जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

महिलेवर जावयाकडून हल्ला,कोपरगावात गुन्हा

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील रहिवासी असलेले शेतकरी रघुनाथ घायतडकर यांच्या पत्नी मुक्ताबाई घायतडकर यांना त्यांचा पुतण्या अमोल घायतडकर याने रात्रीच्या सुमारास नुकताच विळ्याने हल्ला चढवला असल्याची घटना उघड झाली असताना कोपरगाव शहरातील सुभाषनगर येथील सासू नंदाबाई विजय हांडोरे (वय-५५) हि महिला आपल्या पत्नीस नवऱ्याकडे नांदविण्यास पाठवीत नाही याचा राग धरून तिचा नाशिक जवळील पाथर्डी येथील जावई निलेश विजय सोमवंशी याने तिच्यावर विळ्याने हल्ला चढविला असून ती गंभीर जखमी झाली असल्याची दोन दिवसातील दुसरी धक्कादायक माहिती हाती आली आहे.

या घटनेत नाशिक नजीक असलेल्या पाथर्डी येथील आरोपी तथा जावई तरुण निलेश सोमवंशी याने आपल्या सुभाषनगर कोपरगाव येथील सासु नंदाबाई हांडोरे हिच्यावर विळ्याने हल्ला केला असून त्यात पाठीवर,दंडाला,कमरेला,पोटाचे बाजूने कमरेवर जखमा झाल्या आहेत.त्यावर नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी या घटनेबाबत दुजोरा दिला असून सदर जखमी महिला नंदाबाई विजय हांडोरे या आपल्या मुलासह कुटूंबात सुभाषनगर येथे राहते.त्यांना एक मुलगा असून तो हि त्याच ठीकाणी राहतो.मुलीचे काही वर्षा पूर्वी लग्न झाले होते.मात्र नव्या नवलाईचे नऊ दिवस गेल्यावर मुलगी आणि जावई यांच्यात वितूष्ठ आले होते.त्यानंतर जखमी महिलेची मुलगी आपल्या माहेरी आली होती.त्यावरून न्यायालयात फारकत घेण्यावरून वाद सुरु होता.

दरम्यान काल जखमी महिलेचा पाथर्डी नाशिक येथील जावई निलेश सोमवंशी हा आपल्या पत्नीस भेटण्यास आला होता.त्यात दोन्ही गटात जखमी महिलेची मुलगी सासरी नांदविण्यास पाठविण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता त्यावरून जावयाने हा हल्ला चढवला होता.हि दुर्दैवी घटना दि.०४ जून रोजी रात्री ८.३० वाजता घडली आहे.दरम्यान हा हल्ला झाल्याने नजीकच्या नागरिकांनी हा हल्ला परतवून लावण्यासाठी व त्यास अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांच्यावरही हल्ला केला असल्याचे वृत्त आहे.त्यात काही नागरिक आणि जावई सोमवंशी हा जखमी झाला असल्याचे समजते.

या घटनेत आरोपी तथा जावई तरुण निलेश सोमवंशी याने आपल्या सासु नंदाबाई हांडोरे हिच्यावर विळ्याने हल्ला केला असून त्यात पाठीवर,दंडाला,कमरेला,पोटाचे बाजूने कमरेवर जखमा झाल्या आहेत.त्यावर नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या प्रकरणी जखमी महिलेचा मुलगा अमोल विजय हांडोरे (वय-३३) रा.सुभाष नगर याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी निलेश सोमवंशी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी हजर झाला आहे.दरम्यान या प्रकरणी जखमी महिलेचा मुलगा फिर्यादी कोपरगाव शहर पोलिसांत या संबंधी गुन्हा दाखल करण्यासाठी दाखल झाला असून त्याने हि प्रक्रिया सुरु केली असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close