जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दुचाकींचा अपघात एक ठार,दुसऱ्या घटनेत एकाची आत्महत्या

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील नगर-मनमाड राज्य मार्गावर काल कधीतरी दुचाकीला झालेल्या अपघातात येवला तालुक्यातील जलाल पिंपळगाव येथील तरुण शिवहरी विलास भोरकडे (वय-१८) हा तरुण जखमी झाला असता त्यास शिर्डी येथील साईबाबा संस्थांनच्या रुग्णालयात उपचारार्थ भरती केले असता त्या ठिकाणी त्याचे उपचारा दरम्यान निधन झाल्याचे वृत्त असून या बाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंदणी झाली आहे.दरम्यान धामोरी हद्दीत एका ऊसतोड कामगाराने आपल्या कोपीस गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.या दोन्ही घटनेबाबत येवला व कोपरगाव,चाळीसगाव आदी तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान दुसऱ्या एका घटनेत धामोरी येथे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या गट कार्यालयासमोर दि.२१ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजेपूर्वी ऊसतोडणी कामगार मच्छीन्द्र नाथा चव्हाण (वय-४२) रा.तळोदे ता.चाळीसगाव याने आपल्या राहत्या कोपीस असलेल्या छताच्या लाकडी बल्लीस दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.

उत्तर भारतीयांना पुणे आणि दक्षिण भारतासाठी जवळचा ठरणारा मार्ग म्हणून नगर-मालेगाव या मार्गाची ओळख आहे.मात्र या मार्गाचा म्हणावा असा विकास अद्याप करण्यात आलेला नाही त्यामुळे वाहांनाच्या प्रचंड गर्दीने अपघाताची मालिका अखंडितपणे सुरु आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगावच्या उत्तरेस साधारण तीन कि.मी.अंतरावर घडली असून साईधाम कमानी जवळ हा मयत तरुण आपल्या कामासाठी दि.२३ फेब्रुवारी रोजी कधीतरी येवल्यावरून कोपरगाव कडे येत असताना त्यास अज्ञात वाहनाने धडक दिली आहे.त्यात तो गंभीर रित्या जखमी झाला होता.त्यास नजीकच्या नागरिकांनी उपचारार्थ शिर्डी येथील साईबाबा संस्थांनच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते.तेथे उपचार सुरु असताना त्याचे त्यात आज सकाळी ०७.३१ वाजता निधन झाले आहे.

या प्रकरणी तेथील उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ.मुकुंद चौधरी यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात याबाबत खबर दिली आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक देसले व पोलिस नाईक दारकुंडे यानी भेट दिली आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात खबर देणार डॉ.चौधरी यांच्या तक्रारीनुसार आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंदणी क्रं.११/२०२३ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे करण्यात आलेली आहे.
पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ए.एम.दारकुंडे हे अधिकारी हे करीत आहेत.

दरम्यान दुसऱ्या एका घटनेत धामोरी येथे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या गट कार्यालयासमोर दि.२१ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजेपूर्वी ऊसतोडणी कामगार मच्छीन्द्र नाथा चव्हाण (वय-४२) रा.तळोदे ता.चाळीसगाव याने आपल्या राहत्या कोपीस असलेल्या छताच्या लाकडी बल्लीस दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद क्रं.०९/२०२३ सी.आर.पी.सी.१७४ अन्वये नोंद करण्यात आलेली आहे.प्राप्त माहितीनुसार सदर मजूर हा व्यसनी असल्याने हि घटना घडली आहे.त्याच्या पश्चात पत्नी,मुलगा,सून असा परिवार असल्याची माहिती पोलिसी सूत्रांनी दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.संदीप बोटे हे करित आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close