जाहिरात-9423439946
निवड

कोपरगाव बाजार समिती पदाधिकारी निवड जाहीर…

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज संपन्न झालेल्या पदाधिकारी निवडीत अपेक्षे प्रमाणे कोल्हे गटाचे निष्ठावान कार्यकर्ते साहेबराव किसनराव रोहोम यांची सभापती पदी तर उपसभापती पदी काळे गटाचे कार्यकर्ते गोवर्धन बाबासाहेब परजणे यांनी बिनविरोध निवड झाली आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे कोपरगाव तालुक्यातून स्वागत होत आहे.

दरम्यान त्यात सभापदी पदासाठी साहेबराव रोहोम यांच्या नावाची सूचना प्रकाश गोर्डे यांनी मांडली होती.त्यास अनुमोदन साहेबराव लामखेडे यांनी दिले होते.तर उपसभापती पदासाठी गोवर्धन परजणे यांच्या नावाची सूचना संजय शिंदे यांनी मांडली होती त्यास अनुमोदन माजी उपसभापती राजेंद्र निकोले यांनी दिले होते.

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी गत पंधरवाड्यात संपन्न होऊन त्या लढाईत प्रस्थापित आ.आशुतोष काळे,माजी आ.कोल्हे,राजेश परजणे,औताडे सेनेने बाजी मारली असून सर्वच्या सर्व १८ जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या होत्या.दरम्यान पदाधिकारी निवडणूसाठी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ यांनी पदाधिकारी निवडणून जाहीर केली होती.त्याप्रमाणे आज बाजार समिती कार्यालयात आज हि निवडणूक बिनविरोध संपन्न झाली आहे.त्यात कोल्हे गटास आधी सभापती पद देण्याचा निर्णय या आघाडीत झाला होता.त्यानुसार अडीच वर्षासाठी हि निवड संपन्न झाली आहे.

“दरम्यान कोपरगाव बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम व उपसभापती गोवर्धन परजणे या नूतन पदाधिकारी यांच्या निवडीचे गोदावरी कालवा कृती समितीच्या वतीने अभिनंदन व नूतन पदाधिकारी हे कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली निघण्यास मदत करतील आणि कोपरगाव तालुका लेट खरीप कांदा अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा करतील”-तुषार विध्वंस,कार्यकर्ते,गोदावरी कालवे कृती समिती,कोपरगाव तालुका.

दरम्यान त्यात सभापदी पदासाठी साहेबराव रोहोम यांच्या नावाची सूचना प्रकाश गोर्डे यांनी मांडली होती.त्यास अनुमोदन साहेबराव लामखेडे यांनी दिले होते.तर उपसभापती पदासाठी गोवर्धन परजणे यांच्या नावाची सूचना संजय शिंदे यांनी मांडली होती त्यास अनुमोदन माजी उपसभापती राजेंद्र निकोले यांनी दिले होते.

दरम्यान निवडणूक अधिकारी नामदेव ठोंबळ यांनी दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकेक अर्ज दाखल झाल्याने सभापती पदी साहेबराव रोहोम यांची तर उपसभापती पदी गोवर्धन परजणे यांची निवड बिनविरोध जाहीर केली आहे.

दरम्यान सदर प्रसंगी संजीवनी सहकारी साखर कारखाण्याचे माजी अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी,”आपण कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न अखेरच्या क्षणा पर्यंत केला मात्र त्याला अपयश आले असल्याचे शल्य बोलून दाखवले आहे.

दरम्यान नूतन पदाधिकारी यांची निवड जाहीर झाल्यानंतर त्यांचे संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष बिपीन कोल्हे,दत्तात्रय कोल्हे,बाजार समितीचे संचालक खंडू फेफाळे,अशोक नवलेसह सर्व नूतन संचालक अरुण येवले,विश्वास महाले,पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी वक्ते,कर्मवीर काळे सहकारी साखर कारखाण्याचे उपाध्यक्ष दिलीप बोरणारे,देवेंद्र रोहमारे,धरमचंद बागरेचा,बापूसाहेब सुराळकर,दादासाहेब टुपके,भरत बोरणारे,प्रशांत वाबळे,प्रदीप नवले,संतोष बोरावके,सुनील देवकर,संदीप देवकर,कृष्णा परजणे,दिलीप चौधरी,विक्रम पाचोरे आदी मान्यवरांसह अनेक जण उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close