जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अभिष्टचिंतन कार्यक्रम

आ.काळेंच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आ.आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी मतदार संघातील विविध गावांमध्ये वृक्षारोपण करून आ.आशुतोष काळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.

जगभरात मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जात असून त्याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत.त्यामुळे संपूर्ण सृष्टीचे वैभव संकटात सापडले असून पर्यावरणाचा बिघडलेला समतोल वेळीच सावरणे गरजेचे आहे.अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहे.याची जान ठेवून आ.आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगावात वृक्ष लागवड करण्यात आली आहे.

कोपरगाव मतदार संघातील बहादरपूर,डाऊच बु.,वारी येथील स्मशानभूमी व परिसर,सुशीलामाई काळे महाविद्यालय शहाजापूर,वारी,भोजडे, कोकमठाण,लौकी,तळेगाव मळे,करंजी,आदी गावात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे.

वृक्ष आपल्याला फक्त सावलीच देत नाहीत तर वृक्षांपासून अनेक फायदे आहेत.पर्यावरणाची भयंकर समस्या संपूर्ण जगासमोर उभी आहे.मानवाच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी उभे असलेले वृक्ष आपले जीवनदाते असून सर्वांनी वृक्षांची काळजी घेतली पाहिजे.त्यासाठी दरवर्षी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून कधी ढगफुटी तर कधी दुष्काळ अशा समस्या नष्ट होऊ शकतील.त्यासाठी आ. काळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे आ.काळे यांनी अभिनंदन करून सर्व वृक्षांचे योग्य संगोपन करण्याचे आवाहन केले आहे.

गौतम पब्लिक स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव संपन्न

आ.आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतम पब्लिक स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा महोत्सवामध्ये अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून मोठ्या उत्साहात क्रीडा महोत्सव संपन्न झाला असून विजेत्या संघांना जिल्हा बँकेच्या माजी संचालिका व कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव चैताली काळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले आहे.

यावेळी एस.जी.विद्यालयाचे प्राचार्य मकरंद कोऱ्हाळकर,रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुण चंद्रे,राष्ट्रीय बेसबॉल खेळाडू सुभाष पाटणकर,छत्रपती पुरस्कार विजेते बेसबॉल खेळाडू अक्षय आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close