जाहिरात-9423439946
ग्रामविकास

घरकुल बांधा अन्यथा निधी घेणार परत-…यांचा इशारा

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   घरकुल बांधकामासाठी ३१ मार्च पर्यंत अंतिम मुदत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत मंजूर झालेल्या ५  हजार २३४ लाभार्थ्यांना घरकुलांच्या बांधकामाबाबत कोपरगाव तालुक्यात प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून आगामी 31 मार्चपर्यंत प्रत्यक्ष काम सुरू न केल्यास संबंधित घरकुले रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असून सदर लाभार्थ्यांकडून मिळालेल्या अनुदानाची वसुली करण्यात येणार असल्याचा इशारा कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी एक प्रसिद्धी पत्रकान्वये दिला आहे.

  

“कोपरगाव तालुक्यातील जे लाभार्थी बांधकाम सुरू करून पुढील हप्त्यांसाठी पात्र ठरतील,त्यांना निधी वितरणाची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे.कोपरगाव प्रशासनाने सर्व लाभार्थ्यांना तातडीने काम सुरू करण्याचे आवाहन केले असून,अन्यथा घरकुल रद्द व अनुदान वसुलीची कारवाई करण्यात येणार आहे”-संदीप दळवी,कोपरगावपंचायत समिती.

  याबाबत सविस्तर वृत्त असे की,”प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही ग्रामीण भागातील बेघर आणि कच्च्या घरांत राहणाऱ्या कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध करून देणारी केंद्र सरकारची योजना असून या योजनेअंतर्गत,मैदानी भागात ₹१.२० लाख आणि डोंगराळ भागात ₹१.३० लाखांचे आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे.यात शौचालय,वीज आणि पाणी सुविधांसह दिल्या जातात.कोपरगाव तालुका पंचायत समिती हद्दीत गत वर्षी ६०३४ घरकुलांना मंजुरी मिळाली होती.त्यातील मंजुरीनगर अद्याप १ हजार ९७८ लाभार्थ्यांनी अद्याप बांधकाम सुरू केलेले नाही अशी धक्कादायक माहिती हाती आली आहे.प्रशासनाच्या माहितीनुसार,मंजूर घरकुलांपैकी १ हजार ९७८लाभार्थ्यांना पहिला हप्ता घेऊनही एक वर्ष उलटून गेले आहे तरी मात्र अद्याप पायाभरणीही केलेली नाही.त्यांना कोपरगाव पंचायत समिती मार्फत वारंवार नोटीसा देऊन असल्या आहेत.यामुळे शासनाच्या उद्दिष्टांवर परिणाम होत असून,निधी अडकून पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन कामाची पाहणी केली असून,जे लाभार्थी ठराविक मुदतीत काम सुरू करणार नाहीत त्यांच्यावर घरकुल रद्द करण्याची कारवाई होणार आहे.

   दरम्यान यात काही प्रकरणांमध्ये ग्रामसभेमार्फतही निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.तर काही ठिकाणी प्रशासनाकडून सांगण्यात आले की,घरकुलासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य दिले जाते.परंतु अनेक लाभार्थी विविध कारणांमुळे काम प्रलंबित ठेवत असल्याने इतर पात्र नागरिकांना त्याचा लाभ मिळू शकत नाही.त्यामुळे 31 मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली असून,त्यानंतर कठोर पावले उचलली जाणार आहेत.केंद्र आणि राज्य शासनाकडून गरजूंसाठी हक्काचे घर देण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला जात असताना अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र समोर आले.

  दरम्यान,जे लाभार्थी बांधकाम सुरू करून पुढील हप्त्यांसाठी पात्र ठरतील,त्यांना निधी वितरणाची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे.कोपरगाव प्रशासनाने सर्व लाभार्थ्यांना तातडीने काम सुरू करण्याचे आवाहन केले असून,अन्यथा घरकुल रद्द व अनुदान वसुलीची कारवाई करण्यात येणार असल्याचे पंचायत समिती कोपरगावचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी स्पष्ट बजावले आहे.त्यामुळे कामचुकार घरकुल लाभार्थ्यांत खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close