जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विशेष दिन

महात्मा बसवेश्वरांच्या वचन स्तंभाचा लोकार्पण सोहळा संपन्न

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   महात्मा बसवेश्वर यांनी समाजातील अनिष्ट रूढी,परंपरा,चालीरीती यांना विरोध करून धार्मिकतेबरोबर विज्ञानवादी दृष्टिकोन समाजाला दिला असल्याचे प्रतिपादन नाशिक जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाचे जेष्ठ पत्रकार प्रकाश साबरे यांनी नुकतेच केले आहे.

   

महात्मा बसवेश्वर यांची जयंती कोपरगाव तहसील कार्यालयात तालुक्याचे विद्यमान आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते व तहसीलदार संदीपकुमार भोसले यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली तर तालुक्यातील कुंभारी येथे महंत राघवेश्वरानंदगिरी महाराज यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
   

  कोपरगाव शहरातील निवारा परिसरात महात्मा बसवेश्वर यांच्या ८९३ व्या जयंतीनिमित्त कशिदा निवासस्थानाजवळ महात्मा बसवेश्वर यांच्या वचन स्तंभाचे लोकार्पण लिंगायत समाजातील जेष्ठ पत्रकार प्रकाश साबरे यांच्या हस्ते करण्यात आले.त्या वेळी ते बोलत होते.

   सदर प्रसंगी लिंगायत संघर्ष समिती समन्वयक ओमप्रकाश कोयटे,कोपरगाव तालुका लिंगायत संघर्ष समिती अध्यक्ष अमोल राजुरकर,कोपरगाव नगरपालिका माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे,गोपीनाथ निळकंठ,भालचंद्र विभुते,संदीप कोयटे,सतीश निळकंठ,वाल्मीक निळकंठ,अतुल निळकंठ,श्याम जंगम, बाबासाहेब जंगम,नितीन भुसारे,गिरीश सोनेकर,अमोल साखरे,दिपक हिंगमिरे,दिलीप घोडके,प्रकाश घोडके,दिगंबर भुसारे,दिगंबर लोहारकर,छाया सोनेकर,कल्पना हिंगमिरे,मंगल साखरे,उज्वला सरडे आदींसह समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”लिंगायत समाजाचे नेते कोयटे यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य हे महात्मा बसवेश्वरांच्या विचारांशी सांगड घालणारे आहे.त्यांनी बसवेश्वरांच्या विचारांचे व वचनांचे आचरण करून शून्यातून विश्व निर्माण केले.तसेच समाजातील तळागाळातील बांधवांनाही बसवेश्वरांच्या विचारांच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे.

   लिंगायत समाजातील ललित निळकंठ यांची कुंभारी ग्रामपंचायत सदस्य पदी निवड झाल्याबद्दल व आरव निळकंठ याचा प्रकाश साबरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी आरव निळकंठ याने महात्मा बसवेश्वरांबाबत मनोगत व्यक्त केले आहे.


    सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्तविक लिंगायत संघर्ष समिती युवा अध्यक्ष प्रदीप साखरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कोपरगाव तालुका लिंगायत महिला मंडळ अध्यक्षा प्रीती साखरे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close