जाहिरात-9423439946
वन व पर्यावरण

कडूलिंबाची शेंडा मरिवर कृषी विद्यापीठाने सुचवले उपाय

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

नगर,सातारा,पुणे व सोलापूर या जिल्ह्यातील कडूलिंबाच्या झाडांवर आढळून येत आहे.अशा रोगाचे नमुन्यांचे प्रयोगशाळेतील पृथ्थकरण करुन विश्लेषण करण्याचे काम सुरू आहे.सदर प्रकरणी काही ठिकाणी रोगग्रस्त झाडांना भेटी देऊन रोगग्रस्त नमुन्यांचे पृथ्थकरण केले असता त्यावर फोमाॅप्सीस,कोलिटोट्रीकम आदी रोगकारक बुरशींचे अस्तित्व कमी जास्त प्रमाणात आढळून आले आहे त्यामुळे हि शेंडा मर होत असल्याचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी खुलासा केला आहे.

“कडूलिंब रोगाच्या नियंत्रणासाठी कोणत्याही बुरशीनाशकासाठी लेबल क्लेम नसल्याने उपाययोजना व फवारणीसाठी काही मिश्रण संशोधनाच्या निष्कर्षाने सुचवले आहे.त्यात लिंबाचे झाडावरील रोगग्रस्त वाळलेल्या फांद्या छाटून रोगग्रस्त अवशेष गोळा करून जाळून नष्ट करावेत, या रोगाचे नियंत्रणासाठी कार्बेनडेनझिम १२ टक्के + मॅन्कोझेब ६३+ टक्के डब्लु.पी.२० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून पुर्ण झाडावर फवारणी करावी”-डॉ.प्रशांतकुमार पाटील,कुलगुरू,महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठ.

कोपरगाव व राहाता तालुक्यातील कडूलिंबाची झाडे गेल्या काही दिवासांपासून पानझड होवून झाडे जळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे.त्याबाबत कोपरगावातील स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनीं राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांना पत्र पाठवून त्यांचे स्तरावर वनस्पतीशास्राचे तज्ञ पथकाचे लक्ष वेधून घेतले होते.त्याद्वारे हा खुलासा झाला आहे.

यावर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ.प्रशांतकुमार पाटील यांनी दखल घेत तातडीने वनस्पती रोगशास्त्र व कृषी अनुजीवशास्र विभागप्रमुख डॉ.तानाजी नरुटे,किटक शास्त्रविभाग प्रमुख डॉ.सिदानंद पाटील यांचे मार्गदर्शनाखाली संशोधन होवून उपाययोजना संदर्भात घोडके यांना पत्राद्वारे कडूलिंबावर आलेला रोग व त्यावरील उपाय सांगितले आहेत.
कृषी विद्यापीठाचे पत्रात नमुद केल्या प्रमाणे या अगोदरही या रोगाची लक्षणे महाराष्ट्राबाहेर कर्नाटक,तेलंगणा व आंध्र प्रदेश मध्ये दिसून आली आहेत.कडूलिंबाचे झाड व या झाडाचे अवशेष रोगप्रतिबंधक औषधे तयार करण्यासाठी वापरले जातात म्हणून हे झाड रोगांना बळी पडू नये म्हणून कनखर असते परंतू अलिकडे वातावरणातील बदलांमुळे काही दिवसांपासून हे झाडही काही रोगांना बळी पडत आहे.

या बुरशीमुळे होणाऱ्या रोगास आरोह तथा शेंडा मर असे संबोधले जाते.अशा रोगांचा प्रादुर्भाव साधारणपणे पावसाळ्याच्या सुरुवातीस होऊन कालांतराने तीव्र होत जातो व झाडांच्या शेंड्याच्या कोवळ्या फांद्या रोगास प्रथम बळी पडतात व आरोह (डायबॅक) ही लक्षणे दिसू लागतात.जानेवारी नंतर नवीन पालवी फुटल्यानंतर ही लक्षणे कमी होत जातात.

या बुरशी बरोबरच कोवळ्या शेंड्यावर रसशोषक किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्याचा उल्लेख काही शास्त्रज्ञांनी केला असून या किडींनी रस शोषण करतांना केलेल्या जखमांमुळे दुय्यम रोगकारक बुरशींचा प्रसार जलद गतीने होतो.कडूलिंबावर दिसून येणाऱ्या अशा प्रकारचे रोगांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कडूलिंबाच्या झाडाची वार्षिक छाटणी व वळण देणे ह्या दोन्ही गोष्टी करणे गरजेचे आहे.

कडूलिंब रोगाच्या नियंत्रणासाठी कोणत्याही बुरशीनाशकासाठी लेबल क्लेम नसल्याने उपाययोजना व फवारणीसाठी काही मिश्रण संशोधनाच्या निष्कर्षाने सुचवले आहे.त्यात लिंबाचे झाडावरील रोगग्रस्त वाळलेल्या फांद्या छाटून रोगग्रस्त अवशेष गोळा करून जाळून नष्ट करावेत, या रोगाचे नियंत्रणासाठी कार्बेनडेनझिम १२ टक्के + मॅन्कोझेब ६३+ टक्के डब्लु.पी.२० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून पुर्ण झाडावर फवारणी करावी.

वरील प्रमाणे कडूलिंब रोग नियंत्रणाच्या उपाययोजना व कडूलिंब संवर्धनासाठी वृक्ष व पर्यावरण प्रेमीं,सरपंच,ग्रामसेवक व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले असून या संदर्भात कृषी तज्ञ उत्तम पुणे मो.९९२२८२७६१३ यांचे सह कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांचे मार्गदर्शन घेवून कडूलिंबाचे फक्त रोग पडलेल्या झाडांवर काळजीपूर्वक वरील प्रमाणे उपाय करावा असे आवाहन शेवटी करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close