जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

तालुक्यात चोरट्यांचा पुन्हा कहर,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर आणि तालुक्यात चोरीचे सत्र सुरूच असून शहरातील एका रात्रीत तीन कारच्या चोरीमुळे खळबळ उडाली असताना आता दहिगाव बोलका येथील चार विविध कंपनीचे विद्युत पंप व एक बजाज कंपनीची दुचाकी असा सुमारे ३३ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात या चोरट्यांची ग्रामस्थांत भीती निर्माण झाली आहे.\

कोपरगाव शहर पोलिसांना हुलकावणी देऊन शहरातील निवारा-सुभद्रानगर परिसरातून डॉ.जगदीश झंवर,सह्याद्री कॉलनी येथील लेखापरीक्षक दत्तात्रय खेमनर,आणि साईनगर या परिसरातून अड्.मनोज कडू यांची असे तब्बल एक-दोन नव्हे तर एक स्विफ्ट डिझायरसह दोन एर्टीगा अशा तीन कार चोरून आपला प्रताप दाखवला होता.तर त्यानंतर सुभद्रानगर येथील पी.विल्यम एस.पी.चंदन या इसमाच्या घरातून सोन्याची साखळी व दोन अंगठ्या असा ०१ लाख २५ हजारांचा ऐवज लंपास केला आहे.त्या नंतर अद्याप हे चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसताना दिसत आहे.

सदरचे सविस्तर वृत असे की,कोपरगाव शहरात चारचाकी व दुचाकी वाहनांची चोरी थांबण्याचे नाव घेत नाही असेच चित्र तयार झाले असून राजकीय नेत्यांचा पोलिसांवर आणि पोलिसांचा चोरट्यांवर धाक राहिलेला दिसत नाही त्यामुळे कोपरगाव शहरात पुन्हा एकदा चोरट्यांनी आपले प्रताप दाखविण्यास सुरुवात केली आहे.रात्रीच्या सुमारास नागरीक सामसूम झाल्यावर चोरट्यांनी पोलिसांना हुलकावणी देऊन शहरातील निवारा-सुभद्रानगर परिसरातून डॉ.जगदीश झंवर,सह्याद्री कॉलनी येथील लेखापरीक्षक दत्तात्रय खेमनर,आणि साईनगर या परिसरातून अड्.मनोज कडू यांची असे तब्बल एक-दोन नव्हे तर एक स्विफ्ट डिझायरसह दोन एर्टीगा अशा तीन कार चोरून आपला प्रताप दाखवला होता.तर त्यानंतर सुभद्रानगर येथील पी.विल्यम एस.पी.चंदन या इसमाच्या घरातून सोन्याची साखळी व दोन अंगठ्या असा ०१ लाख २५ हजारांचा ऐवज लंपास केला आहे.तर दुसऱ्या दोन घटनेत कोपरगाव बस स्थानक येथून मुर्शतपुर येथील विशाल प्रकाश शिंदे यांची दुचाकी तर संजीवनी कारखाना पार्किंग मधून चांदेकासारे येथील कर्मचारी मच्छीन्द्र भाऊराव होन आदी दोन ठिकाणच्या अनुक्रमे २५ व १५ हजार असे ४० हजारांच्या दोन दुचाक्यांची चोरी केली आहे.त्या बातम्यांची शाई वाळते न वाळते तो पुन्हा एकदा दहिगाव बोलका येथे आपला प्रताप दाखवला आहे.

या ताज्या घटनेत त्यांनी दि.०९ मार्चच्या रात्री ०७ नंतर व सकाळच्या आत कधीतरी आपला प्रताप दाखवत फिर्यादी अरुण लक्ष्मण वल्टे (वय-५७) यांच्यासह विविध ग्रामस्थांच्या विविध वस्तू लंपास केल्या आहेत.त्यात त्यांनी ०६ हजार रुपये किमतीची एक अश्वशक्तीची पाणबुडी,श्री कृष्ण सोपान लांडगे यांच्या मालकीची ०४ हजार रुपये किमतीची एक टेक्समो कंपनीची ३ अश्वशक्तीचा मोनोब्लाक विद्युत पंप,अमृतराव देशमुख यांच्या मालकीच्या अजिंठा कंपनीच्या ५ अश्वशक्तिच्या दोन पाणबुड्या,तर याशिवाय दादासाहेब दयानंद थोरात यांचे नावावर असलेली विकास सोपान वल्टे यांच्या मालकीची असलेली ०८ हजार रुपये किमतीची एक बजाज कंपनीची सि.टी.-१०० हि दुचाकी (क्रं.एम.एच.२० ए.व्ही.८०१) अशा तीन अजंठा कंपनीचे विद्युत पंप व एक टेक्समो कंपनीचा विद्युत पंप व एक बजाज कंपनीची दुचाकी असा चार चोऱ्या करून सुमारे एकूण ३३ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला आहे.या प्रकरणी फिर्यादी अरुण वल्टे यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या दप्तरी नोंद केली आहे.दरम्यान घटना स्थळी पोलीस निरीक्षक देसले व पोलीस हवालदार राजेंद्र म्हस्के आदिनी भेट दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पोलिसांनी आपल्या दप्तरी नोंद क्रं.१२५/२०२३ भा.द.वि.कलम-३७९ अन्वये नुकतीच नोंद दाखल केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.राजेंद्र म्हस्के हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close