जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

‘रास्ता रोको’प्रकरणात आंदोलक निर्दोष !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सकल कोपरगाव मराठा आंदोलनकर्त्यांनी कोपरगाव नजीक असलेल्या ‘साईबाबा कॉर्नर’ परिसरात व तालुक्यातील धामोरी रस्त्यावर विनापरवाना ‘रास्ता रोको’ आंदोलन केले होते.परिणामी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दि.२४ डिसेंबर २०२४ रोजी आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्याची सुनावणी नुकतीच संपन्न झाली असून यात न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले असल्याची माहिती ॲड.योगेश खालकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

‘रास्ता रोको ‘आंदोलनाचे संकल्पित छायाचित्र.

दरम्यान याबाबत कोपरगाव येथील न्यायालयात खटला सुरू होता.त्याचा निकाल नुकताच लागला असून त्यात आरोपींच्या बाजूने कोपरगाव न्यायालयात ॲड.योगेश खालकर यांनी मोफत विधी सहाय्य पुरवले होते.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

   सन-2024 साली मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर राज्यात आंदोलने झाली होती.त्यात अनेक ठिकाणी कार्यर्कत्यांनी सहभाग नोंदवला होता.अनेक जनावर सरकारने सूडबुद्धीने गुन्हे दाखल करण्यात आले होते.तरीही मराठा समाजातील नागरिक हटवण्यास तयार नव्हते.त्यामुळे अनेक ठिकाणी आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले होते.त्यात कोपरगाव तालुक्याचा समावेश होता.त्यात कोपरगाव येथील ‘साईबाबा कॉर्नर’येथील आंदोलन विशेष गाजले होते.

   दरम्यान या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांत विनय भगत,विकास आढाव,बाळासाहेब देवकर,अनिल साळुंके संदीप डुंबरे तर धामोरी रस्त्यावर झालेल्या आंदोलनात नारायण भाकरे,ज्ञानदेव मांजरे,सुनील मांजरे,नारायण मांजरे,संदीप कुऱ्हाडे,सचिन वाघ,सुनील वाणी,अशोक भाकरे,प्रकाश वाघ,बाळासाहेब जाधव,गायकवाड अदी मराठा आंदोलन कर्त्याचा समावेश होता.

ॲड.योगेश खालकर यांचे समवेत आंदोलनकर्ते.

   दरम्यान याबाबत कोपरगाव येथील न्यायालयात खटला सुरू होता.त्याचा निकाल नुकताच लागला असून त्यात आरोपींच्या बाजूने कोपरगाव न्यायालयात ॲड.योगेश खालकर यांनी मोफत विधी सहाय्य पुरवले होते.सर्व बाबींची माहिती घेत कोपरगाव कोर्टाने मराठा आंदोलन कर्त्यांना निर्दोष मुक्त करत त्याचा खटला निकाली काढला आहे.सदर खटला निकाली निघाल्याने मराठा आंदोलनकर्त्यांनी कोपरगाव येथे आनंद व्यक्त केला आहे.मराठा पदाधिकारी व समाजाच्या वतीने ॲड.योगेश खालकर यांचे विना मोबदला केस लढवल्यामुळे आभार मानले असून त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close