निवड
आ.कोल्हे यांची…या राज्यात प्रभारी म्हणून निवड!

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
राजस्थानमधील आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने निवडणूक तयारीला वेग दिला असून,महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाली येथील निवडणूक प्रभारी म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेचे आ.विवेक कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या जबाबदारीनंतर आ. कोल्हे यांनी पाली येथे निवडणूक तयारीसह पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या कामाला सुरुवात केली असून,आगामी निवडणुकीत भाजपचा विजय सुनिश्चित करण्यासाठी बूथ स्तरापर्यंत नियोजन करण्यात येत आहे.

“आगामी नगर निकाय निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित करण्यासाठी संघटनेची ताकद अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली बूथ सशक्तीकरण,प्रभावी जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक बांधणीचे काम सुरू आहे.पालीतील कार्यकर्त्यांमध्ये असलेला उत्साह आणि ऊर्जा भाजपच्या विजयासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपाचा निश्चितच विजय होईल”- विवेक कोल्हे,आमदार,राज्य विधानपरिषद.
राजस्थानमधील आगामी शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पासून सुरू होत असून,’एक राज्य,एक निवडणूक’ या चौकटीअंतर्गत होणाऱ्या या पहिल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत.३०९ शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील १०,२४५ प्रभागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि काँग्रेसने अद्याप त्यांच्या उमेदवारांची यादी अंतिम केलेली नाही.दोन्ही पक्ष २८ किंवा २९ ऑगस्ट रोजी आपली तिकिटे जाहीर करतील अशी अपेक्षा व्यक्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने निवडणूक प्रभारी म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेचे आ.विवेकभैय्या कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान याबाबत आ.कोल्हे यांनी निवडणूक निरीक्षक नरेंद्र पवार यांच्यासमवेत पाली येथील भाजप जिल्हा कार्यालयास भेट दिली आहे.यावेळी भाजप पालीच्या वतीने पारंपरिक साफा (राजस्थानी फेटा)बांधून आ.कोल्हे यांचे स्वागत करण्यात आले आहे.महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातून आलेले पदाधिकारी तसेच पाली भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठक पार पडली.आगामी नगरपरिषद निवडणुकीत पालीमध्ये भाजपचा विजय निश्चित करण्यासह राजस्थानातील ‘ट्रिपल इंजिन’ सरकार अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.यात बैठकीत बूथ सशक्तीकरण,संघटनात्मक नियोजन,कार्यकर्त्यांची बांधणी आणि प्रभावी जनसंपर्क यावर विशेष भर देण्यात आला आहे.प्रत्येक मतदार केंद्रावर अधिक सक्षम करून पक्षाची संघटनात्मक ताकद तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून भाजपची ताकद वाढविण्याचे आवाहन आ. कोल्हे यांनी केले आहे.
सदर प्रसंगी यावेळी पाली जिल्हा महामंत्री नारायण कुमावत,भाजप प्रवक्ते मंगलराम प्रजापत,प्रताप मंडल अध्यक्ष मानवेन्द्रसिंह भाटी,शिवाजी मंडल उपाध्यक्ष अभिषेक दुग्गड,प्रताप मंडल महामंत्री कैलाश गौड,प्रताप मंडल मंत्री अजय वैष्णव तसेच जिलामंत्री प्रताप सिंह यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.



