड्याच्या टकरी दिवसभर सुरू असतात.दिवस मावळतीला येतो पण त्यातील एकही रेडा जिंकत नाही आणि हारतही नाही.मात्र ज्याच्या शेतात या झुंजी होतात त्याच्या शेताची मात्र वाट लागली जाते.अशी अवस्था कोपरगाव विधानसभा मतदार संघात न येवो म्हणजे कमावली..!
साखर सम्राटांना वर्तमानात कोणतेही पद फुकट मिळत नाही हे अंतर्गत वर्तुळात सक्रिय असलेला कोणीही कार्यकर्ता नाकारणार नाही.मंत्रिपद, उमेदवारी आदींसाठी त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागत असते.सन-2004 च्या निवडणुकीत एका लोकप्रतिनिधीला पार्टी बदलून तिकीट घेण्यासाठी तब्बल चार खोके मोजावे लागले होते.तेही एका नेत्याच्या दारात चार तास तिष्ठत बसल्यावर.हे उदाहरण पुरेसे बोलके आहे.आघाडी सरकार घालविल्यावर नगर जिल्ह्यातील एका नेत्यास जवळपास दीड ते दोन हजार खोके मजल्यावर तिसऱ्यांदा महत्वाच्या मंत्री पदावर शपथ विधी पार पडला होता याचा विसर पडू देता येणार नाही.राज्यातील साखर सम्राट हे कोणताही पक्ष असो आणि त्यांचा नेता असो.त्यांचेकडे निवडणूक आणि पद वाटपात कमाईचे साधन म्हणून पाहतो हे वास्तव आता दडून राहिलेले नाही.आणि हा खजिना मराठवाडा आणि विदर्भात निवडणुकीसाठी सर्रास उधळला जातो हे ही झाकून राहिलेले नाही.त्यामुळे कोणी कितीही उर बडवून सांगितले की आमचे एवढे वजन तेवढे वजन त्यात काही सत्यांश नाही.साधारण पंधरा वर्षापूर्वी एका कनिष्ठ कार्यर्कत्याला एका साखर सम्राटाच्या वरचे पद दिले होते;याची आठवण खास करून दिली पाहिजे.त्यावेळेला सदर कार्यकर्त्यांचे पद काढण्यासाठी तालुक्यातील एका नेत्याने पक्षनिधी नावाच्या गोंडस नावाखाली मोठी आर्थिक किंमत मोजली होती आणि बारा तासाच्या आत सदर निष्ठावान कार्यकर्त्यांचे अभिनंदनाचे फलक उतरविण्यास पाडले होते.याचे स्मरण यावेळी केले तर उत्तम.या विधानपरिषदेत झालेला घोडेबाजार यथावकाश बाहेर येणार आहेच.त्यावेळी सर्व पितळ उघड होणार आहेच.तूर्त अभिनंदन करायला आपल्याला काय हरकत आहे.म्हणून बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवाराचे लाख वेळा अभिनंदन केले तरी हरकत नाही यांच्या आनंदात मिठाचा खडा कशाला बुवा !
दरम्यान कोपरगाव शहरातील आणि मतदार संघातील नागरिकांना आता दोन्ही नेते एकाच महायुतीत असल्याने तालुक्यात विरोधक चिमटीत धरण्यापुरता शिल्लकच न राहिल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांच्या भाषेत कोपरगाव शहरास आता “रोज दोन वेळेस स्वच्छ पाणी मिळणार पाणी..! बंद अंचलगाव,संवत्सर,कान्हेगाव,चितळी रेल्वे स्टेशन परत चालू होणार..!,डुकरांचा जलतरण तलाव माणसांसाठी हस्तांतरीत होणार..!,बाजार समितीत शेतकऱ्यांना अति उच्च भाव मिळणार..!,कोपरगावचे रस्ते खड्डे मुक्त होणार..! झगडेफाटा ते वडगाव पान रस्ता होणार…! कोपरगाव मधील प्रसिद्ध दोन गटांचे टोळी युध्द थांबणार..! कोपरगाव धुळ मुक्त होणार..! कोपरगाव बस स्थानक धुळ,खड्डे,दुर्गंधी मुक्त होणार..! गोदावरी नदीचे वाळू उपसा बंद होणार..! भुमिगत गटारी मधून पाणी वाहू लागणार…! ईशान्य गडावरील रस्ता पुन्हा एकदा होणार..! बंद पडलेली भुमिगत वीज तारांची योजना उजेडात येणार..! एकेचाळीस कोटी आणि दिडशे कोटीचे पाणी योजनेतील भुमिगत पाईपलाईन मधून दोनदा पाणी वाहणार..! आदी भाग्योदयाची वाट पाहायला नागरिकांना काय हरकत आहे…?



