पणन
भरडधान्य खरेदी योजनेची रक्कम मिळण्यास सुरुवात !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शासनाच्या भरडधान्य खरेदी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांकडून हमीभावाने खरेदी करण्यात आलेल्या मक्याच्या थकीत रकमेबाबत आ.विवेक कोल्हे यांनी पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.त्याला यश मिळाले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.व या शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रलंबित रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती त्यांच्या प्रसिद्धी कार्यालयाने दिली आहे.

सन-२०२५-२६ मध्ये राज्य सहकारी पणन महासंघामार्फत भरडधान्य खरेदी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांकडून हमीभावाने मका खरेदी करण्यात आला होता.मात्र ८ मार्च ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत खरेदी झालेल्या मक्याची देयके शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने राज्यातील अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते त्यांना हा दिलासा मिळणार आहे.
शेतकऱ्यांना शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत किमान आधारभूत किंमत (एम.एस.पी.) खरेदी योजना राबवली जाते.या योजनेअंतर्गत ज्वारी,बाजरी,मका आणि नाचणी यांसारखी भरडधान्ये थेट शासकीय केंद्रांवर खरेदी केली जातात.त्यानोंदणीसाठी आधार कार्ड,७/१२ उतारा,बँक पासबुकची प्रत आणि चालू मोबाईल क्रमांक आवश्यक असतो.खरेदी सुरळीत पार पाडण्यासाठी नोंदणी करताना बायोमेट्रिक/आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक केले होते.त्या शेतकऱ्यांना मात्र अद्याप त्यांची रक्कम मिळाली नव्हती.दरम्यान मार्चं महिन्यात राज्याचे पणन मंत्री कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आले होते.त्यावेळी आ.कोल्हे यांनी ही मागणी केली असल्याचा दावा केला आहे.त्यांनी राज्य शासनाकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मक्याच्या खरेदीची थकीत रक्कम वेळेत मिळण्यास सुरुवात झाली असून,राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सन-२०२५-२६ मध्ये राज्य सहकारी पणन महासंघामार्फत भरडधान्य खरेदी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांकडून हमीभावाने मका खरेदी करण्यात आला होता.मात्र ८ मार्च ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत खरेदी झालेल्या मक्याची देयके शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने राज्यातील अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते.खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बी-बियाणे,खते व इतर शेती साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत आवश्यकता होती.
या गंभीर बाबीची दखल घेत आमदार विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पत्राद्वारे तातडीने मागणी करून राज्यातील शेतकऱ्यांची थकीत रक्कम तत्काळ वर्ग करण्याची विनंती केली होती.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पणनमंत्री जयकुमार रावल यांनी या विषयाची दखल घेत राज्यातील शेतकऱ्यांना तातडीने पैसे देण्याचे आदेश दिले.त्यानुसार आता शासनाकडून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून,राज्यातील हजारो शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे.
याबद्दल आ.कोल्हे यांनी मुख्यमंत्री,पणनमंत्री तसेच शासनाचे आभार व्यक्त केले असून,पुढील काळातही राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील,असे त्यांनी सांगितले आहे.



