जाहिरात-9423439946
निवड

कोपरगावातील…या बँकेच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

सहकारात अग्रणी असललेल्या कोपरगांव पिपल्स बॅकेचे अध्यक्षपदी कैलासचंद ठोळे तर उपाध्यक्षपदी भाउसाहेब लोहकरे यांची निवड करण्यात आली असून या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोपरगाव पिपल्स बॅकेचे नूतन अध्यक्ष कैलासचंद ठोळे हे गत पंचेचाळीस वर्षांपासून बँकेचे संचालक पदावर असुन त्यांनी सन १९८१-८२ मध्ये उपाध्यक्ष व सन-१९९२ व २००९-१० मध्ये अध्यक्षपद यापुर्वी भुषविलेले असून ते कोपरगांवातील प्रसिध्द उदयोगपती असुन त्यांनी रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर डी.आर.मेहता यांचे अध्यक्षतेखाली नेमलेल्या अग्रीकल्चर व फर्टीलायझर डिलर्सचे कर्ज समितीवर सदस्य म्हणून दोन वर्ष,महाराष्ट्र फर्टीलायझर अॅण्ड पेस्टीसाईड डिलर्स असोसीएशनचे या संस्थेचे २७ वर्ष अध्यक्षपदावर काम केले आहे.

अ.नगर जिल्ह्यातील सहकारी बँकात अग्रणी समजल्या जाणाऱ्या कोपरगाव को-ओपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीचे मतदान संपन्न होऊन निकाल गत सप्ताहात हाती आले होते यात सहकार पॅनलचे एकवीस पैकी सर्वच्या सर्व १५ जागा सत्ताधारी गटाचे उमेदवार निवडून आले होते.तर विरोधकांचे सहा उमेदवार पराभूत झाले होते.त्यानंतर या बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सभासदांचे लक्ष लागले होते.

त्या बाबत सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ यांनी पदाधिकारी निवडणूक नुकतीच त्यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर केली होती.त्यात नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अनुक्रमे कैलासचंद भागचंद ठोळे यांच्या नावाची सुचना कल्पेश जयंतीलाल शहा यांनी मांडली होती त्यास अतुल धनालाल काले यांनी अनुमोदन दिले होते.तसेच उपाध्यक्ष पदाकरीता भाउसाहेब शंकरराव लोहकरे यांच्या नावाची सुचना रविंद्र रतनचंद ठोळे यांनी मांडली त्यास राजेंद्र मोतीलाल शिंगी यांनी अनुमोदन दिले होते.
दरम्यान अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरीता प्रत्येकी एकच अर्ज आल्याने त्यांची एकमताने निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी नामदेव ठोंबळ यांनी जाहिर केले आहे.

दरम्यान सदर प्रसंगी सहकार अधिकारी ए.आर.रहाणे,बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक एकबोटे,सहाय्यक महाव्यवस्थापक जितेंद्र छाजेड,कनिष्ठ अधिकारी विठ्ठल रोठे आदी मान्यवर उपस्थित होते.त्यावेळी अ.नगर जिल्हा बँक एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी प्रदीप नवले यांनी बँकेचे सेवकांचे वतीने सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close