जाहिरात-9423439946
निवडणूक

गणेश कारखाना,मंत्री विखे विरुद्ध भाजपची काँग्रेसला घेऊन बंडखोरी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राहाता तालुक्याची कामधेनू समजल्या जाणाऱ्या गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत आज अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सत्ताधारी महसूल मंत्री विखे यांचे गटा विरुद्ध भाजप (कोल्हे गट) व काँग्रेसचे नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात गट विरोधी ठाकले असून शेतकरी संघटनेने आपला स्वतंत्र पॅनल उभा केल्याने हि लढत आता तिरंगी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे त्यांच्या पुढे शेतकरी संघटनेचे मोठे आव्हान उभे ठाकले असल्याचे मानले जात आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”राहाता तालुक्याची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुक संपन्न होत असून याबाबत चित्र स्पष्ट झाले आहे.हा सामना तिरंगी होत असून यात राज्याचे महसुलमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांचा जनसेवा,माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात व कोल्हे गटाचा गणेश परिवर्तन मंडळाचे विरुद्ध शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांनी दंड थोपटले आहे.शेतकरी संघटनेचे ०८ उमेदवारांचा पॅनल रिंगणात आहे.तर कोल्हे गटाच्या एका उमेदवारांची वेळेत माघार न झाल्याने तो उमेद्वारही अपक्ष म्हणुन रिंगणात आहे.१९ जागांसाठी ४७ उमेद्वार रिंगणात आहेत.

“श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचा तोटा मोठ्या प्रमाणावर वाढला असून ती कमी करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उचांकी भाव देणे गरजेचे आहे त्यासाठी शेतकरी संघटना या लढाईत उतरली आहे.त्यासाठी वैधानिक लढा सुरु ठेंवणार आहे.त्याला सभासद नक्कीच न्याय देतील”-अड्.अजित काळे,उपाध्यक्ष,प्रदेश शेतकरी संघटना,

श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक १९ जागांसाठी १७ जून रोजी होत आहे.या निवडणुसाठी पाच गटातुन ०८ हजार १५० सभासद मतदार आहेत.उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी ९२ उमेद्वारांपैकी ४५ उमेदवारी अर्ज माघे घेतले.आता रिंगणात ४७ उमेद्वार आहेत.गणेश च्या या निवडणूकीत जोरदार लढत होण्याचे संकेत आहेत.विद्यमान महसुल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील व माजी महसुलमंत्री आ.बाळासाहेब थोरात या आजी माजी मंत्र्यांच्या सहभागामुळे संपुर्ण नगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

निवडणूकीतील उमेदवार गट निहाय खालील प्रमाणे-

शिर्डी गट-

बाबासाहेब रामभाऊ डांगे, बाबासाहेब परशराम मते (दोघे विखे गट),बाबासाहेब दादा डांगे,विजय भानुदास दंडवते (दोघे थोरात कोल्हे गट),भाऊसाहेब पंढरीनाथ शिंदे (शेतकरी संघटना).
राहाता गट- उत्तम बळवंत डांगे,अनिल सोपान सदाफळ,पुंजाजी दगडू गमे (तिघे विखे गट),गंगाधर पांडूरंग डांगे, नारायणराव ज्ञानेश्‍वर कार्ले,संपत कचरु हिंगे (तिघे थोरात कोल्हे गट).

अस्तगाव गट –

शिवनाथ नेवजी घोरपडे, संजय कारभारी नळे, जालिंदर गंगाधर मुरादे (तिघे विखे गट), महेंद्र चांगदेव गोर्डे, नानासाहेब काशिनाथ नळे, बाळासाहेब कुंडलिक चोळके (थोरात कोल्हे गट), सतीश पंढरीनाथ मोरे (शेतकरी संघटना).

वाकडी गट-

विशाल पुरुषोत्तम गोरे, राजेंद्र विठ्ठल लहारे, संपत काशिनाथ शेळके (तिघे विखे गट), अरुंधती अरविंद फोपसे, सुधीर वसंतराव लहारे, विष्णुपंत शंकर शेळके (थोरात कोल्हे गट).

पुणतांबा गट-

दत्तात्रय सदाशिव धनवटे, बाळासाहेब दत्तात्रय गाढवे (दोघे विखे गट). संपत नाथाजी चौधरी, अनिल सोपान गाढवे (दोघे थोरात कोल्हे गट). बापु पंढरीनाथ धनवटे, नानासाहेब खुशाल गाढवे (दोघे शेतकरी संघटना).

महिला मतदार संघ-

अनिताबाई विलास कोते,गयाबाई ओंकार भवर (दोघी विखे गट),कमलाबाई पुंडलिक धनवटे, शोभाताई एकनाथ गोंदकर (दोघी थोरात कोल्हे गट).लक्ष्मीबाई नानासाहेब गाढवे (शेतकरी संघटना). वैशाली दिलीप क्षिरसागर (अपक्ष).

इतर मागास प्रवर्ग-

प्रकाश रामदास पुंड (विखे गट), अनिल राजाराम टिळेकर (थोरात कोल्हे गट), नारायण गोविंद भुजबळ (शेतकरी संघटना).

अनु. जाती जमाती मतदार संघ-

प्रदिप पोपटराव बनसोडे (विखे गट), अल्पेश शांतवन कापसे (थोरात कोल्हे गट).

