जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

आ.काळेंच्या गाडीस माजी आ.कोल्हेच्या माजी नगराध्यक्षांचे सारथ्य ?

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


   कोपरगाव शहरात आज आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडवर आज एक चमत्कारिक घटना घटना घडून आली असून हाजी मंगल कार्यालयात एक लग्न लागल्यानंतर आ.आशुतोष काळे यांना सोडण्याच्या बहाण्याने माजी आ.स्नेहलता कोल्हे गटाचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी सारथ्य केल्याची जोरदार चर्चा रंगली असून त्यातून विविध तर्ककुतर्कांना उधाण आले आहे.

  

“आ.आशुतोष काळे यांची चारचाकी सदर लग्नाच्या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये अडकली होती.त्यावेळी त्यांनी आपल्याला सोडून देण्याची विनंती केली असता आपण व माजी नगरसेवक कैलास जाधव या दोघांनी त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी सोडून दिले आहे.मात्र यात कोणतीही राजकीय भूमिका नाही कोणीही गैरसमज करून घेऊ नये”-राजेंद्र सोनवणे,माजी अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

 

कोपरगाव नगरपरिषदेचे कोल्हे गटाचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी आ.आशुतोष काळे यांना आपल्या वाहनातून सोडून दिले तो क्षण. 

  शिर्डीसह देशातील चौथ्या टप्प्यातील निवडणुका नुकत्याच मोठ्या उत्साहात पार पडल्या असून यात कोण निवडुन येणार यावर अनेकांच्या पैजा लागत असताना व आगामी काळात कोपरगाव सह राज्यातील नगरपरिषद निवडणुकांचा हंगाम तोंडावर असताना गत महिन्यात कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती साहेबराव रोहोम व माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,त्यांचे सुपुत्र यांच्यात तीळवणी उपबाजार मधील कामाच्या बिलाच्या कारणावरुन भर सभेत खडाजंगी झाली होती या पार्श्वभूमीवर आज संजयनगर येथील हाजी मंगल कार्यालयात आ.काळे गटाचे माजी नगरसेवक फकीर कुरेशी यांच्या मुलीचे लग्न मोठ्या उत्साहात आयोजित केले  होते.त्यासाठी कोपरगावचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आ.आशुतोष काळे यांचेसह शहरातील विविध पक्षाचे माजी अध्यक्ष,उपनगराध्यक्ष,माजी सभापती,माजी नगरसेवक आदी मान्यवरासंह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.लग्न आज दुपारी  १२.३० सुमारास मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.त्यावेळी अनेकांनी आपली पायधूळ झाडली होती.त्यावेळी तेथून निघताना मोठी गाड्यांची वर्दळ होती.त्यात गाड्या काढणे मुश्किल झाले होते.त्यात माजी आ.स्नेहलता कोल्हे गटाचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे हेही आवर्जून उपस्थित होते.त्यावेळी आ.आशुतोष काळे लग्न कार्यक्रम उरकल्यानंतर जाण्यास निघाले असता प्रवेशद्वाराच्या जवळ असताना त्यांना जाण्यासाठी चारचाकी गाडी नव्हती.(?) त्यावेळी त्यांनी जवळच उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांना आपल्याला महात्मा गांधी प्रदर्शन ट्रस्टच्या कार्यालयात सोडून देण्याची विनंती केली होती.त्यासाठी त्यांनी तात्काळ होकार भरला असून त्यांनी मोठया उत्साहात त्यांनी सोडून दिले आहे.

   दरम्यान या घटनेने कोपरगाव शहरात विविध चर्चांना उधाण आले असून माजी नगराध्यक्ष सोनवणे हे पक्षांतर करणार नाही ना ? अशी उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.सदर छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित झाले असून शहरात मोठी चर्चा सुरू आहे.

  दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने याबाबत माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी म्हटले आहे की,”आ.आशुतोष काळे यांची चारचाकी सदर लग्नाच्या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये अडकली होती.त्यावेळी त्यांनी आपल्याला सोडून देण्याची विनंती केली असता आपण व माजी नगरसेवक कैलास जाधव या दोघांनी त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी सोडून दिले आहे.मात्र यात कोणतीही राजकीय भूमिका नाही कोणीही गैरसमज करून घेऊ नये” असे आवाहन केले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close