जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या शाळेला राज्यस्तरीय विज्ञान जथ्था पुरस्कार!

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ आयोजित डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या विद्यालयास दिला जाणारा राज्यस्तरीय ‘विज्ञान जथ्था’ पुरस्काराने आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुलला सन्मानित करण्यात आले आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

“आत्मा मालिक पॅटर्नचे हे यश असून याअंतर्गत अभ्यासक्रमाचे काटेकोर नियोजन,तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर,तयारी शिबीराचे आयोजन,नैदानिक चाचण्या,सराव परीक्षा,तज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थी व शिक्षकांचे परीश्रम यामुळे हे यश साकारले आहे”-नंदकुमार सूर्यवंशी,अध्यक्ष, जंगली महाराज आश्रम,कोकमठाण.

  

  डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा ही मुंबई विज्ञान शिक्षक संघटनेद्वारे १९८१ पासून इयत्ता ६ वी आणि ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी एक प्रमुख वैज्ञानिक परीक्षा आहे. या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे हा आहे.कोपरगाव तालुक्यातील कोकणठाण येथील आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुल सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यात प्रथम स्थानावर आहे.डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये गुरुकुलाचे २६ विदयार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झाली.त्यामध्ये कृष्णा लोखंडे,श्लोक कदम सुवर्णपदकासह राज्यात प्रथम,आरव नाणेकर,राम जाधव,श्रेयश भवर रौप्य पदकासह राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे.

  मुंबईतील यशवंतराव नाट्यमंदिरामध्ये डॉ.अशोक नगरकर यांच्या हस्ते सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुलास विज्ञान जथ्था पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.याप्रसंगी डॉ. मधुबाला चिंचाळकर,अच्युतराव माने,आत्मा मालिकचे प्राचार्य निरंजन डांगे,विभागप्रमुख सचिन डांगे,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

  दरम्यान या यशस्वी विदयार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे विभाग प्रमुख सचिन डांगे,पर्यवेक्षक  गणेश रासने,अथर्व फाऊंडेशनचे शिवम तिवारी,शिक्षक प्रियांशू कुमार,हरीश तेली,गौरव कापडणीस,अभिलाषा उन्हाळे यांचे मार्गदर्शन लाभले होते.या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी,उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे,सरचिटणीस हनुमंत भोंगळे,कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन,विश्वस्त प्रकाश गिरमे,प्रदिपकुमार भंडारी,शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक,वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्षे,मिरा पटेल आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close