जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
मनोरंजन

आखाडी उत्सवातून जपली जाते शेकडो वर्षांची सांस्कृतिक परंपरा  

न्यूजसेवा –(अरुण खरात)

    विज्ञान-तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात अनेक लोकपरंपरा काळाच्या ओघात लुप्त होत असताना,महाराष्ट्रातील काही गावांमध्ये आजही शेकडो वर्षांपासून चालत आलेला आखाडी उत्सव तेवढ्याच श्रद्धेने,उत्साहाने आणि सांस्कृतिक अभिमानाने साजरा केला जातो.लोकजीवन,लोककला,अध्यात्म आणि सामाजिक ऐक्य यांचा सुंदर संगम घडवणारा हा उत्सव म्हणजे ग्रामीण संस्कृतीचे जिवंत वैभव होय.

सर्व छायाचित्रे संकल्पित.

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील वारी,सोनेवाडी,नगदवाडी,अकोले तालुक्यातील गिरगाव,लिंगदेव,लव्हाळवाडी,समशेरपूर,राजूर,शेंडी,उडदावणे,घाटघर,तसेच राहाता तालुक्यातील पिंपळवाडी,कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर या गावांमध्ये हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.नाशिक जिल्ह्यातील चांदवड,वावी,चांदोरी,अंदरसुल आणि मीठसागरे या गावात व ठाणे,पालघर जिल्ह्यातील अनेक गावांमध्येही ही परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने जोपासली जात आहे.

    विविध गावांच्या आखाडी उत्सवाच्या तारखा वेगवेगळ्या असल्या तरी शक्यतो आषाढ महिन्यात शेतीची मशागत आणि पेरणीची कामे पूर्ण झाल्यानंतर शेतकरी आनंदोत्सवाच्या भावनेने या उत्सवाची सुरुवात करतात.दशावतार किंवा बोहडा या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या या उत्सवाला धार्मिक,सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे.

   अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील वारी,सोनेवाडी,नगदवाडी,अकोले तालुक्यातील गिरगाव,लिंगदेव,लव्हाळवाडी,समशेरपूर,राजूर,शेंडी,उडदावणे,घाटघर,तसेच राहाता तालुक्यातील पिंपळवाडी,कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर या गावांमध्ये हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.नाशिक जिल्ह्यातील चांदवड,वावी,चांदोरी,अंदरसुल आणि मीठसागरे या गावात व ठाणे,पालघर जिल्ह्यातील अनेक गावांमध्येही ही परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने जोपासली जात आहे.पाच ते सात दिवस चालणाऱ्या या उत्सवात दररोज रात्री गणपती,सरस्वती,कंसवध,कालियामर्दन,नरसिंह अवतार,शिव-पार्वती,वीरभद्र,रावण तसेच विविध राक्षसी पात्रांची सोंगे साकारली जातात.रंगीबेरंगी वेशभूषा,देखणे मुखवटे आणि जोशपूर्ण नृत्य यामुळे जणू पुराणातील प्रसंग गावाच्या चौकात सजीव झाल्याचा भास निर्माण होतो.रात्रभर सुरू असलेले हे सादरीकरण गावकऱ्यांना भक्ती,रोमांच आणि मनोरंजनाचा अनोखा अनुभव देऊन जाते.

आखाडी उत्सव हा केवळ धार्मिक विधी नाही,तर तो आपल्या लोकसंस्कृतीचा,लोककलेचा आणि सामाजिक एकात्मतेचा अमूल्य वारसा आहे.या उत्सवामुळे गावात सुख,शांती आणि समृद्धी नांदते,तसेच चांगला पाऊस पडतो,अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे.श्रद्धा-अंधश्रद्धेच्या पलीकडे जाऊन पाहिले,तर या उत्सवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आधुनिक युगातील तरुण पिढीही आपल्या पूर्वजांचा सांस्कृतिक वारसा अभिमानाने जपत आहे.

