जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

 …या शहर हद्दवाढीसाठी १० कोटीच्या कामांना मान्यता-माहिती

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराच्या विकासासाठी विविध स्तरावरून निधी मिळत असताना कोपरगाव शहराबरोबरच शहरालगत असणाऱ्या विविध उपनगरातील हद्दवाढ झालेल्या विकास कामांना आ.आशुतोष काळे यांनी १० कोटीचा निधीसाठी प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

“कोपरगाव नगरपरिषदेच्या नव्याने हद्दवाढ झालेल्या भागातील नाईक नगर मधील रस्ते व गटार बांधकाम करणे २१.९९ लक्ष,सह्याद्री कॉलनी भागातील रस्ते व गटार बांधकाम करणे २१.९९ लक्ष,द्वारकानगरी भागातील रस्ते व गटार बांधकाम करणे ८५.९९ लक्ष,शंकरनगर भागातील रस्ते व गटार बांधकाम करणे १.४८ कोटी आदी तेरा विकास कामांसाठी निधी मंजूर झाला आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

कोपरगाव शहराच्या विकासाची मागील काही वर्षात धूळधाण झाली होती.त्यामुळे शहरास धुळगाव हे नामाधीमान प्राप्त झाले होते.शहरात येणारे प्रवासी शहरातीलन नेतृत्वाची टिंगलटवाळी करत होते.मात्र गत विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आ.काळे यांनी या प्रास्तवित कामांना चालना देवून पाणी,रस्ते,शहर सुशोभीकरण,आरोग्य आदी महत्वाचे प्रश्न मार्गी लावले आहेत.कोपरगाव शहरातील नागरिकांना बरोबरच उपनगरातील व हद्दवाढ झालेल्या भागातील नागरिकांचे प्रश्न गंभीर झाले होते.त्यासाठी शासन दरबारी विविध विकास कामांचे प्रस्ताव सादर करून या प्रस्तावांना लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव शहराच्या १० कोटीच्या विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती त्यांच्या प्रसिद्धी कार्यालयाने दिली आहे.

    यामध्ये कोपरगाव नगरपरिषदेच्या नव्याने हद्दवाढ झालेल्या भागातील नाईक नगर मधील रस्ते व गटार बांधकाम करणे २१.९९ लक्ष,सह्याद्री कॉलनी भागातील रस्ते व गटार बांधकाम करणे २१.९९ लक्ष,द्वारकानगरी भागातील रस्ते व गटार बांधकाम करणे ८५.९९ लक्ष,शंकरनगर भागातील रस्ते व गटार बांधकाम करणे १.४८ कोटी,ब्रिजलालनगर भागातील रस्त्यावरील सि.डी.वर्क सह गटार बांधकाम करणे ७७ लक्ष,आदिनाथ सोसायटी भागातील रस्ते व गटार बांधकाम करणे ३२.९९ लक्ष,गोकुळनगरी भागातील रस्ते व गटार बांधकाम करणे ५० लक्ष,शंकरनगर भागातील पवारवस्ती भागात रस्ते व गटार बांधकाम करणे १.०९ कोटी,ओमनगर भागातील रस्ते व गटार बांधकाम करणे १.२९ कोटी,गवारेनगर भागातील रस्ते व गटार बांधकाम करणे१.३९ कोटी,गवारे वस्ती भागातील रस्ते व गटार बांधकाम करणे ५० लक्ष,आयोध्या नगरी भागातील रस्ते व गटार बांधकाम करणे २० लक्ष,धोंडीबा नगर-हनुमान नगर-पवार वस्ती रस्ते व गटार बांधकाम करणे १.१० कोटी अशा एकूण जवळपास १० कोटीच्या कामांचा समावेश आहे.

या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असल्यामुळे लवकरच निविदा प्रसिद्ध होऊन विकास कामांना प्रारंभ होणार आहे.त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close