जाहिरात-9423439946
निवडणूक

ऍड.काळे हल्ला,जशास तसे उत्तर देऊ-रघुनाथ दादा पाटील

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

उत्तर नगर जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या कारवर रात्री अज्ञात आरोपींनी हल्ला केल्या प्रकरणी सिफाचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी संताप व्यक्त केला असून सत्ताधाऱ्यांना सबुरीची भाषा कळत नसेल तर शेतकरी संघटना कशास तसे उत्तर देईल असा कडक इशारा सिफाचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी दिला आहे.त्यामुळे हा सत्ताधाऱ्यांना इशारा मानला जात आहे.

 

प्रस्थापित नेते श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रचारा दरम्यान तालुक्याच्या विकासासाठी एकत्र आलो असल्याचे भासवत आहे.गेली तिस वर्ष या घराण्यानी आपल्या नेत्यांच्या अस्मितेवरून गावातील कार्यकर्त्यांची डोकी फोडली,एकमेकांविरुद्ध राजकीय
संघर्ष केला.वर्षानुवर्ष मतभेद केले यामुळे रक्ताची नाती दुरावली यामध्ये गावाचे गावपण हरवले.या संघर्षात गावचा विकास खुंटला आज हेच नेते स्वतःच्या,स्वार्थासाठी एकत्र आले आहे.त्यांनी ऍड.काळे यांच्या गाडीवरच काय आमच्यावर जरी हल्ले केले तरी शेतकरी संघटना तिचे शेतकरी मागे हटणार नाही”-अनिल औताडे,अध्यक्ष,नगर जिल्हा शेतकरी संघटना.

शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मुर्सिडीज कारवर (क्रं.एम.एच.२० सी.यु.३००४) दि.२९ एप्रिल रोजी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास अज्ञात आरोपींनी दगडाने हल्ला करून नुकसान केले असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्यामुळे सभासदांत मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे.या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बऱ्याच निवडणुका पार पडल्या असून कोपरगाव,श्रीरामपूर,राहाता,उर्वरित कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी ३० एप्रिल रोजी म्हणजेच आज निवडणूक संपन्न होत आहे.श्रीरामपूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या  निवडणुकीत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे,माजी आ.भानुदास मुरकुटे,माजी आ. जयंत ससाणे यांचे पुत्र करण ससाणे यांच्या एकत्रित ‘सहकार विकास पॅनल’च्या विरुद्ध शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे,आ.लहू कानडे,काँग्रेसचे नेते अविनाश आदिक यांच्या ‘शेतकरी विकास पॅनेल’ची लढत होत असताना मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपींनी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या बाजार समितीच्या नजीक असलेल्या कार्यलयासमोर उभ्या असलेल्या कारवर (क्रं.एम.एच.२० सी.यु.३००४) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास दगडाने हल्ला केला असून त्यात सदर कारचे मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले असून देशातील शेतकरी संघटनांची शिखर संस्था सिफाचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.व हा इशारा दिला आहे.

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी पुढे म्हटले आहे की,”निवडणुका येतात जातात पण राज्यातील शेतकरी आत्महत्या करत असताना त्यांच्या हिताचे निर्णय घेण्याची सरकारची जबाबदारी आहे.व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी व त्यांच्या सत्ताधाऱ्यांनी सुद्धा शेतमालाला भाव देणे गरजेचे आहे.मात्र या पातळीवर श्रीरामपूरसह राज्यातील सत्ताधिकारी नापास होताना दिसत आहे.याला शेतकरी संघटना जबाबदार नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेतकरी संघटना पुढे येत आहे.श्रीरामपूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूकही त्याला अपवाद नाही.या ठिकाणी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे हे छ.संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या खंडपीठात आपली चांगली चालणारी प्रॅक्टिस सोडून श्रीरामपूरात का आले आहे.शेतकरी त्यांना का पाठिंबा देत आहे याचा सत्ताधाऱ्यांनी विचार करण्याची गरज आहे.त्यांचेकडून व शेतकरी संघटनेकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.त्यामुळे शेतकरी त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहे.मात्र काही सत्ताधाऱ्यांना ही बाब सहन होताना दिसत नाही.त्यामुळे हे असंतुष्ट आत्मे एकत्र येऊन त्यांना विरोध करत आहे.मात्र विरोध करताना त्यांनी आपल्या विवेकबुद्धीला रजेवर पाठवले असल्याचे प्राथमिक पातळीवर दिसत आहे.त्यामुळे त्यांच्या चेल्याचपाट्यामार्फत ते हल्ले करत आहेत.ही वेदनादायी घटना असून त्यांना आम्ही सांगू इच्छितो की,”शेतकरी संघटना ही काही कमी नाही.”आमच्या संघटनेने ठरवले तर या बेताल सत्ताधाऱ्यांना देशात व राज्यात फिरू देणार नाही” असा कडक इशारा त्यांनी दिला आहे.व “ऍड.अजित काळे दुसरे तिसरे कोणी नाही ते शेतकरी संघटनेसाठी बँकेची चांगली नोकरी सोडून शेतकऱ्यांसाठी आयुष्य ओवाळून टाकणाऱ्या संघटनेचे माजी उपाध्यक्ष बबनराव काळे यांचे सुपुत्र आहेत.त्यांना संघर्ष काही नवा नाही.त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी या गोष्टींचा विचार करावा व त्यांना विरोध केला तर त्यांना देशातील शेतकरी संघटना ठरवले तर फिरू देणार नाही असा कडक इशारा ही रघुनाथ दादा पाटील यांनी दिला असून श्रीरामपूर येथील बाजार समितीच्या सभासदानी या अपप्रवृती विरोधात मतदान करून शेतकरी संघटनेच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन रघुनाथ दादा पाटील यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close