जाहिरात-9423439946
सहकार

कोपरगाव तालुक्यातील..या सेवा संस्थेचा सभादांना दहा टक्के लाभांश

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सहकारात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या धामोरी विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सभासदांना १० टक्के लाभांशाचे वाटप संस्थेचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक चंद्रशेखर कुलकर्णी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.

या वेळी सभासदांना दहा टक्के लाभांश तर नियमित कर्जफेड करणाऱ्या सभासदांना संस्थेने एक टक्का व्याजदर प्रोत्साहन सवलत देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जेष्ठ संचालक चंद्रशेखर कुलकर्णी यांनी दिली आहे.त्याचे कर्जदार सभासदांनी स्वागत केले आहे.

स्व.पंडितराव कुलकर्णी यांनी १९५० साली हि संस्थास स्थापन केली होती.संस्थेने आपल्या स्थापनेपासून गत २५-३० वर्षांपासून सभासदांना लाभांश देण्याची परंपरा सुरु ठेवली आहे.धामोरी विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.सभेच्या अध्यक्षस्थांनी जेष्ठ संचालक चंद्रशेखर कुळकर्णी हे होते.

या वेळी अहवाल वाचन संस्थेचे सचिव मनोज कुलकर्णी यांनी केले तर प्रास्तविक उपाध्यक्ष नारायण बारे यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार संस्थेचे अध्यक्ष भगवान माळी यांनी मानले आहे.

सदर प्रसंगी सेवा संस्थेचे अध्यक्ष भगवान माळी,गौतम बँकेचे संचालक पुंडलिक माळी,संस्थेचे उपाध्यक्ष नारायण बारे,संचालक दिलीप माळी,माजी उपाध्यक्ष बाळासाहेब अहिरे,विश्वनाथ खिलारी,भाऊसाहेब माळी,प्रकाश शिंदे व संस्थेचे सचिव मनोज कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नियमित कर्जफेड करणाऱ्या सभासदांना संस्थेने एक टक्का व्याजदर प्रोत्साहन सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.त्याचे कर्जदार सभासदांनी स्वागत केले आहे.
सदर प्रसंगी उपस्थितांना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,गौतम सहकारी बँकेचे संचालक पुंडलिक माळी,संजीवनी सहकारी कारखाण्याचे माजी उपाध्यक्ष कैलास माळी यांनी मार्गदर्शन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close