न्यायिक वृत्त
…या न्यायालयात वकिल कामकाजापासून अलिप्त !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
श्रीरामपूर येथील वकील संघाचे सदस्य ॲड.संजय कोते यांच्यावर दोन आरोपींनी खुनी हल्ला केल्याचे निषेधार्थ कोपरगाव वकील संघाने आज न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतल्याने आज अनेक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला असल्याची बाब उघड झाली आहे.

“श्रीरामपूर येथील ज्येष्ठ वकील ॲड.संजय कोते यांना पक्षकाराने परवा सायंकाळी मारहाण केल्याचे निषेधार्थ सरकारने तातडीने,”ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट” मंजूर करावा यासाठी निषेध सभा घेतली आहे.अशा घटना रोखण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे” -ॲड.शरद गुजर,अध्यक्ष,कोपरगाव वकील संघ.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,”न्यायालयात प्रलंबित असलेल्या जमिनीच्या वादात नातेवाईकांना मदत करतो,या संशयावरून एका ज्येष्ठ वकिलावर पिता-पुत्राने प्राणघातक हल्ला केला केला असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली असून यात
श्रीरामपूरमधील या धक्कादायक घटनेने न्यायालयीन क्षेत्रात खळबळ उडाली आहे. हल्लेखोराने वकिलाच्या डोक्याला गावठी पिस्तूल लावून ‘एक खून केला आहे,दुसरा करायला वेळ लागणार नाही’ अशी धमकी दिली.वकिलावर झालेल्या या हल्ल्याचे पडसाद संपूर्ण राज्यातील न्यायालयीन क्षेत्रात उमटू लागले आहे.श्रीरामपूरमधील अॅड.संजय कोते (वय-६३,रा.दत्तनगर,सुतगिरणी रोड) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मयूर विजय काळे आणि विजय यशवंत काळे दोघे रा.श्रीरामपूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अॅड.कोते हे मूळ वाकडी येथील रहिवासी असून ते ज्येष्ठ वकील असून ते श्रीरामपूर आणि राहाता न्यायालयात गेल्या ३७ वर्षांपासून वकिली करतात.त्यांच्या पत्नीचे नातेवाईक बबनराव घोरपडे यांचा एका चार गुंठे प्लॉटवरून आरोपींशी न्यायालयात वाद सुरू आहे.कोते हे घोरपडे यांना मदत करतात,असा आरोपींचा समज होता.शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अॅड.कोते संगमनेर रस्त्यावरील एका हेअर ड्रेसरच्या दुकानातून बाहेर पडत असताना आरोपी मयूर काळे याने त्यांना गाठले व त्यांना लाकडी दांडक्याने व बुक्क्यांनी मारहाण केली असल्याचा आरोप आहे.या घटनेचे राज्यात पडसाद उमटायला सुरुवात झाली असून कोपरगाव वकील संघाने आज सकाळी ११.३० वाजता त्यांच्या सभागृहात एक तातडीची बैठक घेऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
दरम्यान याबाबत वकील संघाचे अध्यक्ष ॲड.शरद गुजर यांनी म्हटले आहे की,”श्रीरामपूर येथील ज्येष्ठ वकील ॲड.संजय कोते यांना पक्षकाराने परवा सायंकाळी मारहाण केल्याचे निषेधार्थ ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट मंजूर करावा यासाठी निषेध सभा घेतली आहे.सभेच्या अध्यक्षस्थानी ॲड.महेश भिडे हे होते.आज रोजी कोपरगाव वकील संघाने या घटनेच्या निषेधार्थ अलिप्त राहण्याचे ठरविण्यात आले असल्याची माहिती ॲड.अशोक टुपकें यांनी दिली आहे.
दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ शिवाय कोपरगाव वकील संघाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सदर प्रसंगी वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड.जयंत जोशी,ॲड.अशोक वहाडणे,ॲड.अशोक टुपके,वकील संघाचे अध्यक्ष ॲड.शरद गुजर,उपाध्यक्ष महेश भिडे,सचिव परेश डागा,सहसचिव महेंद्र जाधव,महिला उपाध्यक्षा ॲड.सविता पोळ खजिनदार नितीन गिरमे,ॲड.दिलीप लासुरे, ॲड.चांदगुडे श्रीकांत,ॲड.योगेश खालकर,नितीन पोळ,आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते.
*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा.
https://bit.ly/newsseva2025
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.
दरम्यान यावेळी ॲड.शंतनु धोर्डे,ॲड.जयंत जोशी,ॲड.भास्करराव गंगावणे,ॲड.अशोक टुपके,ॲड.संजय मंडलिक,ॲड.मनोज कडू,ॲड.सौ.मैले मॅडम,ॲड.मोकळ आदींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.
सदर प्रसंगी प्रास्ताविक उपाध्यक्ष महेश भिडे यांनी तर सूत्रसंचालन ॲड.परेश डागा तर उपस्थितांचे आभार सहसचिव जाधव यांनी मानले आहे.



