जाहिरात-9423439946
क्रीडा विभाग

…या विद्यालयात वार्षिक क्रीडा दिन उत्साहात संपन्न

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव हद्दीतील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित गौतम पब्लिक स्कूल मध्ये नुकताच पालक भेट व वार्षिक क्रीडा दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.

  

   या मध्ये विद्यार्थ्यांनी पावरी नृत्य,मल्लखांब,सीलंबम,लाठी-काठी,तसेच एरियल सिल्क मल्लखांब यांसारख्या विविध क्रीडाप्रकारांचे दमदार सादरीकरण केले आहे.विशेषतः एरियल सिल्क मल्लखांब या थरारक क्रीडा प्रकाराने उपस्थित पालकांची मने जिंकून घेतली आहे.तसेच यलो हाऊस,ग्रीन हाऊस,ब्ल्यू हाऊस व ऑरेंज हाऊस या चारही हाऊसच्या विद्यार्थ्यांमध्ये ॲथलेटिक रनिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धांमध्ये ऑरेंज हाऊस व ब्ल्यू हाऊस यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावत वार्षिक क्रीडा महोत्सवातील विजेतेपद मिळवले आहे.विजेत्या हाऊसला प्राचार्य नूर शेख यांच्या हस्ते चॅम्पियन्स ट्रॉफी प्रदान करून गौरविण्यात आले आहे.वर्षभरात शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत केलेल्या विशेष कामगिरीबद्दल तसेच राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर विविध स्पर्धांमध्ये सहभागी आणि विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना पालकांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.

    दरम्यान या क्रीडास्पर्धा पार पडल्यानंतर पालक भेट कार्यक्रम पार पडला आहे.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक,बौद्धिक व सर्वांगीण विकासासाठी पालक व शिक्षक यांच्यातील समन्वय महत्वाचा असतो.या उद्देशाने पालक भेटीचे आयोजन करण्यात आले यावेळी पालकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचा दावा केला आहे.पालकांनी आपल्या पाल्यांबाबतच्या अडचणी,अपेक्षा व सूचना मांडल्या.यावेळी पालकांना स्कूलमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.विद्यार्थ्यांच्या प्रगती बाबत पालकांनी समाधान व्यक्त केले.

   दरम्यान क्रीडा दिन यशस्वी करण्यासाठी क्रीडा विभाग प्रमुख सुधाकर निलख,हॉकी कोच रमेश पटारे,फुटबॉल कोच आढाव,क्रिकेट कोच सय्यद इसाक,एरियल सिल्क मल्लखांबच्या प्रशिक्षक कुमारी गौरी यांनी विशेष परिश्रम घेतले त्यांना प्राचार्य नूर शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते.

         

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close