जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

   …या ठिकाणी गोदावरी नदी स्वच्छता अभियान

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
  
  कोपरगाव शहरातील हिंदू समाजाच्या सहभागाने बालराम प्राणप्रतिष्ठा आनंदोत्सव सोहळा गोदावरी नदीपात्राची स्वच्छता अभियान तसेच भगवा मोटार सायकल फेरी,गोदावरी मातेचे पूजन तसेच भक्तीमय संगीताचा कार्यक्रम लेझर शो,फायर शो अशा विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करुन मोठया उत्साहात करण्यात आला आहे.

  

वाढते नागरीकरण व औद्योगिकरणामुळे उपलब्ध पाण्यावरील ताण वाढला आहे.नद्यांमध्ये आलेल्या गाळामुळे त्यांची वहन व साठवण क्षमता कमी झाली आहे.या बाबींचा विचार करता नदीला जाणून घेणे आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांची सोडवणूक करण्यासाठी नव्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

वाढते नागरीकरण व औद्योगिकरणामुळे उपलब्ध पाण्यावरील ताण वाढला आहे.नद्यांमध्ये आलेल्या गाळामुळे त्यांची वहन व साठवण क्षमता कमी झाली आहे.या बाबींचा विचार करता नदीला जाणून घेणे आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांची सोडवणूक करण्यासाठी चला जाणूया नदीला या अभियानाखाली नदी संवाद यात्रेची राज्यात सुरूवात करण्यात आली आहे.कोपरगाव येथील गोदावरी नदीत प्रभु रामचंद्र मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्ताने नुकतीच नदी स्वच्छता करण्यात आली आहे.

सदर प्रसंगी कोपरगावची कन्या कु.सुरभी कुलकर्णी,कु.गौरी पगारे, आळंदीचा चैतन्य देवडे,नाशिकचा ऋषिकेश रिकामे,नागपूरची भाग्यश्री ढिकले यांचा भक्तिमय संगीताचा कार्यक्रम पार पडला आहे.

   सदर प्रसंगी गंगा गोदावरी आरती आ.आशुतोष काळे व त्यांच्या धर्मपत्नी चैताली काळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाली आहे.त्यावेळी माजी आ.स्नेहलता कोल्हे,संजीवनीचे अध्यक्ष विवेक कोल्हे,रेणुका कोल्हे,पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,माजी नगराध्यक्ष सुहासिनी कोयटे,महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,उमा वहाडणे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.सदर प्रसंगी कोपरगाव नगरपालिकेने संपूर्ण प्रमुख रस्ते,मंदिरांना विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

    सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगराध्यक्ष राजेंद्र,कलविंदर दडीयाल,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल,सुनिल फंड,अमित जैन,संतोष चवंडके,चेतन राणे,अनिल गायकवाड,चेतन खुबाणी,महेंद्र अमृतकर,मुकुंद भुतडा,कालु आव्हाड,सनी वाघ,माजी नगरसेवक कैलास जाधव,बबलु वाणी,दत्ता काले,विजय वाजे,अॅड.जयंत जोशी,विकास आढाव,प्रमोद जवरे,मयुर विधाटे,राहुल जाधव विजय वहाडणे,विनायक गायकवाड,सुनिल गंगुले, निलेश दगडे,संतोष चव्हाण,पिंन्टु लांबोळे,गणेश आढाव,गौरव गुप्ता आदींनी परिश्रम घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close