   अनेक गावांमध्ये सोंग नाचविण्याचा मान लिलावात बोली लावून दिला जातो.सर्वाधिक बोली लावणाऱ्या व्यक्तीला इच्छित सोंग साकारण्याचा सन्मान मिळतो.काही घराण्यांमध्ये विशिष्ट सोंगे पिढ्यान्‌पिढ्या सादर करण्याची परंपरा आजही कायम आहे.विशेषतः नरसिंहाचे सोंग हे प्रतिष्ठेचे मानले जात असल्याने त्यासाठी सर्वाधिक बोली लागते.आखाडी उत्सवाची खरी शान म्हणजे त्यातील पारंपरिक वाद्यसंगीत.हलगी,पिपाणी,सनई,संबळ आणि ढोल यांच्या निनादातून सोंगातील रौद्र,वीर,करुण,शांत आणि आनंदमय भाव अधिक प्रभावीपणे प्रकट होतात.या वाद्यांना आणि त्यांना सुरेल ताल देणाऱ्या लोककलावंतांना उत्सवात मानाचे स्थान दिले जाते.

   एका सोंगाचा समारोप झाल्यानंतर पुढील सोंगाची तयारी होईपर्यंत काही गावात लोकनाट्य तमाशा मंडळातील कलाकार आपल्या लावण्या,वगनाट्य,विनोदी फार्से आणि लोककलेच्या विविध सादरीकरणातून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात.त्यामुळे आखाडी उत्सव हा विविध लोककलांचा संगम ठरतो.या उत्सवामागे असलेले परिश्रमही तितकेच मोलाचे आहेत.उत्सव सुरू होण्याच्या दहा ते पंधरा दिवस आधीपासून मुखवटे तयार करण्याचे काम सुरू होते.पांगारा लाकूड,कागदाचा लगदा,मेथीच्या बियांची पूड,बांबूंच्या कामठी आणि आकर्षक रंगसंगती यांच्या साहाय्याने हे कलात्मक मुखवटे तयार केले जातात.प्रत्येक मुखवट्यामागे लोककलावंतांची कल्पकता,मेहनत आणि कलानिष्ठा दडलेली असते.उत्सव सुरू होण्यापूर्वी सर्व मुखवट्यांची विधिवत पूजा केली जाते.नरसिंहाचे सोंग साकारणारा कलाकार दिवसभर उपवास करून पवित्र स्नानानंतरच अवतार धारण करतो.सोंग धारण करताच कलाकारामध्ये संचारणारा भाव,ऊर्जा आणि समर्पण पाहून प्रेक्षकही भारावून जातात.उत्कृष्ट सोंग सादर करणाऱ्या कलाकारांचा ग्रामस्थांच्या हस्ते गौरव केला जातो.

परंपरेच्या संवर्धनाची गरज


   आखाडी उत्सव हा केवळ धार्मिक विधी नाही,तर तो आपल्या लोकसंस्कृतीचा,लोककलेचा आणि सामाजिक एकात्मतेचा अमूल्य वारसा आहे.या उत्सवामुळे गावात सुख,शांती आणि समृद्धी नांदते,तसेच चांगला पाऊस पडतो,अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे.श्रद्धा-अंधश्रद्धेच्या पलीकडे जाऊन पाहिले,तर या उत्सवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आधुनिक युगातील तरुण पिढीही आपल्या पूर्वजांचा सांस्कृतिक वारसा अभिमानाने जपत आहे.आज गरज आहे ती अशा लोकपरंपरांचे दस्तऐवजीकरण करण्याची,त्यांचे संशोधन करण्याची आणि शासनासह समाजाने त्यांच्या जतन-संवर्धनासाठी पुढाकार घेण्याची.कारण लोकसंस्कृती जिवंत असेल,तरच आपल्या इतिहासाची,अस्मितेची आणि सांस्कृतिक ओळखीची ज्योत अखंड तेवत राहील हे नक्की!
                   
           मो.-9960838433
      ( लोककला व लोक कलावंत अभ्यासक )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close