न्यायिक वृत्त
कोपरगाव येथील ऑनलाईन फसवणूक प्रकरणात जामीन मंजूर !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांची पत्नी यांची एकूण ८७ लाख ३० हजार ४०० रुपयांच्या मोठ्या रकमेच्या आर्थिक फसवणूकीबाबत आरोपीस अटक होऊन त्याची सुनावणी संपन्न झाली असून यातील परप्रांतीय आरोपी रुपेश शंकरलाल मंगे याचा कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्यायाडंधिकारी श्रीमती जे.एस.केळकर यांनी जामीन मंजूर केला असल्याची माहिती ॲड.सुयोग जगताप यांनी दिली आहे.

सदर प्रकरणातील आरोपी रुपेश शंकरलाल मंगे याची अन्य गुन्ह्यात रत्नागिरी तुरुंगात आहे.कायद्याची व सर्व परिस्थिती मांडून आरोपीचे या प्रकरणात सहभाग नसल्याचे प्रथम दर्शनी प्रभावीपणे युक्तिवाद करून ॲड.सुयोग जगताप यांनी आरोपीचा जामीन मंजूर केला आहे.याबाबत आरोपीच्या नातलगांनी समाधान व्यक्त केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हा क्रमांक २९/ २०२६ यामध्ये फिर्यादी हिंदी भाषिक व्यक्तीने फोन करून तुमच्या विरुद्ध सायबर गुन्हा दाखल झाला होता.यातील आरोपीने वृद्ध दांपत्याचे त्यांच्याच फोनवरून काही बँक ३४ लाख २० हजार दोनशे रुपये व पत्नी यांचे खात्यातून ५३ लाख १० हजार दोनशे असे एकूण ८७ लाख ३० हजार ४०० रुपयांच्या मोठ्या रकमेची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी एका अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

सदर प्रकरणी तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांनी विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी तपासाचे चक्र वेगाने फिरून नगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेल व आर्थिक गुन्हे यांच्या गतिमान तपासातून आरोपी रुपेश शंकरलाल मंगे यास अटक करून पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले होते.
दरम्यानच्या काळात पोलीस तपास पूर्ण करून आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले होते.सदर प्रकरणात आरोपीच्या बाजूने ॲड.सुयोग जगताप यांनी बाजू मांडून आरोपीचा सदर प्रकरणात काही संबंध नसून आरोपीचे खाते वापरून अन्य आरोपींनी गुन्हा केल्या बाबतचे व इतर कायदेशीर होते मांडून आरोपीचा जामीन न्यायालय श्रीमती जे.एस.केळकर यांनी अटी व शर्तीवर मंजूर केला आहे.
सदर प्रकरणातील आरोपी अन्य गुन्ह्यात रत्नागिरी तुरुंगात आहे.कायद्याची व सर्व परिस्थिती मांडून आरोपीचे या प्रकरणात सहभाग नसल्याचे प्रथम दर्शनी प्रभावीपणे युक्तिवाद करून ॲड.जगताप यांनी आरोपीचा जामीन मंजूर केला आहे.याबाबत आरोपीच्या नातलगांनी समाधान व्यक्त केले आहे.
परंतु अशा ऑनलाइन फसवणूक प्रकरणात आपण कोणताही ओटीपी अथवा समोरच्या सांगण्यावरून आपले बँक डिटेल्स,आधार नंबर,ओटीपी असे काहीही माहिती देऊ नये व ऑनलाईन फसवणुकीस बळी पडू नये असे अहवान ॲड.सुयोग जगताप यांनी केलेले आहे.
सदर प्रकरणी ॲड.भारती काटकर,ॲड. अनिकेत वाकचौरे,ॲड.अंजली रासकर आदींनी यांनी साहाय्य केले आहे.



