जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

 ‘लाईफ स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्स’ प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)   

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन संचलित कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात दि.२९ ऑगस्ट ते ०१ सप्टेंबर २०२३ या दरम्यान नुकतीच रूबिकॉन ट्रेनिंग इन्स्टिट्यूतर्फे लाईफ स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षण कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.

“प्रभावी संवादापासून ते टीमवर्क आणि समस्या सोडवण्यापर्यंत,सॉफ्ट स्किल्स तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सर्व फरक करू शकतात.म्हणुन या शाखेचे महत्व उत्तरोत्तर वाढत चालले आहे”-नितीन जैन,प्राचार्य,राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फार्मसी महाविद्यालय,कोकमठाण.

‘सॉफ्ट स्किल्स’ हे सहसा व्यावसायिक यशाचे गायब नायक असतात.जरी तांत्रिक पराक्रम आणि कठोर प्रतिभा अनेक दरवाजे उघडू शकते,हे सॉफ्ट स्किल्सचे प्रभुत्व आहे जे खरोखर यशस्वी लोकांना वेगळे करते.प्रभावी संवादापासून ते टीमवर्क आणि समस्या सोडवण्यापर्यंत,सॉफ्ट स्किल्स तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सर्व फरक करू शकतात.म्हणुन या शाखेचे महत्व उत्तरोत्तर वाढत चालले आहे.त्यासाठी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फार्मसी महाविद्यालयांत नुकतेच सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षण कार्यशाळेंचे मोठ्या उत्साहात नुकतेच आयोजन केले होते.

सदर प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष चांगदेव कातकडे,सचिव प्रसाद कातकडे,दिपक कोटामे,प्रसिद्ध उद्योजक ज्ञानेश्वर सिनगर व विजय कडू आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रसंगी रूबिकॉन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे प्रशिक्षक म्हणून मुष्किम सय्यद,कोमल नगरे व स्नेहल नगरे यांनी कार्यशाळेत विदयार्थ्यांना लाईक स्किल्स,सॉफ्ट स्किल,कम्युनिकेशन स्किल,इंटरव्यू व प्रेसेंटेशन स्किल आदींची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली आहे.

सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य नितीन जैन यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन संस्थेचे सचिव प्रसाद कातकडे यांनी केला आहे.तर सुत्रसंचलन प्रा.कविता चौधरी यांनी केले तर उपस्थितांचे आभार दीपक कोटमे यांनी मानले आहे.


सदर कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रा.विजय जाधव,प्रा.करवीर आघाडे, प्रा.सचिन आगलावे,प्रा.सुरज बेंद्रे,प्रा.उत्कर्षा लासुरे व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close