शैक्षणिक
संस्कृती टिकवण्यासाठी साहित्य महत्वाचे-..यांचे प्रतिपादन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यातील विविध लेखक,समाज सुधारकांचे योगदान महत्वाचे असून आपली संस्कृती टिकवायची असेल तर साहित्य टिकवावे लागेल असे आवाहन प्रसिद्ध युवाकवी प्रा.अमोल चिने यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“भाषा मानवी जीवनाचा एक अनिवार्य भाग आहे.भाषेशिवाय मानवाचा विकास शक्य नाही.साहित्य हे मानवी मस्तीष्काचे खाद्य असून मनातील विचार विकसित करण्यासाठी साहित्याचे वाचन-मनन आवश्यक आहे”-प्रा.जिभाऊ मोरे,वाङ्मय मंडळ,के.जे. सोमैया महाविद्यालय,कोपरगाव.
राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने राज्यात येत्या १४ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत असतो.या अनुषंगाने राज्यातील केंद्र सरकार तसेच राज्य शासनाच्या राज्यस्तरीय,विभागीय आणि जिल्हास्तरीय शासकीय आणि अधिनस्त कार्यालयांनी मराठी भाषेसंदर्भातील विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना मराठी भाषा विभागामार्फत करण्यात आल्या होत्या त्यानुसार कोपरगाव येथील गोदावरीतीरी असलेल्या के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या वतीने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या वाङ्मय मंडळ व वाद-विवाद मंडळ तसेच हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ.जिभाऊ मोरे होते.
याप्रसंगी प्रा.प्रवीण मोरे,प्रा.अमोल बंद्रे, प्रा.किरण सोळसे,प्रा.विजय सोमासे आदी प्रमुख मान्यवरासह विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर प्रसंगी प्रा.अमोल चिने यांनी मराठीचे महत्त्व,मराठीचा गोडवा तसेच वाचनाचे महत्त्व व ‘एआय’मुळे समाजामध्ये होणारा बदल यासारख्या विषयांवर प्रकाश टाकून,साहित्याचे मानवी जीवनातील महत्त्व अफाट आहे असेही सांगितले.या प्रसंगी त्यांनी आपल्या तपोवन,नांदाय जातेय लेक,गावाकडे आता खटले राहिले नाही आदी कविता सादर करून विद्यार्थ्यांना खिळवून ठेवले असल्याचे दिसून आले आहे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रो.डॉ.जिभाऊ मोरे म्हणाले की, “भाषा मानवी जीवनाचा एक अनिवार्य भाग आहे.भाषेशिवाय मानवाचा विकास शक्य नाही.साहित्य हे मानवी मस्तिष्काचे खाद्य असून मनातील विचार विकसित करण्यासाठी साहित्याचे वाचन-मनन आवश्यक आहे. देशाच्या विकासामध्ये साहित्यिक,लेखक व कवींची भूमिका खूप मोठी आहे.ग्रंथासारखा माणसाचा दुसरा मित्र नाही” असे शेवटी सांगितले आहे.
या समारंभासाठी मराठी विभाग प्रमुख प्रा.संपत आहेर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला तर सूत्रसंचालन प्रा.विनोद शिनगारे यांनी केले. प्रा.नवनाथ वैद्य यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठी विभाग प्रमुख प्रा.संपत आहेर,प्रा.विनोद शिनगारे,प्रा.नवनाथ वैद्य यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.