भटक्या जाती विमुक्त जमती मतदार संघ-

संजय आबाजी भाकरे (विखे गट),मधुकर यशवंत सातव (थोरात कोल्हे गट).भगवंता मायजी मासाळ (शेतकरी संघटना). ‘ब’ वर्ग मतदार संघ-ज्ञानदेव बाजीराव चोळके (विखे गट),सुधाकर नारायण जाधव (थोरात कोल्हे गट) असे एकूण ४७ उमेद्वार निवडणूक रिंगणात आहेत.या लढतीत राज्याचे आजी माजी महसुल मंत्री व त्यांचा सामना शेतकरी संघटनेशी होत असल्याने या लढती कडे राज्याचे लक्ष लागून आहे.

राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनू समजल्या जाणाऱ्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचा पंचवार्षिक निवडणूकीस आता रंग भरू लागला असून १९ जागांसाठी हि निवडणूक आगामी १७ जून रोजी संपन्न होत असून आलेल्या एकूण १०६ पैकी नामनर्देशन पत्रापैकी १३ अवैध झाले होते त्यामळे उर्वरित ९३ अर्ज शिल्लक होते.आज शिल्लक असलेले अर्ज इच्छुकांना २३ मे पासून आज ०६ जून या दरम्यान मागे घेण्याची अंतिम मुदत असताना आज ०३ वाजेच्या सुमारास हे चित्र स्पष्ट झाले आहे.त्यामुळे हि निवडणूक शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांनी घेण्यास भाग पाडली असल्याचे मानले जात आहे.अन्यथा सदर निवडणुकीत संजीवनी-कोपरगाव कारखान्याची पुनरावृत्ती होणार होती असे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान आज आपले उमेदवारी माघारी घेतलेल्या उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे-

सर्वसाधारण उत्पादक गट– क्रं.१ शिर्डी-थेटे बाजीराव कोंडाजी,दंडवते अशोक दामोदर,अनुप अशोकराव दंडवते,दिगंबर शिवराम कोते,विलास यादवराव कोते आदीं ५ जणांनी रणातून पाय काढला आहे.

सर्वसाधारण उत्पादक गट– क्रं.२ राहाता-शिवाजी तुकाराम आनप,ज्ञानेश्वर बाबुराव सदाफळ आदी दोघांनी आपले बाण भात्यात घातले आहे.

गट क्रमांक-३ अस्तगाव- विजय रामभाऊ जेजूरकर,ज्ञानदेव बाजीराव चोळके,सुर्यभान दशरथ गोर्डे आदीं तीन जणांचा समावेश आहे.

गट क्रमांक-४ वाकडी-गजानन रंगनाथ फोफसे,नारायण भिकाजी शेळके आदीं दोन जणांचा समावेश आहे.

गट क्रमांक-५ पुणतांबा-दिलीप दादा क्षीरसागर,चंद्रकांत यादव डोखे,उमाकांत भास्करराव धनवटे,बनकर साहेबराव तुकाराम,जनार्दन भागूजी गाढवे,दिपक रामकृष्ण डोखे,यशवंत अण्णासाहेब चौधरी आदीं ०७ जणाचा समावेश आहे.

उत्पादक सहकारी संस्था-राजेंद्र विठ्ठलराव लहारे,यशवंत अण्णासाहेब चौधरी,आदीं दोघांचा समावेश आहे.

अनुसूचित जाती-जमाती मतदार संघ क्रं.-३-बाबासाहेब गणपत पाळंदे,गणेश बाबुराव थोरात आदींनीं आपली शस्रे म्यान केली आहेत.

महिला प्रतिनिधी मतदार संघ-४-अरुंधती अरविंद फोफसे,लताबाई लक्ष्मण डांगे,कंचनमाला तुकाराम गाढवे,सुजाता बाळासाहेब गाढवे,सुनीता तुकाराम बोरबने,मंदा दादासाहेब गाढवे,सुलभा मधुकर कोते,लताबाई बाबासाहेब डांगे,सुनीता रामेश्वर फोफसे,मंदाकिनी विठ्ठल डांगे आदीं महिला उमेदवारांनी रणांगण सोडले आहे.

इतर मागासवर्ग मतदार संघ क्रं.५- अण्णासाहेब बजाबा वाघे,शिवाजी तुकाराम आनप,बलराज पुंडलिक धनवटे,नाना रेवजी शेळके,सुनीता तुकाराम बोरबने,सुरेश सुखदेव गाडेकर,विजय रामभाऊ जेजुरकर आदींनी पांढरे निशाण फडकवले आहे.

भटक्या विमुक्त जाती-जमाती विशेष मागास वर्ग प्रतिनिधी मतदार संघ-६-भीमराज चांगदेव रकटे,सुनील मुरलीधर थोरात,साहेबराव भाऊराव काटकर,वसंत सखाराम गायकवाड आदींनीं रण सोडले आहे.

दरम्यान आज रिंगणात शिल्लक असलेल्या अर्जाची नावे अद्याप निवडणूक अधिकाऱ्यानीं अधिकृतपणे जाहीर केलेले नाही.ते निवडणूक चिन्ह दिल्यावर उद्या प्रकाशित करणार असल्याची माहिती उपलब्ध होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close