कोपरगाव तालुका
‘त्या’ महिलांचे दुःख नक्कीच मोठे..या नेत्याचे प्रतिपादन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोना साथीने अनेकांनीं आप्तस्वकीय गमावले आहे.ते दुःख नक्कीच मोठे असते मात्र त्या दुःखातून सारण्यासाठी कोणीही दुःख वाटून घेत नाही.मात्र आपण आपल्या तीन महिन्याच्या वेतनातून ज्या महिलांचे पती गमावले आहे त्यांना ०२ हजार १०० रुपयांची अल्पशी मदत करत असून आगामी काळात काही मदत लागल्यास त्यांनी नक्कीच आपल्याला हाक मारावी आपण साथ देऊ असे आश्वासन आ.आशुतोष काळे उपस्थित महिलांना दिली आहे.
“कोविड-१९ मुळे अनेक कुटुंबे पूर्णपणे उद्धवस्त झाली आहेत,तर अनेक मुले अनाथ झाली आहेत.असे अनेक लोक आहेत ज्यांना सांभाळण्यासाठी कुटुंबातील एकही सदस्य आता या जगात राहिला नाही.लॅन्सेटच्या दोन माहिण्यापूर्वीच्या आकडेवारीनुसार,भारतातील सुमारे ०१.१९ लाख मुलांनी त्यांचे पालक वा प्राथमिकरित्या मुलांची काळजी घेणारे गमावले आहेत.यापैकी २५ हजार ५०० मुलांनी त्यांची आई गमावली,तर ९० हजार ७५१ मुलांनी त्यांचे वडील गमावले आहेत त्यांच्यासाठी मदत करणे गरजेचे होते”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव विधानसभा मतदारसंघ.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला.कोविड-१९ मुळे अनेक कुटुंबे पूर्णपणे उद्धवस्त झाली आहेत,तर अनेक मुले अनाथ झाली आहेत.असे अनेक लोक आहेत ज्यांना सांभाळण्यासाठी कुटुंबातील एकही सदस्य आता या जगात राहिला नाही.लॅन्सेटच्या दोन माहिण्यापूर्वीच्या आकडेवारीनुसार,भारतातील सुमारे ०१.१९ लाख मुलांनी त्यांचे पालक वा प्राथमिकरित्या मुलांची काळजी घेणारे गमावले आहेत.यापैकी २५ हजार ५०० मुलांनी त्यांची आई गमावली,तर ९० हजार ७५१ मुलांनी त्यांचे वडील गमावले.त्याचप्रमाणे असे अनेक मुले आहे ज्यांनी त्यांचे जवळचे नातेवाईक गमावले आहेत.मुले कोरोनामुळे घरांमध्ये बंद असताना मानसिक आरोग्याच्या समस्येशी झुंजत आहेत.अशा परिस्थितीत बरेच पालक चिंतित आहेत त्यांना मदतीची गरज आहे.ती गरज नेमकी वेळ हेरून आ.आशुतोष काळे यांनी या ३५० गरजू महिलांना प्रति २१०० रुपये असे तीन महिन्याचे ०७ लाख ३५ हजार वेतन देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे.त्याचे वितरण नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत कोपरगाव येथील महात्मा गांधी प्रदर्शन ट्रस्टच्या सभागृहात संपन्न झाले आहे.त्या वेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत,पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,पंचायत समिती सदस्य अनिल कदम,मधुकर टेके,रोहिदास होन,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,नगरसेविका प्रतिभा शिलेदार,श्रीमती वर्षा गंगूले,माधवी वाकचौरे,सपना मोरे,वर्षा शिंगाडे,उमा वहाडणे,सुहासिनी कोयटे,संगिता मालकर,सुधा ठोळे,अहमदनगर जिल्हा युवती काँगेसच्या सचिव स्वप्नजा वाबळे,राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा वैशाली आभाळे,डॉ. वैशाली आव्हाड,मीनाताई गुरले,रुपालीताई गुजराथी,गायत्री हलवाई उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की,”मागील वर्षापासून आलेल्या जीवघेण्या कोरोना विषाणूने कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक कुटुंबावर मोठे आघात केले.त्यामुळे प्रत्येकाला आपल्या जवळच्या नातेवाईकांना गमवावे लागले असून जिवाभावाची माणसं आपल्याला सोडून गेली आहेत. ते दु:ख आपण देखील सोसले आहे.मात्र कोविडमुळे ज्या महिलांना अचानक वैधव्याला सामोरे जावे लागले व त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावता व्यक्ती कोरोनाने हिरावून घेतला त्या महिलांचे दु:ख नक्कीच मोठे आहे. एकीकडे पती गमविल्याचे दु:ख तर दुसरीकडे पतीच्या रूपाने घरातील कमावती व्यक्तीच्या निधनामुळे संसाराचा गाडा कसा चालवायचा,कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालणार,मुलांचे शिक्षण कसे पूर्ण होणार असे प्रश्न या महिलांपुढे आहेत.त्यामुळे त्यांना काहीतरी आर्थिक मदत करावी या उद्देशातून छोटीशी भेट म्हणून आपले तीन महिन्याचे वेतन दिले आहे.महाविकास आघाडी सरकारकडून देखील एकल महिलांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्या सर्व योजनांचा लाभ तुम्हाला मिळवून देण्यास प्राधान्य देईल जेणेकरून तुमचे दु:ख काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.यापुढे तुम्हाला कोणत्याही अडचणी आल्या तरी तुमचा हक्काचा भाऊ समजून माझ्याशी किंवा माझ्या संपर्क कार्यालयाशी संपर्क करा तुमच्या अडचणी प्राधान्याने सोडविल्या जातील अशी ग्वाही यावेळी दिली आहे.