जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विशेष दिन

राजमाता जिजाऊ यांना कोपरगावात अभिवादन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजी महाराज यांच्या पत्नी व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगाव शहरातील राजमाता जिजाऊ उद्यानातील त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले आहे.

  

जिजामाता यांचा जन्म जानेवारी १२ इ.स.१५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला.राजमाता जिजाऊ ह्या हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या.
आज हे स्थळ केवळ ऐतिहासिक स्थळ नाही तर एक पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखले जाते.

जिजाबाईंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्रातील सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड जवळील देऊळगाव येथील म्हाळसाबाई आणि लखुजी जाधव यांच्या पोटी झाला.लखोजीराजे जाधव हे मराठा कुलीन होते.जिजाबाईंचा विवाह लहान वयातच वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचा मुलगा शहाजी भोसले यांच्याशी झाला.त्यांनी शिवरायांना स्वराज्याची शिकवण दिली आणि एक महान योद्धा म्हणून उभे केले.भारत सरकारने ७ जुलै १९९९ रोजी जिजाबाईंच्या सन्मानार्थ डाक तिकीट प्रकाशित करून त्यांच्या कार्याला एक प्रकारची मानवंदना दिली होती.

यावेळी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा प्रतिभा शिलेदार,भाग्यश्री बोरुडे,सुषमा पांडे,रूपाली कळसकर, शितल लोंढे,दिनाक्षी जाधव,रुपाली भोकरे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव,ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश गवळी,सोशल मीडिया सेलचे प्रदेश सरचिटणीस अशोक आव्हाटे,शहराध्यक्ष सुनिल गंगूले,माजी गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,दिनकर खरे,फकीर कुरेशी,राजेंद्र वाकचौरे,गौतम बँकेचे माजी संचालक सुनील शिलेदार,प्रशांत वाबळे,राजेंद्र खैरनार,वाल्मिक लहिरे,धनंजय कहार,शैलेश साबळे,मनोज नरोडे,अंबादास वडांगळे, महेश उदावंत,शुभम लासुरे,किशोर डोखे,एकनाथ गंगूले,राजेंद्र आभाळे,फिरोज पठाण आदी उपस्थित होते.

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close