कोपरगाव शहर वृत्त
…या नगरपरिषदेतील उपनगराध्यक्ष होणार अपात्र !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजप कोल्हे गटाचे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी आपल्या जातीचा प्रांताधिकाऱ्यांकडून चुकीचा दाखला दिल्याने त्या विरुद्ध शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांचेकडे व जातपडताळणी कार्यालयाकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सागर निंबा आहेर यांनी तो दाखला अपात्र ठरविण्यासाठी १६ फेब्रुवारी रोजी अपील दाखल केले असल्याची माहिती त्यांचे वकील एम.यू.सय्यद यांनी दिली आहे.त्यामुळे कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान या प्रकरणात कोपरगाव नगरपरिषदेत असलेल्या सत्ताधारी भाजप कोल्हे गटाचे अजून चार ते पाच नगरसेवक असे अपात्र होणार असल्याची माहिती ॲड.एम.यू.सय्यद यांनी दिली आहे.त्यामुळे भाजप कोल्हे गटाला हा मोठा दणका मानला जात आहे.
कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक दि.२० डिसेंबर २०२५ रोजी संपन्न झाली आहे.त्यात भाजप कोल्हे गटास १९ जागा तर काळे गटास ०११ जागा तर शिवसेना बंडखोर गटास ०४ जागा प्राप्त झाल्या आहेत.आता स्वप्न रंजन संपून आता विकास रथाची चाके धावू लागली आहे.त्यातच ०३ फेब्रुवारी रोजी स्थायी समितीची पहिलीच बैठक नगराध्यक्ष पराग संघान यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे.त्यात त्यांनी शहरातील महिलाना निवडणुकीत आश्वासन दिल्या प्रमाणे आज स्वच्छता गृह बांधण्यासाठीची तरतूद ०.५० कोटी लाख रुपयांवरून वाढवून ०१ कोटी तर शाळांची दुरावस्था दूर करण्यासाठी ०.५० कोटी रुपयांवरून ०१ कोटी तर शहरातील विविध बागांचे सुशोभीकरण कारणासाठी ०१ कोटींची तर आपत्ती व्यवस्थापना तथा शहराचे आरोग्य आणि रोगराई निर्मूलन आदीसाठी ०.६० कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली असल्याचे जाहीर केले असताना आता त्यांना त्यांच्या (आवडत्या) राष्ट्रवादी या विरोधी पक्षाने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अडचणीत आणण्याचा चंग बांधला असल्याचे दिसून येत आहे.त्यातील एक घटना आज उघड झाली आहे.त्यात प्रभाग क्रमांक ०९ मध्ये निवडणूक लढवलले भाजपचे नगरसेवक व पुढे या सत्रात पहिले उपनगराध्यक्ष पदाचे मानकरी ठरलेले जितेंद्र रणशूर यांचे विरुद्ध त्यांचे पराभूत विरोधक सागर आहेर यांनी दंड थोपटले आहे.व त्यांच्या जातीच्या प्रमाणपत्रास शिर्डी येथील अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांचे समोर आव्हान दिले आहे.या शिवाय जात पडताळणीच्या अहिल्यानगर येथील कार्यालयात आव्हान दिले असल्याची माहिती सागर आहेर यांचे वकील एम.यू.(मुन्ना) सय्यद यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.त्यामुळे आता दोन गटात सत्तास्पर्धेची रंगत वाढताना दिसत आहे.ॲड.सय्यद यांनी या आधीच आंचलगाव येथील एक हिंदू-खाटिक या जातीचे खोटे प्रमाणपत्र दाखल केलेल्या व त्या अंतर्गत घरकुल आणि सरकारी जागेत अतिक्रमण करणाऱ्या सरपंच यांना अपात्र केल्याची घटना ताजी आहे.त्यामुळे या प्रकरणाला गंभीर मानले जात आहे.

याबाबत आमच्या प्रतिनिधीने उपनगराध्यक्ष रणशूर यांचे म्हणणे जाणून घेतले असता त्यांनी,”ही आता न्यायालयीन बाब असून आपण त्याबाबत न्यायालयात लढणार असल्याचे सांगून आपली बाजू मांडण्यासाठी आपण वकील देणार आहे.अधिकचे बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे.
दरम्यान या प्रभाग क्रमांक मध्ये जितेंद्र रणशूर यांना एकूण १०९१ मते मिळाली आहे तर त्यांचे राष्ट्रवादीचे स्पर्धक उमेदवार सागर आहेर यांना ८२४ मते मिळाली होती.त्यात रणशूर यांचे विरोधक आहेर यांचा २६७ मतांनी पराभव झाला होता.तो आहेर आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला असल्याचे या प्रकारावरून दिसून येत असल्याचे मानले जात आहे.याबाबत आमच्या प्रतिनिधीने उपनगराध्यक्ष रणशूर यांचे म्हणणे जाणून घेतले असता त्यांनी,”ही आता न्यायालयीन बाब असून आपण त्याबाबत न्यायालयात लढणार असल्याचे सांगून आपली बाजू मांडण्यासाठी आपण वकील देणार आहे.अधिकचे बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे.

दरम्यान या प्रकरणात कोपरगाव नगरपरिषदेत असलेल्या सत्ताधारी भाजप कोल्हे गटाचे अजून चार ते पाच नगरसेवक असे अपात्र होणार असल्याची माहिती ॲड.एम.यू.सय्यद यांनी दिली आहे.त्यामुळे भाजप कोल्हे गटाला हा मोठा दणका मानला जात आहे.त्यामुळे आगामी काळात भाजप कोल्हे गट आपला निभाव कसा लावणार याकडे कोपरगाव शहरातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.



