जाहिरात-9423439946
महसूल विभाग

…या उपविभागात ३१६९ शेतकऱ्यांचे १३४०४ हे.पोटखराब्याचे क्षेत्र ‘लागवडीलायक’

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

लागवडीखाली आणण्यात आलेल्या पोटखराब शेतीक्षेत्राची सातबारा उतारा नोंद घेण्यासाठी संगमनेर उपव‍िभागात ड‍िसेबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या तीन मह‍िन्यात व‍िशेष मोहीम राबव‍िण्यात आली आहे.या मोहीमेत ३१६९ शेतकऱ्यांच्या १३४०४.५१ हेक्टर पोटखराब शेतीक्षेत्राची सातबारा उतारावर लागवडीलायक अशी नोंद घेण्यात आली आहे.या व‍िशेष कामग‍िरीत संगमेनर अहमदनगर ज‍िल्ह्यात अव्वल असल्याची माह‍िती संगमनेर उपव‍िभागीय अध‍िकारी डॉ.शंश‍िकांत मंगरुळे यांनी आमच्या प्रतिनिधीस द‍िली आहे.

राज्यातील अधिकार अभिलेखामधील वर्ग ‘अ’ पोटखराब क्षेत्र ब-याच शेतक-यांनी सुधारणा करुन लागवडी योग्य आणलेले आहे.याबाबत पोटखराब क्षेत्र लागवडीखाली वर्ग करुन मिळणेबाबत जिल्हाधिकारी व जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडे अर्ज प्राप्त होत होते.त्याबंत शासनाकडे सादर केलेल्या प्रस्थावाप्रमाणे शासनाने नियमामध्ये बदल करून पोट खराब क्षेत्र लागवडीलायक मध्ये रुपांतरीत करण्यास मान्यता दिली होती.

सदर सुधारणा केलेल्या लागवडीयोग्य क्षेत्राच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये न घेतल्यामुळे शेतक-यांना पीक कर्ज,पीक विमा,नैसर्गिक आपत्तीत पिकांचे होणा-या नुकसानीचा मोबदला,भूसंपादन मोबदला,खरेदी विक्री तील मोबदला आदी आर्थिक नुकसान होत होते.त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी होत होती.त्यामुळे शासनाने या बाबत नुकताच एक आदेश पारित करून हे क्षेत्र लागवडीखाली नोंदविण्यासाठी मान्यता दिली होती.त्यानुसार हि मोहीम संगमनेर उपविभागात राबविली गेली आहे.

या व‍िशेष मोहीमेत संगमनेर उपव‍िभागातील संगमनेर तालुक्यातील १२४९ शेतकऱ्यांचे १९२२.४८ हेक्टर पोटखराब क्षेत्र व अकोले तालुक्यातील १९२० शेतकऱ्यांचे ११४८२.०३ हेक्टर पोटखराब क्षेत्रांची सातबारा उताऱ्यांवर लागवडीलायक अशी नोंद घेण्यात आली आहे.संगमनेर महसूल व‍िभागाच्या या न‍िर्णयामुळे समाधानी असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त संगमनेर व अकोले तालुक्यातील पोटखराबा वर्ग (अ) क्षेत्र लागवडीलायक आणण्यासाठी ११ जूलैपर्यंत पुनःश्च मोहीम राबविण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पोटखराबा वर्ग (अ) क्षेत्र लागवडीलायक करणेकामी कार्यवाही केलेली नाही. अशा शेतकऱ्यांनी तलाठी, मंडळाधिकारी यांचेशी तात्काळ संपर्क करुन पोटखराबा वर्ग (अ) क्षेत्र लागवडीलायक करून घेणेबाबत आवश्यक ती पूर्तता करावी असे आवाहन ही शेवटी डॉ.मंगरूळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close