जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

उपनगराध्यक्षांसह नऊ जणांवर गुन्हा,कोपरगावात खळबळ!

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

  कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी येथे दलित कुटुं‌बावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी उलट पीडितांवरच गंभीर गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत सकल आंबेडकरी समाज व आदिवासी संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.या कथित पक्षपाती कारवाई विरोधात कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आल्या प्रकरणी कोपरगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर,विजय त्रिभुवण,अनिल रणनवरे, विनोद भोसले,रा.निफाड,प्रकाश दुशींग,इब्राईम उर्फ मुन्नाभाई शेख रा.मायगाव देवी,मंगेश औताडे रा. कोळपेवाडी,उत्तम पवार रा.चांदेकसारे, महेमुद मन्वर सय्यद आदी नऊ आरोपीवर कोपरगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

 

उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांचेसह अन्य आरोपींनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दरवाजाजवळ पाय-यावर गैरकायद्याची मंडळी जमवुन बेकायदेशीरपणे बसुन पोलीस ठाण्यात येणारे जाणारे लोकांचा रास्ता अडवुन बेकायदेशीरपणे आंदोलन करुन पोलीसां विरुध्द,”संदिप कोळी हाय हाय”,दांडा लेके हल्ला बोल”,काठी लेके हल्ला बोल,बोल मेरे बहना हल्ला बोल” असे जोर जोरात आक्रमक व चिथावणीखोर घोषणाबाजी केली तसेच हुल्लडबाजी करुन हुल्लडबाजी करुन जिल्हाधिकारी,अहिल्यानगर यांचेकडील प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केले आहे.

  याबाबत सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी येथे दलित कुटुं‌बावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी उलट पीडितांवरच गंभीर गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत सकल आंबेडकरी समाज व आदिवासी संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.या कथित पक्षपाती कारवाई विरोधात कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर नुकतेच ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.

  याप्रकरणी येथील शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना निवेदन देण्यात आले होते.दरम्यान या आंदोलनात त्यांनी पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांचे विरोधात काही आक्षेपार्ह घोषणा करून शांतता सुव्यवस्था धोक्यात आणली होती असा पोलिसांचा दावा आहे.त्यातून कोपरगाव शहर पोलिसांत हा गुन्हा फिर्यादी पोलिस कॉन्स्टेबल राम गोरक्षनाथ खारतोडे तालुका पोलिस ठाणे यांनी दाखल केला आहे.

त्यांनी त्यात म्हटले आहे की,”वरील तारीख वेळी व ठिकाणी यातील आरोपीत मजकुर यांनी मळेगाव थडी येथील घटनेच्या निषेर्धात पोलीस निरीक्षक कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन यांचे पक्षपाती व अन्यायकारक भुमिके विरुध्द कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दरवाजाजवळ पाय-यावर गैरकायद्याची मंडळी जमवुन बेकायदेशीरपणे बसुन पोलीस ठाण्यात येणारे जाणारे लोकांचा रास्ता अडवुन बेकायदेशीरपणे आंदोलन करुन पोलीसां विरुध्द,”संदिप कोळी हाय हाय”,दांडा लेके हल्ला बोल”,काठी लेके हल्ला बोल,बोल मेरे बहना हल्ला बोल” असे जोर जोरात आक्रमक व चिथावणीखोर घोषणाबाजी केली तसेच हुल्लडबाजी करुन हुल्लडबाजी करुन जिल्हाधिकारी,अहिल्यानगर यांचेकडील प्रतिबंधात्मक आदेश क्रमांक डी.सी./कार्या ९ व १/४२५/२०२६ दि.१२मार्च २०२६ चे उल्लघन केले असल्याचे म्हटले आहे.वरील मजकुरचे फिर्यादीवरुन कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा रजि.क्र.१२१/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १२६ (२),सह.म.पो.का.क.३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close