जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

…या दिवशी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचा पुण्यतिथी कार्यक्रम होणार संपन्न

जाहिरात-9423439946

नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )

उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले गेलेले राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या ३२ व्या पुण्यतिथीचे येत्या सोमवार दि.१६ डिसेंबरला आयोजन करण्यात आले असून या निमित्त जपानुष्ठान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती या श्री काशी विश्वनाथ ट्रस्टचे नूतन अध्यक्ष दत्तात्रय होळकर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

श्री काशी विश्वनाथ ट्रस्टचे प्रथम अध्यक्ष मोहनराव चव्हाण यांनी आपल्या हयातीत आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न केले होते.मात्र त्यांचे काही दिवसापूर्वी निर्वाण झाले असून त्यांच्या जागी आता दत्तात्रय होळकर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.त्यांच्या कार्यकाळात आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेउन गुरुवार दि.१६ डिसेंबर रोजी हि पहिलीच पुण्यतिथी संपन्न होत आहे.त्यामुळे तिला विशेष महत्व असून त्याकडे सर्व भाविक भक्तांचे लक्ष लागून आहे.

कोपरगाव बेट येथे राष्ट्र संत जनार्धन स्वामी यांनी शेवटी १९८९ साली कोपरगाव येथील कोपरगाव बेट येथे समाधी घेतली.त्याला आता बत्तीस वर्षाचा कालखंड लोटला आहे.कोपरगाव येथे त्यांनी भगवान महादेवाचे मंदिर आपल्या हयातीतच बांधले व त्या शेजारीच समाधी घेतली.त्याठिकाणी आता श्री काशी विश्वेश्वर महादेव व गोपालन ट्रस्ट चालू असून या ट्रस्ट मार्फत विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.या ट्रस्टचे प्रथम अध्यक्ष मोहनराव चव्हाण यांनी आपल्या हयातीत विविध कार्यक्रम संपन्न केले होते.मात्र त्यांचे काही दिवसापूर्वी निर्वाण झाले असून त्यांच्या जागी आता दत्तात्रय होळकर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.त्यांच्या कार्यकाळात आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेउन गुरुवार दि.१६ डिसेंबर रोजी हि पहिलीच पुण्यतिथी संपन्न होत आहे.त्यामुळे तिला विशेष महत्व आहे.
त्यानिमित्त ०९ डिसेंबर पर्यंत रोज पहाटे पाच वाजता नीत्यनियम विधी,सकाळी ०६ वाजता मान्यवर संतांचा सत्संग,सकाळी ०७.३० वाजता आरती,०८ जपानुष्ठाणींना चहापान,सकाळी ८.३० गुरुचरित्र ग्रंथाचे समुदायिकक पारायण,संध्याकाळी ०६.३० वाजता फलाहार,०७.३० वाजता आरती,रात्री ०८ ते ०९ वाजता प्रवचन व सत्संग आयोजित केले आहे.

या क्रार्यक्रमास शुक्रवार दि.१० डिसेंबर रोजी सायंकाळी ०४ वाजता पुणतांबा येथील मुक्ताई पिठाचे ह.भ.प.रामानंदगिरीजी महाराज यांचे प्रवचन,शनिवार दि.११ डिसेंबर रोजी रात्री ०९ वाजता ह.भ. प.भानुदास महाराज बैरागी यांचा भारुडाचा कार्यक्रम,रविवार दि.१२ डिसेंबर रोजी सांयकाळी ०४ वाजता उद्धव महाराज यांचे प्रवचन,रविवार दि.१२ डिसेंबर रोजी रात्री ०९ वाजता पंडित महाराज क्षीरसागर महाराज,सोमवार दि.१३ डिसेंबर रोजी रात्री ०९ वाजता ज्ञानेश्वर महाराज मेश्राम यांचे संगीत भजन,मंगळवार दि.१४ डिसेंबर रोजी ह.भ.प.बाळा महाराज आहेर,यांचे प्रवचन,बुधवार दि.१५ डिसेंबर रोजी सायंकाळी ०४ वाजता श्री क्षेत्र सराला बेट येथील महंत रामगिरीजी महाराज यांचे प्रवचन संपन्न होणार आहे.तर गुरुवार दि.१६ डिसेंबर रोजी संत जनार्दन स्वामी यांची पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम दिवसभर संपन्न होणार आहे.तर त्याच दिवशी दुपारी १२.३० वाजता उवस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप होणार आहे.तरी या कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष दत्तात्रय होळकर यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close