जाहिरात-9423439946
कृषी विभाग

कृषी विभागाची आजही मोठी कारवाई,खतसाठा जप्त,गुन्हा दाखल

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोऱ्हाळे येथे सेवा संस्थेच्या गोदामात बोगस खताचा साठा असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाताच पथकाने धाड टाकत संशयित खताचा साठा जप्त केला असून  यासंदर्भात देर्डे कोऱ्हाळे येथील कृषी सेवा केंद्र चालक व इतर तीन कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालक यांच्याविरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असताना आज त्याच गावातील इसम मातोश्री कृषी सेवा केंद्राचे संचालक उद्धव अर्जुन शिलेदार यांचे विरुद्ध पुन्हा एक गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी आमचे प्रतिनिधी दिली आहे.त्यामुळे खळबळ उडाली आहे.

गुण नियंत्रण अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाई 304 गोण्या दिसत आहेत.

दरम्यान जप्त केलेल्या खताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे,गुण नियंत्रक निरीक्षक गणेश बिरदवडे व कृषी विभागाच्या पथकाने ही कारवाई केली असल्याच्या बातम्या आहेत.

  दरम्यान जप्त केलेल्या खताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे,गुण नियंत्रक निरीक्षक गणेश बिरदवडे व कृषी विभागाच्या पथकाने ही कारवाई केली असल्याच्या बातम्या आहेत.

गुण नियंत्रक निरीक्षक गणेश बिरदवडे व कृषी विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

दरम्यान आज देर्डे कोऱ्हाळे येथील कारवाईत 20;20;20 च्या 299 गोण्या तर 19;19;19 च्या 05 अशा एकूण 304 गोण्या आढळून आल्या आहेत.या कारवाईत गुण नियंत्रक निरीक्षक गणेश बिरदवडे,कोपरगाव तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे,पॅरादिप फॉस्फेट कंपनीचे अधिकारी,पोलिस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

  याबाबतची सविस्तर वृत्त असे की,”गुजरातसह सोलापूर,पुणे आणि नांदेड येथून बोगस खते अहिल्यानगर जिल्ह्यात विक्रीसाठी आल्याची दोन प्रकरणे काही दिवसांत उघडकीस आली आहेत.यातील काही कंपन्यांवर बनावट खतविक्री प्रकरणात यापूर्वी गुन्हे दाखल असूनही त्याच कंपनीचे खत पुन्हा बाजारात आल्याचे दिसत आहे कोपरगावमध्ये गत ११ फेब्रुवारीला सोलापूरच्या महालक्ष्मी फर्टिलायझर्स कंपनीच्या नावाने २८.५० मेट्रिक टन बोगस खत मिळून आले होते.या खतांमध्ये आवश्यक घटकांची मात्रा ९५ टक्क्यांपेक्षा कमी आढळून आली होती.१७ फेब्रुवारीला ४७७ बनावट खतांच्या गोण्यांसह एक ट्रक कोपरगावमध्येच जप्त करण्यात आला असताना काल पुन्हा देर्डे कोऱ्हाळे या ठिकाणी हा प्रकार उघडकीस आला होता तर आजही पुन्हा  ही कारवाई केली असल्याची माहिती मिळाल्याने अवैध रासायनिक खते विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

   कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोऱ्हाळे येथे बोगस खताचा साठा रिपकेजिंग केल्या जात असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाल्याने याठिकाणी पथकाने तातडीने धाड टाकत संशयित खताचा साठा जप्त केला आहे.जप्त केलेल्या खताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.तपासणीनंतर अहवालात छापा टाकलेले खत बनावट असल्याचे समजले.त्यानंतर गुण नियंत्रक निरीक्षक गणेश बिरदवडे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून देर्डे कोऱ्हाळे येथील कृषी सेवा केंद्र चालक व इतर तीन कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     कृषी विभागाच्या महिनाभरातील सलग तिसऱ्या कारवायांमुळे बोगस खत विक्रेत्यांमध्ये मोठीच खळबळ उडाली आहे.या तीनही कारवयांमध्ये एकूण ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर ५१ मेट्रिक टन संशयित खतसाठा जप्त करण्यात आला आहे.शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कारवाईचे जोरदार स्वागत केले आहे.प्रशासनाकडून अशा प्रकारांविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत कृषी विभागाकडून देण्यात आले होते त्यांची आज पुन्हा एकदा अनुभूती आली आहे.

   कोपरगाव तालुक्यातील विविध कृषी सेवा केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बोगस खत विक्री होत असल्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर कृषी विभागाने कडक भूमिका घेत शेतकऱ्यांची बोगस खत विक्री करून फसवणूक करणाऱ्यांना मोठा दणका दिला आहे.महिनाभराच्या कालावधीत तीन ठिकाणी कारवाई करत संबंधित कृषी सेवा केंद्र चालकांसह संबंधित कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.आतापर्यंत एकूण तिन्ही कारवायातील बोगस खत असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुण नियंत्रक निरीक्षक गणेश बिरदवडे यांनी कंपन्यांची नावे जाहीर केली आहेत.

शेतकऱ्यांनी खरेदीची पावती घ्यावी

  शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठा खरेदी करताना पक्के देयक विक्रेत्यांकडून घ्यावे.खरेदीत कुठे काही शंका आढळल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क करावा असे आवाहन कोपरगाव तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close