जाहिरात-9423439946
सण-उत्सव

कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात…हा कार्यक्रम संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

देशाचा ७५ वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या वतीने नुकताच त्यांच्या आवारात शारदा संगीत विद्यालय प्रस्तुत संगीत रजनी कार्यक्रम इंडियन आयडल फेम गायिका कु.सुरभी कुलकर्णी यांचा देशभक्तीपर गायनांचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

कोपरगाव शहरासह तालुक्यात देशभरात विविध देशभक्तिपर उपक्रम आणि अभियान राबवण्यात येत आहेत.कोपरगाव शहरात शांतता स्थापित करण्यात अहंम भूमिका निभावणाऱ्या कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात हा उत्साह उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली व मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमातून पाहायला मिळायला आहे.

भारतात यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला आहे.पंधरा ऑगस्ट यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत.देशभरात स्वातंत्र्य दिनाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला आहे.कोपरगाव शहरासह तालुक्यात देशभरात विविध देशभक्तिपर उपक्रम आणि अभियान राबवण्यात येत आहेत.कोपरगाव शहरात शांतता स्थापित करण्यात अहंम भूमिका निभावणाऱ्या कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात हा उत्साह विविध कार्यक्रमातून पाहायला मिळायला आहे.

सदर कार्यक्रम दरम्यान पोलीस ठाणे व जनता यांच्यातील समन्वय वाढविण्यात येऊन जनतेच्या जीवीत व मालमत्तेच्या रक्षणाकरीता पोलीसांना वेळो-वेळी विशेष सहकार्य करणाऱ्या ७५ पोलीस मित्रांचा गौरव करुन सन्मानपत्र शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांचे हस्ते देण्यात आले आहे.

तसेच कोपरगाव शहर पोस्टेच्या वतीने शालेय विद्यार्थांच्या घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील ७५ मुलांना बक्षीस वितरण करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम करीता सर्व पोलीस अधिकारी,अंमलदार,तहसिलदार विजय बोरुडे,गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी,गटशिक्षण अधिकारी श्रीमती शबाना शेख,सामाजिक कार्यकर्ते संजय काळे,माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील,रियाज शेख,व्यापारी नारायण अग्रवाल,सुशांत घोडके,जनार्दन कदम,हिरालाल महानुभव,शहरातील पत्रकार,महिला दक्षाता समिती सदस्या,पोलीस पाटील यांचे सह मोठ्या संख्येने नागरीक,महिला मुले आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close